AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Transfer Pricing : आता ही काय नवीन भानगड? बीबीसीवर आयकर धाडीमागचे काय आहे खरे कारण

Transfer Pricing : BBC च्या भारतातील कार्यालयावर आज प्राप्तिकर कार्यालयाने धाड टाकली. ही बातमी वणव्यासारखी जगभरात पसरली. यामध्ये ट्रांसफर प्राईसिंग हा मुद्दा खूप गाजला. तर ही हस्तांतरण किंमती आहे तरी काय?

Transfer Pricing : आता ही काय नवीन भानगड? बीबीसीवर आयकर धाडीमागचे काय आहे खरे कारण
| Updated on: Feb 14, 2023 | 6:34 PM
Share

नवी दिल्ली : बीबीसीच्या भारतातील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) धाड टाकल्याची बातमी वणव्यासारखी सगळीकडे पसरली. केंद्र सरकारशी संबंधित सूत्रांनी मात्र ही धाड नसल्याचे स्पष्ट केले आहे. हे सर्वेक्षण आहे. ही चौकशी, तपास अथवा धाड नाही, असे सूत्रांनी सांगितले. बीबीसीने (British Broadcasting Corporation) मुद्यामहून ट्रान्सफर प्राइसिंग नियमांचे (Non-compliance with the Transfer Pricing Rules) पालन केले नसल्याचे सांगण्यात येत आहे. तर ट्रान्सफर प्राइसिंग ही काय भानगड आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. बीबीसीच्या भारतातील कार्यालयावरील धाडीमागचे कारण अनेकांना राजकीय वाटत असले तरी प्राप्तिकर खात्याच्या सूत्रांनी मात्र ट्रान्सफर प्राइसिंगचा मुद्दा पुढे केला आहे.

किंमत हस्तांतरण (Transfer Pricing) ही एक लेखा परिक्षणाची (Accounting) प्रक्रिया आहे. मुख्य कंपनीतील एका विभागाकडून दुसऱ्या विभागाच्या मुल्याचे प्रतिनिधित्व यातून अधोरेखित होते. एका कंपनीतील एक विभाग दुसऱ्या विभागाकडून वस्तू अथवा सेवा यासंदर्भातील व्यवहार करणार असेल तर हा प्रक्रिया होते. या दोन विभागात कोणतीही रोखीतील खरेदी-विक्री होत नाही. लेखा विभाग त्याची केवळ नोंद करतो. त्याला प्राप्तिकर खात्याच्या भाषेत ट्रान्सफर प्राइसिंग असे म्हणतात.

ट्रान्सफर प्राईसिंग वर यापूर्वीही मोठा वाद उभा ठाकला आहे. यासंबंधी आयकर विभागाने नियम तयार केले आहेत. त्याला ट्रान्सफर प्राइसिंग नियम असे म्हणतात. ट्रान्सफर प्राइसिंगमुळे कंपनीतील विविध विभागातील सेवा, वस्तू विनियमाची नोंद होते. मुख्य कंपनीच्या सहायक कंपन्या, सहयोगी कंपन्या वा नियंत्रण असणाऱ्या कंपन्या यांच्यामध्ये वस्तू आणि सेवांचे आदान-प्रदान करण्यात येते. त्याला मंजुरी देण्यात येते.

अर्थात कंपन्या याचा गैरफायदा घेतात. नियमाला वाकुल्या दाखवितात. कर वाचविण्यासाठी ज्या देशात कमी कर आहे, तिकडे किंमतींचे हस्तांतरण करण्यात येते. अशा प्रकारचे हस्तांतर थोपविण्यासाठी कराचे नियमन करणाऱ्या संस्था कडक पाऊले टाकतात. या नियमांच्या आडून कंपन्या मोठा फायदा कमवितात.

केंद्र सरकारशी संबंधित काही सूत्रांनी बीबीसीवरील कारवाईसंदर्भात माहिती दिली. त्यानुसार, बीबीसीने अनेक दिवसांपासून ट्रान्सफर प्राइसिंगसंदर्भातील नियमांचे पालन केलेले नाही. त्याचा परिणाम म्हणून बीबीसीला नोटीस बजाविण्यात आली आहे. सूत्रांच्या दाव्यानुसार बीबीसी या नियमांकडे सातत्याने कानाडोळा करत आहे. बीबीसी या नियमांचे पालन करत नाही. आज केलेल्या या कारवाईला सर्वेक्षण असे सांगण्यात येत आहे. या सर्वेक्षणातून (Income Tax Survey) बीबीसीने किती कर चोरी केली हे तपासण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Follow Us
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओम
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओमराजे CM भेटीत असं काय घडलं?
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री... कथित डॉनच्या घरावर छापा
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं,
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं, महाजन यांचा पत्ता कट?
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका
6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका फोटोत ओमराजेंसह...
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले.
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले...
ओमराजे निंबाळकरांबाबत सर्वात मोठी अपडेट; थेट RSS... राज्याच्या राजकारण
ओमराजे निंबाळकरांबाबत सर्वात मोठी अपडेट; थेट RSS... राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?