Union Budget : प्रेझेंटेशनपासून तारखेपर्यंत बजेट पार बदलले , पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात असा बदलला चेहरामोहरा

Union Budget : देशाच्या बजेटने आणि त्याच्या संपूर्ण प्रक्रियेत अमुलाग्र बदल झाला आहे.

Union Budget : प्रेझेंटेशनपासून तारखेपर्यंत बजेट पार बदलले , पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात असा बदलला चेहरामोहरा
असे बदलले रुपडे
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 10:34 PM

नवी दिल्ली : देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्मचे हे अंतिम बजेट आहे. यंदाच्या Union Budget मध्ये सर्वसामान्य नागरिकांवर सवलतींचा पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. अर्थसंकल्पात मोठा बदल होईल की नाही, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल, पण मोदी सरकारच्या (Modi Government) काळात अर्थसंकल्प सादर करण्याची पद्धत संपूर्णता बदलून गेली आहे.

भारताच्या बजेटमध्ये प्रेझेंटेशनपासून ते तारखेपर्यंत सर्व बदल झाला आहे. यापूर्वी मार्च महिन्यात अर्थसंकल्प सादर करण्यात येत होता. आता फेब्रुवारीच्या पहिल्या तारखेला अर्थसंकल्प सादर करण्यात येतो. हा महत्वपूर्ण बदल मोदी सरकारच्या काळात करण्यात आला.

पूर्वी सर्वसाधारण अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प असे दोन प्रकार होते. पण नंतर रेल्वे अर्थसंकल्प बंद करण्यात आला. त्यामुळे कोणत्या भागात रेल्वे सुरु होणार, कुठे सर्व्हेक्षण करण्यात येणार, नवीन रेल्वे मार्ग, नवीन रेल्वे याविषयी वृत्तपत्रातून रकानेच्या रकाने भरून यायचे.

हे सुद्धा वाचा

कोरोना महामारीत जगभरात मोठा फेरबदल झाला. भारतही त्याला अपवाद नाही. 2021 मध्ये पहिल्यांदा संपूर्णतः पेपरलेस बजेट सादर करण्यात आले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पहिल्यांदा संसदेत टॅबलेटपर अर्थसंकल्प सादर केला. त्यासाठी हार्ड कॉपी नाही तर अॅपचा वापर करण्यात आला.

संसदेत अर्थसंकल्प सादर करताना यापूर्वी अर्थमंत्री ब्रीफकेस नेहमीच चर्चेत राहत होती. परंपरागत स्वरुपात अर्थमंत्री दरवर्षी ब्रीफकेसमध्ये घेऊन येत होते. अर्थसंकल्पाची कागदपत्रे विविध रंगाच्या चामड्याच्या बॅगमध्ये घेऊन येत. ही परंपरा अशात खंडीत करण्यात आली.

परंतु, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या प्रक्रियेत बदल केला. भारतीय परंपरेनुसार ही कागदपत्रे लाल कपाड्यात गुंडाळून आणण्यात येत होते. त्याला दिवाळीतील वही-खात्याचे स्वरुप देण्यात आले.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.