Top Silver Country : सोन्यासाठी तर जग वेडे, पण या देशांना चांदीची भारी हौस; काय सांगतात आकडे?
वर्ष 2024 मध्ये जगभरात जवळपास 25 हजार मॅट्रिक टन चांदीचे उत्पादन झाले. गेल्यावर्षीपेक्षा हा आकडा कमी आहे. चांदीच्या उत्पादनात हे देश जगात आघाडीवर आहेत. त्यात भारताचा कितवा क्रमांक आहे, तुम्हाला माहिती आहे का?

चांदी ही सोन्यापेक्षा कमी नाही. चांदीची चमक अनेकांना मोहात पाडते. सोन्याने आता वेगाने चांदीशी स्पर्धा सुरू केली आहे. चांदी जागतिक अर्थव्यवस्थेचा बुस्टर डोस आहे. कारण औद्योगिक विश्वात चांदीची मागणी सोन्यापेक्षा कित्येक पटीने अधिक आहे. वर्ष 2024 मध्ये जगभरात जवळपास 25 हजार मॅट्रिक टन चांदीचे उत्पादन झाले. गेल्यावर्षीपेक्षा हा आकडा कमी आहे. चांदीच्या उत्पादनात हे देश जगात आघाडीवर आहेत. त्यात भारताचा कितवा क्रमांक आहे, तुम्हाला माहिती आहे का?
मॅक्सिको आणि चीन
चांदी उत्पादनात मॅक्सिको हा 2024 मध्ये जगातील क्रमांक एकच देश होता. यंदा या देशात जवळपास 6300 मॅट्रिक टन चांदीचे उत्पादन झाले. दुसऱ्या क्रमांकावर अर्थातच चीन हा देश आहे. मॅक्सिकोच्या जकाटेकास, डुरंगो आणि चिहुआहुआ राज्यात सर्वाधिक म्हणजे 80 टक्के चांदीचे उत्पादन होते.
पेरू
पेरू हा देश चांदी उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी या देशात जवळपास 3100 मॅट्रिक टन चांदीचे उत्पादन झाले होते. तांब्याच्या खाणीत चांदी सापडत असल्याने या देशाचा दुहेरी फायदा होतो. एंटामिना ही या देशातील सर्वात मोठी खाण आहे.
पोलंड
पोलंड या देशाने गेल्या वर्षी जवळपास 1300 मॅट्रिक टन चांदीचे उत्पादन केले. मागील वर्षीपेक्षा हा आकडा थोडा कमी आहे. केजीएचएम पोल्स्का मीड्ज ही या देशातील सर्वात मोठी चांदी उत्पादक कंपनी आहे. तांब्याच्या खाणीत जस्त आणि चांदीचे उत्पादन घेण्यात येते. पोलंडकडे चांदीचे 61,100 मॅट्रिक टन साठा आहे.
चिली
चिली या देशात 2024 मध्ये 1200 मॅट्रिक टन चांदीचे उत्पादन झाले. 2023 मध्ये 1260 मॅट्रिक टन चांदीचे उत्पादन घेण्यात आले होते. येथील खाणीतून सातत्याने चांदीचे उत्पादन घटत आहे. त्यामुळे नवीन खाणीचे ठिकाण शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
रशिया
रशिया सुद्धा चांदीचा मोठा उत्पादक आहे. 2024 मध्ये 1200 मॅट्रिक टन चांदी उत्पादन झाले. 2023 मध्ये हे उत्पादन 1240 मॅट्रिक टन इतके होते. डुकाट येथे चांदीचा मोठा साठा आहे. मंगजेया प्लस या कंपनीकडे उत्खननाचे काम आहे.
अमेरिका
अमेरिकेत 2024 मध्ये 1100 मॅट्रिक टन चांदीचे उत्पादन झाले. तर त्याच्या मागील वर्षात चांदीचे उत्पादन 1020 मॅट्रिक टन इतके झाले होते. देशातील 31 इतर खाणीतून सोने आणि इतर धातुसह चांदीचे उत्पादन घेण्यात येते. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत या मौल्यवान धातुच्या उत्पादनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया या देशाचा क्रमांक लागतो. येथे 2024 मध्ये 1000 मॅट्रिक टन चांदीचे उत्पादन झाले होते. तर कझाकस्तान या देशात 2024 मध्ये 1000 मॅट्रिक टन चांदी खाणीतून काढण्यात आली होती. भारतातही चांदीचे उत्पादन होते. पण ते या देशांच्या मानाने जास्त नाही.
