कोणत्या राज्यात सर्वाधिक व्हिस्की प्यायली जाते? ‘या’ राज्यातील लोक पहिल्या क्रमांकावर
व्हिस्कीच्या सेवनात दक्षिणेकडील राज्यातील लोक आघाडीवर आहेत. CIABC ने सादर केलेल्या एका अहवालानुसार 2024-25 मध्ये देशाच्या एकूण IMFL विक्रीपैकी 58 टक्के विक्ती ही दक्षिण भारतात झाली आहे.

भारतात व्हिस्की पिणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. यातून सरकारला मोठ्या प्रमाणात कर मिळतो. व्हिस्कीच्या सेवनात दक्षिणेकडील राज्यातील लोक आघाडीवर आहेत. CIABC ने सादर केलेल्या एका अहवालानुसार 2024-25 मध्ये देशाच्या एकूण IMFL विक्रीपैकी 58 टक्के विक्ती ही दक्षिण भारतात झाली आहे. याचाच अर्थ दक्षिण भारताचे परदेशी दारू बाजारपेठेवर जवळजवळ पूर्ण नियंत्रण आहे. देशाच्या उर्वरित भारात फक्त 42 टक्के व्हिस्की विकली जाते. असं असलं तरी देशभरात परदेशी व्हिस्कीची विक्री 1.4 टक्क्यांनी घसरली आहे. कोणत्या राज्यात किती प्रमाणात व्हिस्की पिली जाते ते जाणून घेऊयात.
IMFL मध्ये व्हिस्की, वोडका, रम, जिन आणि ब्रँडी यांचा समावेश आहे. ही दारू देशांतर्गत दारू आणि इतर पेयांपेक्षा वेगळी आहे. CIABC चे महासंचालक अनंत एस. अय्यर यांनी याबाबत सांगितले की, “निवडणुका आणि काही राज्यांच्या दारू धोरणांमुळे आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत विक्री कमी होती. मात्र नंतर विक्री वाढली. आम्ही ते राज्य सरकारांशी सतत संपर्कात आहेत आणि उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करत आहेत. कारण अनेकदा कारण राज्य पातळीवर कर बदलला जातो, ज्याचा थेट परिणाम विक्रीवर होतो. त्यामुळे अर्थकारण बिघडते.
हे राज्य पहिल्या क्रमांकावर
समोर आलेल्या अहवालानुसार कर्नाटकमधील लोक व्हिस्की पिण्यात आघाडीवर आहेत. या राज्यातील लोकांनी 6.88 कोटी खोके व्हिस्की रिचवली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडूचा नंबर आहे. या राज्यातील लोकांनी 6.47 कोटी खोकी व्हिस्की रिचवली आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशने प्रत्येकी नऊ टक्के व्हिस्कीचे सेवन केले आहे. या यादीत केरळ सातव्या क्रमांकावर आहे. या अहवालानुसार दक्षिण भारतातील एकूण विक्री अंदाजे एक टक्का वाढ झाली आहे.
उत्तर प्रदेश उत्तर भारतात आघाडीवर
उत्तर भारतात उत्तर प्रदेशात सर्वात जास्त व्हिस्कीचे सेवन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील लोकांना 2.50 कोटी खोकी व्हिस्की रिचवली आहे. उत्तर प्रदेशातील व्हिस्कीच्या विक्रीत 6 टक्के वाढ झाली आहे, हे राज्य सहाव्या क्रमांकावर आहे. त्यानंतर राजस्थान, दिल्ली आणि हरियाणा या राज्यातील लोकांनी अनुक्रमे 1.37 कोटी खोके, 1.18 कोटी खोके आणि 1.17 कोटी खोके व्हिस्की रिचवली आहे. ही राज्ये नवव्या, दहाव्या आणि अकराव्या क्रमांकावर आहेत.
