AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tomato-Onion Rate : अवकाळीचा शेतकरीच नाही तर ग्राहकांना पण फटका; टोमॅटो आणि कांदा किचन बजेट बिघडवणार

Tomato Onion Rate Hike : जून महिन्याच्या सुरुवातीलाच टोमॅटोचे भाव 24 रुपयांहून 30 रुपयांच्या घरात पोहचले आहेत. तर येत्या महिनाभरात टोमॅटो 80 ते 100 रुपयांच्या घरात पोहचण्याची शक्यता आहे. कांद्याचा भाव पण वाढण्याची शक्यता आहे.

Tomato-Onion Rate : अवकाळीचा शेतकरीच नाही तर ग्राहकांना पण फटका; टोमॅटो आणि कांदा किचन बजेट बिघडवणार
टोमॅटो-कांदा रडवणारImage Credit source: टीव्ही 9 नेटवर्क
| Updated on: Jun 03, 2025 | 3:22 PM
Share

महाराष्ट्रासह दुसर्‍या राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अनेक भागांतील पिकांना मोठा फटका बसला आहे. टोमॅटो, कांद्यासह इतर नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्तर भारतासह अनेक मोठ्या शहरात भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. ग्राहकांच्या खिशावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. जूनच्या सुरुवातीलाच टोमॅटो 24 रुपयांहून 30 रुपयांवर पोहचला आहे. तर महिनाभरात हा भाव 80-100 रुपयांच्या घरात पोहचण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे कांद्याच्या किंमतीत किलोमागे 6 रुपयांची दरवाढ झाली आहे. एका महिन्यात कांद्याचा भाव 50 रुपयांपेक्षा अधिक वधारण्याची भीती व्यक्त होत आहे.

20 टक्क्यांची वाढ

राज्यात मे महिन्यातच अवकाळी आणि पूर्व मान्सूने धडक दिली. त्यामुळे अनेक भागांना पावसाने झोडपून काढले. त्यात नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले. कांदा काढणी सुरू असतानाच पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यातच कांद्याच्या किंमतीत 20 टक्क्यांची वाढ दिसून आली. पावसामुळे कांदा आणि टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे समोर येत आहे. तर तुफान पावसामुळे भाजीपाला वाहतूक आणि पुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम दिसून आला. त्यामुळे उत्तर भारतातच नाही तर देशातील अनेक भागात दोन्ही मालाच्या किंमतीत वाढ दिसून आली. किंमतीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

दोन दिवसात किती वधारला भाव?

जूनच्या सुरुवातीच्या दोन दिवसात टोमॅटोची किंमत 40 ते 50 टक्क्यांनी वधारली. किरकोळ किंमतीत वाढ दिसून आली. 31 मे रोजी देशाची राजधानी दिल्लीत कांद्याची किरकोळ किंमत 20 रुपये प्रति किलोग्रॅम होती, 2 जून रोजी ती वाढून 30 रुपये प्रति किलोग्रॅम इतकी झाली. तर टोमॅटोचा भाव 2 जून रोजी 20 रुपयांहून थेट 35 रुपये प्रति किलोग्रॅमवर आला. दोन दिवसात टोमॅटो प्रति किलो 15 रुपयांनी वधारला. तर तर कांद्याच्या किंमतीत 50 टक्के तेजी दिसून आली.

नाशिकच्या बाजारात सुद्धा पंधरवाड्यात कांद्याच्या किंमतीत 20 टक्क्यांची वाढ दिसून आली. लासलगाव कांदा मार्केटमध्ये 15 दिवसात कांद्याच्या किंमतीत मोठी वाढ दिसून आली. बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. उत्पादन आणि साठा असतानाही कांदा महागला आहे. व्यापाऱ्यांच्या मते कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले असते पण अवकाळी पावसाने मोठा तडाखा दिला. त्याचा परिणाम आता उत्पादनवर दिसून येत आहे. बाजारात कांद्याची आवक कमी झाल्यास किंमती वधारण्याची शक्यता आहे. लासलगावच्या घाऊक बाजारात कांदा 15 मे रोजी 11.50 रुपये प्रति किलोने विक्री झाला तर 31 मे रोजी एक किलोसाठी 14 रुपये मोजावे लागले. किंमतीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.