नोकरीसह महिन्याला कमवा अधिकचे 20,000; स्मार्ट बिझनेस आयडिया जाणून घ्या
Side Business Idea : महागाईचा कहर सुरू आहे. नोकरी आणि पगारावर अनेकांचे भागत नाही. घरखर्च निघत नाही. अशावेळी काही जणांना दुसरीकडे पार्ट टाईम जॉब करावा लागतो. पण या साईड बिझनेस आयडियामुळे तुम्हाला महिन्याकाठी 20-25 हजारांची सहज कमाई होऊ शकते.

हे युग महागाईचे आहे. गेल्या दहा वर्षात तर महागाईने सर्वसामान्यांना दोन वेळच्या जेवणांची भ्रांत पडली आहे. सरकार आश्वासनाचा पोतारा फिरवते. पण प्रत्यक्षात शेतकरीच नाहीतर सर्वसामान्यांचा खिसा फाटकाच आहे. अशावेळी घरच्या कर्त्या पुरुषांना डबल ड्युटी करावी लागत आहे. अथवा घरातील स्त्रीयांना घर खर्चासाठी हातभार लावावा लागत आहे. पण या साईड बिझनेस आयडियामुळे तुम्हाला महिन्याकाठी 20-25 हजारांची सहज कमाई होऊ शकते.
Freelancing मधून पैसे कमवा
जर तुमच्याकडे कंटेंट रायटिंग, ग्राफिक डिझाईनिंग, वेब डेव्हलपमेंट वा डिजिटल मार्केटिंगसारखे एखादे कौशल्य आहे. तर तुम्ही Fiverr, Upwork वा इतर अनेक प्लॅटफॉर्मवर काम करुन कमाई करु शकता. येथे छोट्या प्रकल्पातून ग्राहक वाढवता येतील. महिन्याला सहज 10-12 तास देऊन 15-25 हजार रुपयांची कमाई करता येईल.
Online Tutoring : शिक्षणातून पैसा कमवा
जर तुम्ही एखाद्या विषयात प्रविण असाल. एखाद्या विषयात तुमची हतोटी असेल. गणित, इंग्रजी, इतिहास, विज्ञान तर तुम्हाला ऑनलाईन ट्युशन घेऊन कमाई करता येईल. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील काही मुलं, परदेशातील मुलांची ऑनलाईन ट्युशन घेऊन डॉलरमध्ये कमाई करत आहेत. पण हे कौशल्य सर्वस्वी तुमचं आहे. विषयातील ज्ञान आणि शिकवण्याचे कौशल्य असेल तर कमाई होईल. आठवड्याच्या शेवटचे दोन दिवस क्लासेस घेऊन सहज कमाई होते.
Affiliate Marketing : विना उत्पादन छपाई
सध्या अनेक जण ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या साईटवर एफिलिएट होऊन उत्पादन विक्रीला प्रोत्साहन देतात आणि कमाई करतात. तुम्हाल योग्य आणि चांगले उत्पादन समोर आणायचे आहे. त्याच्या विक्रीसाठी मदत करायची आहे. त्यातून प्रत्येक वस्तूच्या विक्रीवर तुम्हाला कमीशन मिळेल.
Dropshipping : विना साठा करता करा व्यवसाय
ड्रॉपशिपिंग या नवीन व्यवसायाची चलती आहे. येथे तुम्हाला कोणतेही उत्पादन, वस्तू खरेदी करायची गरज नाही. अथवा त्याचा साठा करण्याची गरज नाही. तुम्हाला ऑनलाईन तिसऱ्या पक्षाकडून हे काम करून घ्यायचं आहे. थर्ड पार्टी हे उत्पादन डिलिव्हरी करेल. पोचतं करेल. Shopify आणि WooCommerce सारख्या साईट तुमच्या मदतीला येतील. कमाई होईल.
Weekend Market : पार्ट टाईम स्टॉल
जर तुम्ही ऑफलाईन माध्यमातून कमाई करू इच्छित असाल तर विकेंड मार्केट ही चांगली कन्स्पेट आहे. सेल, विक्री मेळा, धमाका ऑफर या नावाने आठवड्याच्या अखेरीस तुम्ही होममेड प्रोडक्ट्स, गिफ्ट आयटम्स वा स्नॅक्स सेल करु शकता. सोबत तुमची काही उत्पादनही विक्री करू शकता. ग्राहकांचे संपर्क क्रमांक मिळवून त्याआधारे सोशल साईटवर त्यांना जोडू शकता.
