AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता पेट्रोल, डिझेलवर नव्हे तर 100 टक्के इथेनॉलवर धावतील वाहने, पीयूष गोयल यांनी सांगितला सरकारचा प्लान

CII आयोजित आत्मनिर्भर भारत परिषदेला संबोधित करताना पीयूष गोयल म्हणाले की, रिन्यएबल ऊर्जेच्या क्षेत्रात स्वावलंबी होण्याचे आमचे उद्दीष्ट आहे. आम्ही असे तंत्रज्ञान विकसित करू, ज्याच्या मदतीने पेट्रोलऐवजी 100 टक्के इथेनॉलवर वाहने धावतील.

आता पेट्रोल, डिझेलवर नव्हे तर 100 टक्के इथेनॉलवर धावतील वाहने, पीयूष गोयल यांनी सांगितला सरकारचा प्लान
पीयूष गोयल, केंद्रीय वाणिज्यमंत्री
| Edited By: | Updated on: Jul 17, 2021 | 8:44 PM
Share

नवी दिल्ली Ethanol blending petrol : दीर्घकालीन कालावधीत 100 टक्के इथेनॉलवर गाडी चालवण्याचे सरकारचे लक्ष्य असून, वर्ष 2023-24 पर्यंत सरकारने 20 टक्के इथेनॉल ब्लेंडिंगचे टार्गेट ठेवले आहे, असे उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी सांगितले. गोयल म्हणाले की, बॅटरी तंत्रज्ञानाची मागणी येत्या काही दिवसांत लक्षणीय वाढणार आहे. रिन्यूएबल सेक्टर बरीच प्रगती होईल, ज्यामुळे बॅटरी उद्योगाचा देखील विकास होईल. (Vehicles will now run on 100 per cent ethanol instead of petrol and diesel, says Piyush Goyal)

CII आयोजित आत्मनिर्भर भारत परिषदेला संबोधित करताना पीयूष गोयल म्हणाले की, रिन्यएबल ऊर्जेच्या क्षेत्रात स्वावलंबी होण्याचे आमचे उद्दीष्ट आहे. आम्ही असे तंत्रज्ञान विकसित करू, ज्याच्या मदतीने पेट्रोलऐवजी 100 टक्के इथेनॉलवर वाहने धावतील. ज्यांच्याकडे इलेक्ट्रिक कार आहे त्यांना आवाहन आहे की त्यांनी केवळ सौर उर्जा किंवा रिन्यूएबल एनर्जीच्या मदतीने आपली कार रिचार्ज करावी. यासाठी भविष्यात चार्जिंग स्टेशनची पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात तयार केली जाईल.

2022 पर्यंत 175 गीगाव्हॅट रिन्यूएबल एनर्जीचे लक्ष्य

गोयल म्हणाले की, 2020 पर्यंत रिन्यूएबल एनर्जीचे लक्ष्य 175 गीगाव्हॅट निश्चित केले गेले आहे, तर 2030 पर्यंत रिन्यूएबल एनर्जी लक्ष्य 450 गीगाव्हॅट आहे. 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन 2021 च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2030 ते 2025 पर्यंत 20 टक्के इथेनॉल मिक्सिंगचे लक्ष्य ठेवले केले.

सध्या इथेनॉल मिश्रण 8.5 टक्के

तत्पूर्वी सरकारने 2022 पर्यंत 10 टक्के आणि 2030 पर्यंत 20 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे लक्ष्य ठेवले होते. आता हे लक्ष्य पाच वर्षांपूर्वी शिफ्ट करण्यात आले आहे. सध्या देशात पेट्रोलमध्ये जवळपास 8.5 टक्के इथेनॉल मिसळले जाते. वर्ष 2014 मध्ये ते केवळ 1-1.5 टक्क्यांच्या दरम्यान होते.

रिन्यूएबल एनर्जीमध्ये 250 टक्के वाढ

रिन्यूएबल एनर्जीच्या वापराबद्दल भारत खूप जागरूक आहे आणि गेल्या काही वर्षांत त्यात 250 टक्के वाढ झाली आहे. भारत जगातील अशा पाच देशांमध्ये आहे जिथे रिन्यूएबल एनर्जीचा सर्वाधिक वापर केला जात आहे. हवामान बदल परफॉर्मन्स इंडेक्समध्येही पहिल्या दहा देशांमध्ये भारताचा समावेश आहे. अर्थव्यवस्था व पर्यावरणाच्या दिशेने पाऊल टाकण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. (Vehicles will now run on 100 per cent ethanol instead of petrol and diesel, says Piyush Goyal)

इतर बातम्या

खारघरमध्ये हज हाउस आणि हंगामी कार्यालय होणार, उभारणीसाठी खारघरमध्ये भूखंड प्रदान, सिडकोचा निर्णय

होय ती अफवाच, दुबईहून आलेल्या खासगी विमानात स्फोटकं सापडले नाहीत, खोडसाळपणा करणाऱ्याचा शोध सुरु

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.