क्रेडिट-डेबिट कार्ड वापरताय? सावधान! ‘या’ चुकीमुळे होऊ शकते संपूर्ण खाते रिकामी…

देशातील छोट्या शहरांत ऑनलाईन पेमेंटमध्ये 80 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कोरोना साथीच्या काळात हे प्रमाण वाढले आहे.

क्रेडिट-डेबिट कार्ड वापरताय? सावधान! ‘या’ चुकीमुळे होऊ शकते संपूर्ण खाते रिकामी...
विना इंटरनेट पेमेंट करू शकणार, झटपट व्यवहारांसाठी सरकार बदलणार नियम

मुंबई : देशातील छोट्या शहरांत ऑनलाईन पेमेंटमध्ये 80 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कोरोना साथीच्या काळात हे प्रमाण वाढले आहे. संसर्ग टाळण्यासाठी लोकांनी ऑनलाईन पेमेंट तसेच क्रेडिट, डेबिट, नेट बँकिंग आणि वॉलेट पेमेंटचा अवलंब केला आहे. फिनटेक युनिकॉर्न रेजरपे यांनी जाहीर केलेल्या अहवालात म्हटले की, टियर-2 आणि 3 शहरांमध्ये अधिकाधिक लोकांनी ऑनलाईन व्यवहार स्वीकारल्यामुळे यात 92 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बिल भरण्यासाठी, लोक पैशांच्या रोख व्यवहारापेक्षा डिजिटल पेमेंट अधिक उपयुक्त मानतात. त्यामुळे युटिलिटी पेमेंट आणि ऑनलाईन बिल पेमेंटमध्ये कमालीची वाढ झाली आहे (Tips For secure your digital payments).

डेबिट, क्रेडिट, मोबाईल वॉलेट आणि मोबाईल बँकिंगचा ट्रेंड वाढला असतानाच, त्याच्या सुरक्षेची मागणीही वाढली आहे. सायबर हल्ला टाळण्यासाठी व्यवहार सुरक्षित करता यावे ही गरज मोठी झाली आहे. सरकारने यासाठी डिजिटल सुरक्षा मोहीम देखील सुरू केली आहे, ज्याअंतर्गत लोकांना सुरक्षितरित्या डिजिटल पेमेंट करण्यासाठीच्या काही सोप्या पद्धती सांगितल्या जात आहे.

कार्डवर लक्ष ठेवा.

डेबिट आणि क्रेडिट कार्ड्सच्या सुरक्षिततेसाठी, कार्ड वापरात असताना त्यावर नीट लक्ष ठेवा. काम पूर्ण होताच, ताबडतोब कार्ड परत घ्या. कार्डवरील व्यवहारानंतर ग्राहकाला एसएमएस प्राप्त होतो. कार्डद्वारे व्यवहारानंतर, एसएमएसद्वारे नमूद केलेल्या व्यवहाराची रक्कम आणि वास्तविक व्यवहाराच्या रकमेमध्ये काही फरक नाही हे तपासा. त्याच्याशी संबंधित पावत्या आणि तपशील सुरक्षित ठेवा.

सीसीव्ही आणि पिन शेअर करू नका.

आपण ज्या कंपनीशी किंवा व्यापाराशी व्यवहार करत आहात, त्यास कधीही आपल्या कार्ड किंवा खात्यासंबंधित माहिती देऊ नका. कोणाबरोबरही सीव्हीव्ही व पिन क्रमांक शेअर करू नका. आपले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड कोणाच्याही हातात देऊ नका. यूपीआय व भीम अॅपमधून व्यवहार करताना देखील पिन सुरक्षित ठेवा. व्यापार्‍याने दिलेल्या देय तपशीलाची विनंती तपासल्यानंतरच पैसे द्या. आपले यूपीआय आधारित अॅप्स नेहमीच अपडेट करा (Tips For secure your digital payments).

यूपीआय पिन कोणालाही सांगू नका.

यूपीआय किंवा भीम अॅपच्या व्यवहारात काही गोष्टी कटाक्षाने लक्षात घेतल्या पाहिजेत. आपला यूपीआयचा एम पिन कुणालाही सांगू नका किंवा कुठेही लिहून ठेवू नका. जेलब्रोकेन फोनद्वारे कधीही डिजिटल व्यवहार करू नका. जेलब्रोकन म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम आणि फोनच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती दुसर्‍या स्त्रोतास देणे. व्यवहारादरम्यान, पैसे घेणार्‍याला याची खात्री न करता पैसे पाठवणे टाळा.

आधार क्रमांक तपासा.

जर आपण आधार सक्षम पेमेंट सिस्टम (आधार इनेबल पेमेंट सिस्टम) वापरत असाल तर पैसे पाठवण्यापूर्वी आधार क्रमांक तपासा. केवळ पीओएस मशीन किंवा बायोमेट्रिक डेटा कॅप्चर मशीनवर व्यवहार करण्यासाठी आधार कार्ड वापरा. पीओएस मशीन किंवा बायोमेट्रिक डेटा कॅप्चर मशीनमध्ये कोणतीही छेडछाड झाली नसल्याचे नीट तपासा.

ईपीएस कार्ड कधीही विसरू नका.

जर आपण आधारशी कनेक्ट केलेल्या सिस्टमशी व्यवहार केला तर व्यापाऱ्याला आपला बायोमेट्रिक डेटा किंवा कार्ड तपशील साठवून ठेवण्याची अनुमती देऊ नका. आपले एईपीएस कार्ड कधीही विसरू नका. आधार नंबर किंवा वैयक्तिक माहिती कोणासही विनाकारण सांगू नका. ज्या डिव्हाईससह ऑनलाईन व्यवहार करता ते डिव्हाईस नेहमीच अपडेट ठेवा.तसेच एखादा पासवर्ड लावून फोन सुरक्षित ठेवा. कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद किंवा फसव्या व्यवहारांची नोंद तत्काळ संबंधित सेवा प्रदाता व पोलिसांना दिली गेली पाहिजे.

(Tips For secure your digital payments)

हेही वाचा :

Published On - 1:21 pm, Wed, 13 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI