AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

115 महिन्यांत दुप्पट होणारी गुंतवणूक? जाणून घ्या सविस्तर माहिती!

आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या योजनेत गुंतवणूक करण्याची खास पद्धत, ज्यामुळे तुम्ही फक्त 115 महिन्यांत तुमचे पैसे दुप्पट करू शकता. तर योग्य नियोजन आणि धोरणात्मक गुंतवणुकीने मिळणाऱ्या फायद्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख काळजीपूर्वक वाचा.

115 महिन्यांत दुप्पट होणारी गुंतवणूक? जाणून घ्या सविस्तर माहिती!
| Edited By: | Updated on: Jun 08, 2025 | 8:07 PM
Share

गुंतवणूक करायची आहे, पण शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील जोखीम घ्यायला तयार नाही का? तुमच्यासाठी एक सुरक्षित आणि सरकारी हमी असलेली योजना आहे — किसान विकास पत्र ( KVP )  ही योजना तुमचे पैसे सुमारे ९ वर्षे आणि ७ महिन्यांत (115 महिन्यांत) दुप्पट करते. सरकारची हमी असल्यामुळे गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहते. चला, जाणून घेऊया या योजनेंबाबत सविस्तर माहिती.

किसान विकास पत्र म्हणजे काय?

किसान विकास पत्र ही भारत सरकारची एक जुनी आणि लोकप्रिय छोटी बचत योजना आहे, जी १९८८ मध्ये सुरू करण्यात आली. सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी सुरू झालेली ही योजना आता प्रत्येक भारतीय नागरिकासाठी खुली आहे. या योजनेत गुंतवणूक जोखीममुक्त आहे आणि सरकारच्या हमीमुळे तुमचा पैसा सुरक्षित राहतो. सध्या या योजनेवर ७.५% वार्षिक चक्रवाढ व्याज मिळते, ज्यामुळे तुमची गुंतवणूक 115 महिन्यांत दुप्पट होते.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

1. किमान 1,000 रुपये गुंतवता येतात, आणि कमान मर्यादा नाही. तुम्ही कितीही रक्कम गुंतवू शकता.

2. एकल खातं, संयुक्त खातं (जास्तीत जास्त 3 प्रौढ), किंवा 10 वर्षांवरील मुलांच्या नावे खातं उघडू शकता. पालक लहान मुलांसाठी किंवा अक्षम व्यक्तींसाठी खातं उघडू शकतात.

3. सध्या 7.5% व्याजदराने 115 महिन्यांत तुमची रक्कम दुप्पट होते.

4.KVP प्रमाणपत्र एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसला हस्तांतरित करता येतं.

5. 2.5 वर्षांनंतर (30 महिने) तुम्ही गुंतवणूक आणि त्यावरील व्याज काढू शकता, पण पूर्ण परतावा मिळवण्यासाठी 115 महिने थांबावं लागेल.

कोण गुंतवणूक करू शकतं?

1. भारतातील कोणताही प्रौढ नागरिक.

2. 10 वर्षांवरील मुलं स्वतःच्या नावाने खातं उघडू शकतात.

3. पालक लहान मुलांसाठी किंवा अक्षम व्यक्तींसाठी खातं उघडू शकतात.

4.ट्रस्ट यात गुंतवणूक करू शकतात, पण सहकारी बँका किंवा सहकारी संस्थांना परवानगी नाही.

गुंतवणूक कशी करायची?

1. जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा निवडक सार्वजनिक बँकांमध्ये भेट द्या.

2. KVP अर्ज भरा आणि खालील कागदपत्रे सादर करा: आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र (कोणतेही एक ओळखपत्र), तसेच पत्त्याचा पुरावा (वीज बिल, पासपोर्ट इत्यादी).

3. पासपोर्ट आकाराचा फोटोही देणे आवश्यक आहे.

4. किमान ₹1,000 रोख, चेक किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे जमा करा.

5. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तुमची गुंतवणूक सुरळीत नोंदवली जाते. पोस्ट ऑफिस पासबुक किंवा ऑनलाईन पोर्टलवर डिजिटल रेकॉर्ड ठेवला जातो.

कर नियम

1. KVP मध्ये गुंतवणूक केल्यावर आयकर अधिनियमाच्या कलम 80C अंतर्गत कोणतीही कर सवलत मिळत नाही.

2. या योजनेतील व्याज “इतर स्त्रोतांतून मिळालेलं उत्पन्न” मानलं जातं आणि त्यावर कर भरावा लागतो.

3. व्याजावर TDS लागू होत नाही, पण कराची गणना स्वतः करावी लागते. तुम्ही व्याजावर दरवर्षी कर भरू शकता किंवा परिपक्वतेच्या वेळी एकरकमी कर भरू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.