कोण आहेत राधा वेम्बू, अभ्यास करता करता उभी केली 8703 कोटीची कंपनी
भारतात अब्जाधीशांची संख्या वेगाने वाढत आहे.साल 2024 मध्ये सुमारे 334 व्यक्ती अब्जाधीश झाल्या आहेत. गेल्यावर्षी पेक्षा ही संख्या 75 ने अधिक आहे. मुंबई आणि चेन्नईत भारताचे सर्वात जास्त अब्जाधीश राहत आहेत.
इच्छा तेथे मार्ग असतो. तुम्ही जर असेल माझा हरी दर देईल खाटल्यावरी असे मानत असाल तर तुमची प्रगती कधीच होणार नाही. प्रगतीसाठी झोप विसरुन काम करावे लागते, घाम गाळावाच लागतो. पुरुषाच्या जगात एक महिला उद्योजक म्हणून आघाडीवर असलेल्या राधा वेम्बू यांनी अभ्यास करता करता एक कंपनी स्थापन केली. आणि आज या कंपनीचे बाजारमूल्य 8703 कोटी रुपये आहे. चेन्नईच्या रहिवासी असेलेल्या राधा वेम्बू यांनी आपल्या भावासोबत सॉफ्टवेयर इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. आता त्या भारतातील सर्वात श्रीमंत सेल्फ मेड वुमन अब्जाधीश झाल्या आहेत. (Radha Vembu) राधा वेम्बू यांची नेटवर्थ पाहून तुम्हाला धक्का बसेल…
राधा वेम्बू भारतातील सर्वात श्रीमंत महिला उद्योजकात तिसऱ्या असल्याचे आकडेवारी सांगते. त्यांनी सॉफ्टवेअर उद्योगातून ही संपत्ती मिळविली आहे. त्यांची एकूण संपत्ती 47,500 रुपये इतकी आहे. त्या चेन्नईच्या सर्वात श्रीमंत आणि भारताच्या सर्वात सेल्ड मेड अब्जाधीश आहेत.
राधा वेम्बू यांनी कशी केली कंपनीची सुरुवात?
राधा वेम्बू यांचा जन्म 24 डिसेंबर 1972 रोजी चेन्नईत झाला होता, चेन्नईतील नॅशनल हायर सेकेंडरी स्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी IIT मद्रास मधून डिग्री घेतली आहे. त्यानंतर त्यांनी इंडस्ट्रीयल मॅनेजमेंटची डिग्री मिळविले. हायर एजुकेशन दरम्यान राधा वेम्बू यांनी सॉफ्टवेयर सेक्टर क्षेत्रातील वारे ओळखत 1996 मध्ये जोहो कॉर्पोरेशनची स्थापना केली. या कंपनीला आधी एडवेंटनेट नावाने ओळखले जात होते. कठोर मेहनत आणि धडाकेबाज निर्णय घेत त्यांनी ग्लोबल लीडर म्हणून या कंपनीची स्थापना केली होती. जोहो कॉर्पोरेशन ही एक सॉफ्टवेअर सॉल्यूशन कंपनीची कंपनीची स्थापना केली होती. जी आता तब्बल 8,703 कोटी रुपयांची कंपनी बनली आहे.