AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold ETF Vs Mutual Fund : सोन्यात गुंतवणुकीचे सर्वात भारी 2 पर्याय, गोल्ड ETF आणि गोल्ड म्युच्यूअल फंड म्हणजे नेमकं काय?

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भावात घसरण झाल्याचे पाहायला मिलत आहे. असे असतानाच आता गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड म्युच्यूअल फंड यांची चर्चा होत आहे.

Gold ETF Vs Mutual Fund : सोन्यात गुंतवणुकीचे सर्वात भारी 2 पर्याय, गोल्ड ETF आणि गोल्ड म्युच्यूअल फंड म्हणजे नेमकं काय?
gold etf and gold mutual fund
| Updated on: Nov 02, 2025 | 6:44 PM
Share

Gold ETF And Gold Mutual Fund : सध्या सोन्याच्या भावामध्ये घसरण झाली आहे. सोन्याचा भाव कमी झालेला पाहून आता अनेक गुंतवणूकदार या महागड्या धातूमध्ये पैसे गुंतवत आहेत. भारतात सोन्यातील गुंतवणूक ही फक्त पैसे कमवण्यासाठीच केली जात नाही. सोने हा भारतात भावणिक विषय आहे. सध्या लोक सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत आहेत. याच पार्श्वभूमीवर गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड म्युच्यूअल फंड या दोन पर्यायांची चांगलीच चर्चा होत आहे. हे दोन्ही पर्याय नेमके काय आहेत? हे जाणून घेऊ या…

गोल्ड ईटीएफ म्हणजे नेमकं काय?

गोल्ड ETF (Exchange Traded Fund) मध्ये प्रत्येक युनीटमध्ये 1 ग्रॅम सोने असते. या सोन्याची शुद्धता ही 99.5 टक्के असते. विशेष म्हणजे हे सोने शेअर बाजारातून खरेदी तसेच विकता येते. त्यामुळेच गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे डीमॅट खाते असणे गरजेचे आहे. ईटीएफचा दर हा शेअर्सप्रमाणेच दिवसभरात बदलत राहतो. सोन्याचा भाव पाच टक्क्यांनी वाढला तर गोल्ड ईटीएफची किंमतही तेवढीच वाढते. गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक केली तर सोन्याची चोरी होण्याची शक्यता नसते. तसेच सोन्याच्या शुद्धतेबाबतही कोणतीही शंका निर्माण होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तुम्ही गरजेनुसार गोल्ड ईटीएफद्वारे घेतलेले सोने विकूदेखील शकता.

गोल्ड म्युच्यूअल फंड म्हणजे काय?

ज्या लोकांकडे डीमॅट खाते नाही. त्यांच्यासाठी गोल्ड म्युच्यूअल फंड हा चांगला पर्याय आहे. या फंडाच्या माध्यमातून फंड व्यवस्थापक तुम्ही दिलेल्या पैशांची गुंतवणूक थेट सोने किंवा गोल्ड ईटीएफमध्ये करतात. एसायपीच्या माध्यमातून तुम्हाला गोल्ड म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करता येते. RiddiSiddhi Bullions Ltd. चे एमडी पृथ्वीराज कोठारी यांच्या मतानुसार नव्या गुंतवणूकदारांसाठी गोल्ड म्युच्यूअल फंड सोईचा आहे. तर रियल टाईम ट्रेडिंग आणि लिक्विडिटीसाठी ईटीएफ चांगला पर्याय ठेवू शकतो.

चर्चेस आणि इतर खर्च किती असतो?

गोल्ड ETFs मध्ये एक्स्पेन्स रेशो (0.4%0.7%) असतो. याच्या माध्यमातून फंड मॅनेजमेंट आणि इतर खर्च केला जातो. यासह ब्रोकरेज आणि डिमॅट चार्जेसही द्यावे लागतात. दुसरीकडे गोल्ड म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करायची असेल तर थोडे जास्त (0.8%1.5%) चार्जेस द्यावे लागतात. कारण यात ईटीएफचाही खर्च जोडलेला असतो.

दरम्यान, गेल्या दहा वर्षांत गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड म्युच्यूअल फंड या दोघांनीही साधारण 13 ते 14 टक्क्यांनी रिटर्न्स दिलेले आहेत. तुलनेने गोल्ड ईटीएफने थोडी चांगली कामगिरी केलेली आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Follow Us
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....