Wedding Insurance Policy : आता लग्नाचा पण विमा; फायदे वाचून तुम्ही मागे राहू नका

Wedding Insurance Policy : तुम्ही म्हणाल आता ही कोणती विमा पॉलिसी आली बाजारात. तर मित्रांनो, आपल्याकडे विवाह हे पवित्र बंधन मानण्यात येते. या विवाह सोहळ्यात काहीच विपरीत घडू नये यासाठी काही अटी आणि शर्तींवर लग्न विमा पॉलिसी काढता येते.

Wedding Insurance Policy : आता लग्नाचा पण विमा; फायदे वाचून तुम्ही मागे राहू नका
लग्नाचा विमा, घ्यायलाच हवा
Follow us
| Updated on: May 24, 2024 | 12:17 PM

दोन व्यक्तींचा सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या एक होणे म्हणजे लग्न. पण विवाह सोहळा हा केवळ दोन व्यक्तींची भेट नाही. तर त्या दोघांचे कुटुंब, विचार, व्यवहार यासह सामाजिक मिलाफ या सर्वांचा त्यात समावेश होतो. लग्न तसे म्हटले तर समाजातील एक छोटा घटक आहे. एक छोटं युनिट, पण ते समाजाला पुढे आकार देण्याचं काम करतं. या पवित्र नात्यावर पुढे समाजातील अनेक गोष्टींवर, घटकांवर परिणाम होतो. त्यामुळे अशा पवित्र कार्यात विम्याचा विषय कसा काय येऊ शकतो बुवा? असा प्रश्न तुम्हाला पडले असेल, नाही का? जाणून घेऊयात…

लग्नाचा धुमधडाका

लग्न हा आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. तो कायम स्मरणात राहावा यासाठी अनेक जण विवाह हा सोहळा करतात. धुमधडाक्यात लग्न करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. नातेवाईकांना, आप्तेष्टांना, इष्टमित्रांना एकत्र आणण्याचे हे एक माध्यम ठरते. त्यामुळे आजकाल लग्नाला एखाद्या इव्हेंट सारखं साजरं केलं जाते. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या आकड्यांवरुन ही गोष्ट समोर येते. या वर्षी संपूर्ण देशात जवळपास 35 लाख लग्न लागले. त्यावर जवळपास 4.25 लाख कोटींचा खर्च करण्यात आल्याचा अंदाज या संस्थेने वर्तवला आहे.

हे सुद्धा वाचा

लग्नकार्यावर मोठा खर्च

ग्लोबल वेडिंग सर्व्हिसेज मार्केटच्या आकड्यानुसार, 2020 मध्ये लग्न कार्यावर 60.5 अब्ज डॉलर इतका खर्च करण्यात आला होता. तर 20230 पर्यंत लग्नावरील खर्चाचा आकडा हा 414.2 अब्ज डॉलरवर पोहचेल. पण लग्नकार्यात सर्वच काही सुरळीत होते असे नाही. काही लग्न कार्यात इतर विघ्न पण येतात. कुठे सिलेंडरचा स्फोट होतो. तर कुठे चोरी होते, दागदागिने चोरीला जातात. तर लग्नस्थळी आग लागण्याचे आणि कुणाला तरी इजा होण्याचे प्रकार घडतात. अशावेळी आता कंपन्यांनी लग्न विमा पॉलिसी (Wedding Insurance Policy) सुरु केली आहे. ही पॉलिसी एखाद्या सुरक्षा कवचासारखी काम करते. या पॉलिसीचा हप्ता तुमच्या एकूण लग्नानुसार निश्चित होतो.

विम्यात काय काय होते कव्हर

  1. जर लग्न काही कारणांमुळे रद्द झाले. काही कारणांमुळे लग्न पुढे ढकलले. अशावेळी लग्नासाठीचा केलेला खर्च जसे की कॅटरिंग, हॉल बुकिंग, बँडबाजा इतर खर्च यासाठी हा विमा उपयोगी पडतो. विमा कंपनी ही नुकसान भरपाई देते. अर्थात त्यातही अटी आणि शर्ती असतीलच. या पॉलिसीत ॲड ऑन आणि रायडर्सची सुविधा मिळते. त्यामुळे लग्नस्थळी पोहचताना अपघात घडला तर त्यामाध्यमातून मदत मिळते.
  2. लग्नात दागिने, कपडे अथवा इतर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्यास विम्याचे संरक्षण मिळते. पाऊस, वादळ अथवा भूकंपामुळे लग्नाचा कार्यक्रम रद्द करावा लागल्यास विमा कंपनी नुकसान भरपाई देते. लग्नस्थळी पोहचताना अपघातात वऱ्हाड्याना दुखापत झाल्यास, अपंगत्व आल्यास मृत्यू झाल्यास ॲड ऑन आणि रायडर्स सुविधेनुसार भरपाई मिळते.

या परिस्थितीत नाही मिळत भरपाई?

एखाद्या वादामुळे, किरकोळ कारणांमुळे लग्न रद्द करावे लागले तर विमा कंपनी नुकसान भरपाई देत नाही. हुंड्याच्या कारणावरुन लग्न मोडल्यास भरपाई विसरुन जा. लग्नात निष्काळजीपणे अथवा जाणूनबुजून नुकसान झाल्याचे लक्षात आल्यावर भरपाईची रक्कम मिळत नाही. आत्महत्या, आत्महत्येचा प्रयत्न अथवा वर, वधू पसंत नसल्याच्या कारणावरुन दोघांपैकी एकाने स्वतःला इजा केल्यास भरपाईची रक्कम विमा कंपनी देत नाही.

Non Stop LIVE Update
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?.
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?.
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट.
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक.
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका.
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी.
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका.
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?.
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत.
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात.