AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LTI-Mindtree: विलिनीकरण, आयटी क्षेत्रासह गुंतवणुकदारांची चांदी की धोक्याची नांदी?

एलटीआय- माइंडट्री (LTI Mindtree) या दोन शेअरच्या विलिनीकरणानंतर मोतीलाल ओसवाल यांनी दोन्ही समभागांवर न्युट्रल रेटिंग कायम ठेवले आहे. ही दीर्घकालीन मोठी संधी असली तरी त्यात जोखीम असल्याचे दिसून येत आहे.

LTI-Mindtree: विलिनीकरण, आयटी क्षेत्रासह गुंतवणुकदारांची चांदी की धोक्याची नांदी?
LTI Mindtree mergerImage Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: May 10, 2022 | 9:33 AM
Share

एलटीआय- माइंडट्री (LTI-Mindtree) विलिनीकरणानंतर त्याचे आयटी क्षेत्रावर दीर्घकालीन परिणाम दिसून येणार आहे. तसेच गुंतवणुकदारांवर याचा काय परिणाम होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. विश्लेषकांच्या मते या विलिनीकरणामुळे मजबूत दीर्घकालीन संभाव्यता दिसून येत आहे. असे असले तरी संजय जालोनाने लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक (Larsen & Toubro Infotech (LTI)) सोडत आहे, विश्लेषकांच्या मते ही बाब नक्कीच चांगली नाही, यामुळे बाजारात नजीकच्या काळात जोखीम जास्त आहे. या विलिनीकरणाबाबत विश्लेषकांचा दावा वेगळा आहे. त्यांनी या विलिनीकरणाचे भविष्यातील दडलेली संधी म्हटले असले तरी सध्या या विलिनीकरणाने नैराश्याचे वातावरण असल्याचे म्हटले आहे. यामुळे या शेअरमधील गुंतवणूक जोखमेची होऊ शकेल. त्यात येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात उलाढाल दिसून येईल असे विश्लेषकांचे मत आहे. विश्लेषकांना सध्या इन्फोसिस (Infosys) आणि टीसीएसच्या (TCS) भरवश्याचे खेळाडू वाटत आहेत. विलिनीकरणातील या दोन्ही कंपन्यांच्या शेअरचे पारंपारिक आणि प्रचलित पद्धतीने मूल्यमापन केले असता, दोन्ही शेअर (stocks) कधी तटस्थ तर कधी नकारत्मक आहे. त्यामुळे अल्पकालीन अस्थिरतेची भीती आहे.

प्रत्येक 100 माइंडट्री शेअर्ससाठी (Mindtree shares) 73 एलटीआय शेअर्सचे स्वॅप रेशो सध्याच्या शेअरच्या किंमतीवर दोन्ही कंपन्यांसाठी तटस्थ आहे. यामुळे माइंडट्री च्या भागधारकांना (Mindtree’s shareholders) 12 कोटी नवे एलटीआय शेअर्स जारी होतील आणि एलटीआयच्या भागधारकांसाठी 41 टक्के सूट मिळेल, असे विश्लेषकांनी म्हटले आहे. मोतीलाल ओसवाल यांनी दोन्ही समभागांवर ‘न्यूट्रल’ रेटिंग कायम राखले आहे,ही दीर्घकालीन मोठी संधी असली तरी त्यात जोखीम असल्याचे दिसून येत आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एमडी जालोना यांच्या जाण्याकडे आम्ही एलटीआयसाठी एक महत्त्वाची चिंता म्हणून पाहतो कारण ते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाल्यापासून गेल्या सात वर्षांत कंपनीच्या प्रगतीचे मुख्य शिल्पकार राहिले आहेत. त्यांच्या प्रदीर्घ कार्यकाळात पाहता त्यांनी एक सक्षम टीम उभी केली आणि समन्वयातून या टीमने नावलौकिक कमावले. डेबाशीस चॅटर्जी यांनी मिंडट्रीच्या संस्थापक संघाने कंपनीतून बाहेर पडल्यानंतर त्याला टिकवून ठेवण्यात आणि पुन्हा तयार करण्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे, परंतु आम्ही एलटीआयमधील कोणत्याही एक्झिटवर लक्ष ठेवू, ज्याचा नजीकच्या काळात परिणाम होऊ शकतो,” असे त्यात म्हटले आहे. चॅटर्जी हे माइंडट्री चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आहेत.

एडलविसने (Edelweiss) या विलिनीकरणाबाबत विश्लेषण केले आहे. बाजारातील सध्याच्या पुरवठासाखळीचा विचार करता उच्च स्तरावर जोखीम दिसून येते तर थोडे नैराश्याचे ढग ही दिसून येत असल्याचे त्यांचे मत आहे. यामुळे बाजारात तीव्र स्पर्धा दिसून येईल असे एडलविसचे मत आहे.

कंपन्या आणि त्यांची बाजू

एल अँड टीच्या पालकत्वाखाली कार्यरत कंपन्या त्यांच्या एकिकरणामुळे प्रगती साधतील तर पुरवठ्याच्या काही साखळ्यात माईंडट्रीची कामगिरी चांगली आहे. एलटीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी कंपनी सोडून जात असल्याने ती जोखीम ठरु शकते. माईंडट्रीची उलाढाल, त्यांचा प्रगतीचा आलेख, नफा या जमेच्या बाजू ठरु शकतात. या विलिनीकरणामुळे या शेअरवर काही काळ अस्थिरतेचा प्रभाव आहे असे असले तरी या दोन कंपन्यांच्या विलिनीकरणामुळे आयटी क्षेत्रातील वाढीच्या नेतृत्वाचा पाया रचला गेला आहे.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....