Twitter : ट्विटर कर्मचाऱ्यांनीच मस्क यांना टाकली गुगली! दुपारनंतर ऑफिसच झाले बंद..

Twitter : ट्विटर कर्मचाऱ्यांनी एलॉन मस्क यांना मोठी गुगली टाकली आहे..

Twitter : ट्विटर कर्मचाऱ्यांनीच मस्क यांना टाकली गुगली! दुपारनंतर ऑफिसच झाले बंद..
कर्मचाऱ्यांनीच खेचली कीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 18, 2022 | 6:54 PM

नवी दिल्ली : एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter) खरेदी केल्यापासून वाद काही त्यांचा पिच्छा सोडत नसल्याचे चित्र आहे. मस्क यांच्या भूमिकेवरुन ट्विटर आणि ट्विटर बाहेरील जगतात वादंग उठले आहे. त्यांच्या भूमिकेविरोधात जगभरातून टीका होत असताना आता कर्मचाऱ्यांनी (Employees) ही मस्क यांना एक गुगली टाकली आहे.

तर हा नवीन वाद उद्भवला, तो गुरुवारी. दुपारी 2 वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांना एक Google फॉर्म भरुन देण्यास सांगण्यात आले होते. त्यात काही प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नाला कर्मचाऱ्यांनी थेट कृतीतूनच उत्तर दिल्याचे समोर येत आहे.

तर या Google फॉर्म मध्ये, कर्मचाऱ्यांना ट्विटरमध्ये काम करण्याची इच्छा आहे की नाही? असा खोचक सवाल विचारण्यात आला होता. मस्क यांना वाटतं होतं की, कर्मचारी त्यांना गुगल फॉर्ममध्ये होय अथवा नाहीत उत्तर पाठवतील.

हे सुद्धा वाचा

पण कर्मचाऱ्यांनी या Google फॉर्म मध्ये थेट अखेरचा रामराम पाठविला. काही कर्मचाऱ्यांनी अनुभव मांडत या फॉर्मद्वारेच राजीनामा पाठविला. या फॉर्मच्या माध्यमातून अनेक कर्मचाऱ्यांनी थेट राजीनामा सत्रच सुरु केल्याने ट्विटरसमोरच्या अडचणी वाढल्या.

ट्विटरमधील कर्मचाऱ्यांनी काल धडाधड राजीनामा दिल्याने काही भागातील कार्यालये दुपारीच बंद करण्यात आल्याची चर्चा ट्विटरवरच रंगली आहे. काही कर्मचाऱ्यांनी याविषयीचा दावा केला आहे.

पत्रकार जोए शिफर यांनी या घटनेची माहिती दिली. त्यानुसार, या Google फॉर्ममुळे कर्मचारी संतापले. त्यांनी सामूहिक राजीनामे दिले. त्यामुळे ट्विटरचे अनेक कार्यालये गुरुवारी दुपारीच बंद करण्यात आले.

काही कर्मचारी कार्यालयात तोडफोड करण्याची भीती असल्याने ऑफिस बंद करण्यात आल्याची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे. या सर्व घडामोडीमुळे तब्बल चार दिवस ट्विटरचे ऑफिस बंद राहणार आहे. 21 नोव्हेंबर रोजी ट्विटरचे कार्यालय उघडणार आहे.

ट्विटरच्या एकूण 7,500 कर्मचाऱ्यांपैकी अर्ध्या कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे अथवा त्यांना मस्क यांनी कामावरुन कमी केले आहे. त्यातील काही कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर बोलविण्यात आले होते. पण त्यातील किती जण पुन्हा रुजू झाले हा आकडा समोर आला नाही.

Non Stop LIVE Update
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.