Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Whatsapp Payment : 9 सोप्या स्टेप्समध्ये शिका व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटचा फंडा

Whatsapp वर यूपीआय आधारित पेमेंट सेवा सुरु झाली असून तुम्ही काँटॅक्सपैकी कोणालाही पैसे पाठवू शकता

Whatsapp Payment : 9 सोप्या स्टेप्समध्ये शिका व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटचा फंडा
Follow us
| Updated on: Dec 17, 2020 | 9:24 AM

मुंबई : बाहेर फिरायला गेल्यावर रेस्टॉरंट, सिनेमा, शॉपिंग असं काहीही करण्यासाठी तुमच्या खिशात रोख रक्कम नसली तरी चालेल, पण मोबाईल मस्ट आहे. डिजिटल इंडियाच्या जमान्यात सर्व आर्थिक व्यवहारही ऑनलाईन होत आहेत. पेटीएम, गूगल पे, फोन पे (Paytm, Google pay, Phone Pay) या यूपीआय आधारित अ‍ॅप्ससोबतच व्हॉट्सअ‍ॅपचीही पेमेंट सुविधा सुरु झाली आहे. (Whatsapp Payment process how to transfer money by whatsapp know all the necessary information)

व्हॉट्सअ‍ॅपला भारतात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (NPCI) यूपीआय (UPI) आधारित पेमेंट सेवा सुरु करण्याची परवानगी मिळाली आहे. व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सुविधा मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजीसह 10 भाषांमध्ये सुरु करण्यात आली आहे. या सेवेअंतर्गत तुम्ही कधीही, कुठेही, कोणालाही ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करु शकता. सर्वात आधी तुमचं व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करुन घ्या, तरच तुम्हाला पैसे ट्रान्सफर करण्याचा ऑप्शन दिसेल

Whatsapp वर पेमेंट फीचर सुरु कसे कराल?

Step 1 : Whatsapp सुरु केल्यानंतर वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असलेल्या 3 डॉट्स वर क्लिक करा. Step 2 : Settings ओपन केल्यावर Payments चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा Step 3 : Whatsapp तुम्हाला Bank Account link करण्यास सांगेल. (त्या बँक अकाऊंटशी लिंक्ड असलेलं सिमकार्ड तुमच्या मोबाईलमध्ये अ‍ॅक्टिव्हेट असेल, आणि व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट त्याच नंबरशी लिंक्ड असेल, याची खात्री करा) Step 4 : Bank Account link करताना Whatsapp तुम्हाला काही नियम आणि अटींवर (Terms & Conditions) Agree करण्यास सांगेल. तुम्ही I agree बटणावर क्लिक करु शकता अथवा मागच्या मेनू मध्ये जाऊ शकता. Step 5 : Terms & Conditions स्वीकारल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर Verify करावा लागेल. इथून पुढे यूपीआय (UPI) व्हेरिफिकेशनला सुरुवात होईल. Step 6 : मोबाईल नंबर व्हेरिफाय केल्यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्हाला विविध बँकांच्या नावांची यादी दिसेल. त्यापैकी तुम्हाला तुमची बँक निवडायची आहे. Step 7. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला VPA म्हणजेच Virtual Payee Address बनवण्यास सांगेल, तुम्ही त्यावर क्लिक करा, VPA तयार होईल. (Whatsapp Payment process how to transfer money by whatsapp know all the necessary information) Step 8. व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डवरील शेवटचे सहा अंक विचारेल. तसेच इतरही काही माहितीची मागणी केली जाईल (डेबिट कार्डवरील एक्सपयरी डेट, तुमची जन्मतारीख इत्यादी) Step 9. त्यानंतर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवरील मनी ट्रान्सफर हे फिचर वापरु शकता.

Whatsapp वरुन पैसे ट्रान्सफर कसे कराल?

  • ●  तुमचे बँक अकाऊंट डिटेल अपडेट झाल्यानंतर तुम्ही पैसे ट्रान्सफर किंवा रिसीव्ह करु शकाल.
  • ●  तुमच्या काँटॅक्ट लिस्टमधील ज्या व्यक्तीला तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत, त्याचे चॅट ओपन करुन पेमेंट ऑप्शनवर जा.
  • ●  ज्या बँक अकाऊंटमधून पैसे ट्रान्सफर करायचे आहेत, ते सिलेक्ट करा
  • ● आता रक्कम टाकून ट्रांझॅक्शन पूर्ण करण्यासाठी तुमचा UPI पिन टाका.
  • ● पिन टाकल्यावर कन्फर्मेशन मेसेजसोबतच तुमचे ट्रांझॅक्शन सक्सेसफुल होईल.

संबंधित बातम्या

Whatsapp वरुन पैसे ट्रान्सफर करा; भारतात UPI आधारित पेमेंट सेवा सुरू करण्याची परवानगी

Whatsapp पेमेंट्सचा वापर करणार आहात? त्याआधी ‘या’ सहा गोष्टी लक्षात ठेवा

(Whatsapp Payment process how to transfer money by whatsapp know all the necessary information)

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.