धीरूभाई अंबानी यांचं खरं नाव काय?, त्यांनी कोणत्या वयात सुरु केली रिलायन्स इंडस्ट्री ?
नावात काय आहे असे म्हटले जात असले तरी नावातच सर्वकाही आहे ? मुकेश अंबानी यांचे पिताश्री धीरुभाई अंबानी यांनी या कंपनीचा वेलु कोणत्या वयात लावला आणि त्यांचे खरे नाव नेमके काय आहे ?

ज्या कंपनीमुळे सध्या मुकेश अंबानी १०० अब्ज डॉलर नेटवर्थ क्लबमध्ये सामील झाले, आशियातील सर्वात श्रीमंत असल्याचा मान त्यांना मिळाला आहे. देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आहेत. त्या कंपनीची सुरुवात त्यांचे पिताश्री ज्यांना सारे जग धीरुभाई अंबानी या नावाने ओळखते त्यांनी केली. रिलायन्स इंडस्ट्रीज सुरुवातीला कापड व्यवसायात उतरले. त्यानंतर पेट्रोकेमिकल्स व्यवसायात त्यांनी नाव कमावले. त्यानंतर मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी वेगवेगळे झाले. त्यानंतर याच रिलायन्स इंडस्ट्रीजला मुकेश अंबानी यांनी मोठे केले. मुकेश अंबानी यांचा रिलायन्स ग्रुप सध्या ओटुसीच्या संगतीने रिटेल,टेलिकॉम सह टेकमध्ये विस्तार केला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज मोठे होण्यामागे धीरुभाई अंबानी यांचे कष्ट आहेत. परंतू त्या धीरुभाई अंबानी यांचे खरे नाव तुम्हाला माहीती आहे का? जग रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक म्हणून त्यांना ओळखते. ते त्यांचे खरे नाव नाही. सध्या अनेक लोकांना त्यांचे खरे नाव माहिती नसेल.त्यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ कितव्या वयात केली होती हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. दोन्ही प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात…
धीरूभाई अंबानी याचं खरं नाव काय ?
अंबानी त्यांचे आडनाव आहे. धीरुभाई हे त्याचं काही खरे नाव नाही.हे त्याचं निकनेम आहे लोक त्यांना प्रेमाने या नावाने बोलवतात. मग खरा प्रश्न आहे की त्याचं खरे नाव काय आहे ? धीरुभाई अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजचे फाऊंडरचे खरे नाव धीरजलाल हिरालाल अंबानी आहे. त्यांना लोक धीरुभाई नावाने देखील बोलवतात.त्यांचा जन्म २८ डिसेंबर १९३२ रोजी झाला होता. त्यांचा मृत्यू ६ जुलै २००२ रोजी ७० व्या वयात झाला. त्यांनी निधनापूर्वीच रिलायन्स इंडस्ट्रीजला देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणून निर्माण केले होते. देशातच नव्हे तर जगात त्यांच्या कंपनीचा दबदबा आहे. रिलायन्सचा थेट मुकाबला टाटा ग्रुपशी आहे.
कोणत्या वयात सुरु केली कंपनी?
धीरुभाई हीरालाल अंबानी यांनी रिलायन्सची सुरुवात १९५८ साली केली त्यावेळी तर केवल २५ वर्षांचे होते. त्यानंतर कंपनीने कधीच मागे वळून पाहीले नाही. स्टॅटिस्टीकाने अलिकडे एक लिस्ट जारी केली आहे,त्यात ज्या उद्योजकांचे नाव आहे त्यात कमी वयात स्वत:चा उद्योग उभारणाऱ्याची नावे दिलेली आहेत.. त्यात बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग यांच्यासह ओयोचे फाऊंडर रितेश अग्रवाल यांचे नाव देखील सामील आहे. त्यांनी त्यांच्या व्यवसायाची सुरुवात २१-२२ वर्षांच्या वयात सुरुवात केली. त्यानंतर धीरुभाई अंबानी अर्थात धीरजलाल हिरालाल अंबानी यांचे नाव झळकले आहे.
रिलायंस इंडस्ट्रीजचा विस्तार
रिलायंस इंडस्ट्रीज देशाची सर्वात मोठी कंपनी बनली असून तिचे मार्केट कॅप – १९ लाख कोटी रुपयांच्या पलिकडे गेले आहे. सध्या कंपनीचा शेअर १४०० रुपयांच्या पुढे कारभार करीत आहे. अलिकडे रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअरमध्ये लागोपाठ तेजी पाहायला मिळत आहे. कंपनीने अलिकडे आपल्या चौथ्या तिमाहीचे आकडे जारी केले. कंपनीचे नेटवर्थ १० लाख रुपयांच्या पार गेले आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीचे नेट प्रॉफिट २ टक्क्यांच्या तेजीसह १९ हजार कोटी रुपयांच्या पार गेले आहे. रिटेल आणि टेलिकाम शाखेचा आयपीओ लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे.
