AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amazon Sale: पैसे तयार ठेवा! ‘या’ तारखेपासून ॲमेझॉनवर सेल सुरू होणार, वाचा ऑफर्स…

Amazon Great Indian Festival Sale 2025: लवकरच ॲमेझॉनचा सर्वात मोठा शॉपिंग फेस्टिव्हल, ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2025 सुरू होणार आहे. याची तारीख आणि ऑफर जाणून घेऊयात.

Amazon Sale:  पैसे तयार ठेवा! 'या' तारखेपासून ॲमेझॉनवर सेल सुरू होणार, वाचा ऑफर्स...
Amazon Sale
| Updated on: Sep 14, 2025 | 4:06 PM
Share

ऑनलाईन शॉपिंग करण्याची आवड असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता लवकरच ॲमेझॉनचा सर्वात मोठा शॉपिंग फेस्टिव्हल, ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2025 सुरू होणार आहे. ॲमेझॉनच्या प्राइम सदस्यांना सेल सुरू होण्याच्या 24 तास आधी डीलचा लाभ घेता येणार आहे. हा सेल सुरु होण्याच्या आधीच कंपनीने स्मार्टफोन, होम डिव्हाइसेस, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर वस्तूंवर मिळणाऱ्या ऑफरची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. अनेक वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. तसेच बँक डिस्काउंट आणि कॅशबॅक ऑफरमुळे या किंती आणखी कमी होणार आहेत. या सेलबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची तारीख आणि वेळ

ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 23 सप्टेंबर रोजी मध्यरात्री सुरू होणार आहे. मात्र जर तुमच्याकडे ॲमेझॉन प्राइमचे सब्सक्रिप्शन असेल तर तुम्हाला 24 तास आधीच या एक्सक्लुझिव्ह डीलचा लाभ घेता येणार आहे. उर्वरित सदस्यांना 23 सप्टेंबर पासून या सेलचा लाभ घेता येणार आहे.

ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये काय ऑफर मिळणार?

ॲमेझॉनने या सेलमध्ये किती सूट मिळणार याची सविस्तर माहिती दिलेली नाही. मात्र स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स, लॅपटॉप आणि होम डिव्हाइसेससह अनेक वस्तूंवर 40 % पर्यंत सूट मिळणार आहे. तसेच ग्राहकांनी एसबीआय क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास त्यांना तात्काळ 10 % सूट दिली जाणार आहे. तसेच तुमच्यासाठी विविध बँक ऑफर्स देखील उपलब्ध असणार आहेत. तसेच ॲमेझॉन कंपनी एक्सचेंज ऑफरसह 24 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील देत आहे.

भारतातील जीएसटी स्लॅबमध्येही बदल झालेला आहे. त्यामुळे बऱ्यांच वस्तूंच्या किंमतीही कमी होणार आहेत. त्यामुळे पैशांची आणखी बचत होणार आहे. तसेच घरगुती उपकरणे, टेलिव्हिजनसह विविध वस्तूंच्या खरेदीवर 28% पर्यंत सूट मिळण्याची शक्यता आहे.

स्मार्टफोनवर खास ऑफर

या सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी एस 24 अल्ट्रा, गॅलेक्सी झेड फोल्ड 6, वनप्लस 13 सिरीज आणि आयक्यूओ 13 5जी सारख्या फ्लॅगशिप स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात सूट मिळणार आहे. तसेच अ‍ॅपल प्रेमींना आयफोन 15 वर चांलगी डील मिळण्याची शक्यता आहे. तेच वनप्लस 13आर, आयक्यूओ निओ 10 आणि विवो व्ही 60 अशा स्मार्टफोनवर चांगली सूट मिळण्याची शक्यता आहे.

...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.