VIDEOCON Loan: ‘या’ निर्णयामुळे कर्जदारांचे 55 टक्के नुकसान

VIDEOCON | यापूर्वी शेअर बाजारातून व्हीडिओकॉन इंडस्ट्रीड लिमिटेड आणि व्हॅल्यूज इंडस्ट्रीज लिमिटेड या दोन कंपन्या डिलिस्ट करण्यात आल्या होत्या.

VIDEOCON Loan: 'या' निर्णयामुळे कर्जदारांचे 55 टक्के नुकसान
व्हीडिओकॉन
Follow us
| Updated on: Jul 22, 2021 | 11:45 AM

नवी दिल्ली: दिवाळखोरीत निघालेल्या व्हीडिओकॉन समूहाच्या कर्जदारांना आता 50 ते 55 टक्के नुकसान सहन करावे लागणार आहे. यापूर्वी नुकसानीची टक्केवारी 95 टक्क्यांच्या आसपास सांगितली जात होती. मात्र, व्हीडिओकॉनच्या मालकीच्या तेल आणि नैसर्गिक वायू व्यवसायातील संपत्तीच्या विक्रीतून 15000 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जदारांचे नुकसान कमी होण्याचा अंदाज आहे. ब्राझीलमध्ये व्हीडिओकॉनच्या मालकीचा तेल आणि नैसर्गिक वायूचा व्यवसाय आहे. या संपत्तीचा लवकरच लिलाव होईल.

यापूर्वी शेअर बाजारातून व्हीडिओकॉन इंडस्ट्रीड लिमिटेड आणि व्हॅल्यूज इंडस्ट्रीज लिमिटेड या दोन कंपन्या डिलिस्ट करण्यात आल्या होत्या. व्हीडिओकॉन समूहाचे एकूण मूल्य कर्जदारांचे पैसे फेडण्यासाठी पुरेसे नाही. त्यामुळे इक्विटी शेअरधारकांना कंपनी कोणताही लाभ देऊ शकत नाही, असे व्हॅल्यूज इंडस्ट्रीज लिमिटेडकडून सांगण्यात आले आहे. तर व्हीडिओकॉन इंडस्ट्रीज ही कंपनीही 18 जुनपासून BSE आणि NSE दोन्ही बाजारांमधून डिलिस्ट झाल्या. अनिल अग्रवाल यांची Twin Star Technologies व्हीडिओकॉन कंपनी विकत घेणार आहे. हा सौदा साधारण 3000 कोटी रुपयांचा असेल.यासाठी लवकरच Twin Star Technologies कडून 500 कोटी रुपये अदा करण्यात येणार आहेत. तर उर्वरित पैसे हे नॉन-कंवर्टिबल डिबेंचर्सच्या स्वरुपात चुकते केले जाणार आहेत.

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठा झटका

प्रचंड कर्जाचा बोझा असल्यामुळे मोदी सरकारकडून खासगीकरण करण्यात येणाऱ्या सार्वजनिक कंपन्यांच्या यादीत वरच्या स्थानावर असलेल्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना लवकरच मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना सध्या दिल्या जाणाऱ्या सुविधा काढून घेतल्या जाऊ शकतात. तसेच खासगीकरणानंतर एअर इंडियाचा ताबा दुसऱ्या कंपनीकडे गेल्यानंतर त्यांच्याकडूनही कर्मचाऱ्यांसाठी नव्या अटी-शर्ती लागू केल्या जाऊ शकतात.

मात्र, त्यापूर्वीच सरकारने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. याविरोधात एअर इंडिया कर्मचारी संघटनेने नागरी उड्डाण मंत्रालयाकडे दादही मागितली होती. खासगीकरणानंतरही एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा, भविष्य निर्वाह निधी, सुट्ट्यांचे पैसे मिळणे या सुविधा सुरुच राहिल्या पाहिजेत. या सुविधा कर्मचाऱ्यांसाठी कल्याणकारी असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानंतरही एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना सध्या आरोग्य सुविधा, भविष्य निधी योजना आणि मोफत विमानप्रवास अशा सुविधा मिळत आहेत. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही वर्षातून ठराविकवेळा मोफत विमानप्रवास करता येतो.

संबंधित बातम्या:

कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्यांसाठी SBI कडून स्वस्त व्याजदरात कर्ज, जाणून घ्या सर्वकाही

मुंबईतील डबेवाल्यांच्या मदतीसाठी परदेशी बँकेचा पुढाकार; 15 कोटींची मदत करणार

Non Stop LIVE Update
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.