Today’s gold-silver prices: सोन्याचे दर स्थिर; चांदीच्या दरात किंचित घसरण

आज सोन्याचे दर (Today's gold-silver prices) स्थिर आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या (gold) दरामध्ये सातत्याने चढ-उतार पहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात होत असलेल्या चढ -उताराच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण पहायला मिळत आहे.

Today's gold-silver prices: सोन्याचे दर स्थिर; चांदीच्या दरात किंचित घसरण
सोन्याच्या दरात वाढ
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 1:41 PM

आज सोन्याचे दर (Today’s gold-silver prices) स्थिर आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या (gold) दरामध्ये सातत्याने चढ-उतार पहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात होत असलेल्या चढ -उताराच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण पहायला मिळत आहे. आज सोन्याचे दर स्थिर असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47 हजार 800 एवढा आहे. तर 24 कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा अर्थात दहा ग्रॅमचा दर 52140 रुपये एवढा आहे. चांदीच्या किमतीमध्ये किंचितशी घट झाली असून, आज चांदीचा (silver) भाव 66300 रुपये एवढा आहे. सोन्याच्या दरात प्रत्येक शहरांप्रमाणे थोडा फार बदल होऊ शकतो, हे ग्राहकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. सोन्याच्या दागिन्यांचा दर सोन्याचा दर अधिक दागिन्याच्या घडनावळीचा दर मिळून निश्चित केला जातो. त्यामुळे सोन्याच्या कीमतीमध्ये कमी -अधिकप्रमाणात तफावत दिसून येते.

राज्याच्या प्रमुख शहारतील सोन्याचे भाव

आज राज्यात सोन्याचे दर स्थिर आहेत. सोन्याच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गुड रिटर्न्स वेबसाईटकडून प्राप्त माहितीनुसार आज राज्यात सोन्याचा दर प्रति तोळा 47 हजार 800 एवढा आहे. तर 24 कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा अर्थात दहा ग्रॅमचा दर 52140 रुपये एवढा आहे. पाहुयात प्रमुख शहरातील सोन्याचे दर आज मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याची किंमत प्रति तोळा 47 हजार 800 इतकी आहे. तर 24 कॅरट सोन्याची किंमत प्रति तोळा 52140 रुपये आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 47 हजार 8050 इतकी आहे. तर 24 कॅरट सोन्याची किंमत 52190 रुपये एवढी आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 47 हजार 8050 इतकी आहे. तर 24 कॅरट सोन्याची किंमत 52190 रुपये एवढी आहे. आज चांदीच्या दरात किंचीतशी घसरण झाली असून, चांदीचे दर प्रति किलो 66300 रुपये झाले आहेत.

दरवाढीवर युद्धाचा परिणाम

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे, या युद्धाचा परिणाम हा जागतिक बाजारपेठेवर झाला आहे. सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत, कच्च्या तेलाच्या किमतीपासून ते खाद्यतेलाच्या किमतीपर्यंत सर्वच वस्तुंच्या दरात वाढ झाली आहे. युद्धामुळे आयात मंदावल्याने सोने देखील महाग झाले आहे. युद्ध सुरू झाल्यापासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू असल्यामुळे गुंतवणुकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण पहायाला मिळत आहे.

संबंधित बातम्या

मारुती सुझुकीची वाहने महागणार, कच्चा माल महागल्याने दरवाढीचा निर्णय, ग्राहकांना मोजावे लागणार अतिरिक्त पैसे

डेलीहंटची पेरेंट संस्था VerSe Innovation स्टार्टअपने रचला इतिहास, 5 अब्ज डॉलर्सच्या मूल्यांकनावर विक्रमी 805 दशलक्ष डॉलर्स उभारले

पेट्रोल, डिझेल दर वाढीसोबतच पुणेकरांना महागाईचा आणखी एक झटका; सीएनजीच्या भावात वाढ

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.