AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी नाही, त्यांनी आमचे ‘बटर चिकन’ चोरले, हायकोर्टात मालकीचे सज्जड पुरावेच दिले

बटर चिकन... आलं न तोंडाला पाणी. पण ही खास डिश कोणाची यावरुन लढाई सुरु आहे. प्रत्येक गावाचा एखादा खाद्यपदार्थ लोकप्रिय असतो. तिथं गेलो की तो पदार्थ खाल्याशिवाय जमत नाही. आपल्या हॉटेलमध्ये पहिल्यांदा बटर चिकन तयार झाल्याचा दावा सध्या करण्यात येत आहे.

मी नाही, त्यांनी आमचे 'बटर चिकन' चोरले, हायकोर्टात मालकीचे सज्जड पुरावेच दिले
बटर चिकनचा मालक तरी कोण?
| Updated on: May 18, 2024 | 2:57 PM
Share

भाजलेले चिकन टोमॅटोची क्रीमी आणि लोण्यासारखी माऊसूद ग्रेव्हीत शिजवले, त्यात हात अखडता न घेता बटर टाकले की तयार होते, लाखो खवय्यांची आवडती डिश, बटर चिकन. भारत-पाकिस्तानच्या विभाजनानंतर ही डिश संपूर्ण जगात पसरली. तिने भारतीय खाद्यसंस्कृतीला नवी ओळख दिली. पण आता स्वतःचीच ओळख कोणती हे सिद्ध करण्यासाठी बटर चिकन सध्या कोर्टकचेरीच्या फेऱ्यात अडकली आहे. ही खास डिश आमच्याच हॉटेलमध्ये अगोदर तयार झाल्याचा दावा करत दोन मित्रांच्या आताच्या पिढ्या न्यायालयीन लढाई लढत आहेत. काय आहे हे प्रकरण…

बटर चिकनचा शोध लावला कोणी?

तर बटर चिकनचा शोध लावला तरी कोणी? असा गंभीर प्रश्न खवय्यांना कधी पडला नाही. कारण ताव मारण्यात आणि पेटपूजेतून त्यांना कुठली आलीये फुरसत? पण जुन्या दिल्लीतील दोन हॉटेल मात्र आम्हीच या डिशचे बाप आहोत हे सिद्ध करण्यासाठी भांड भांड भांडत आहेत. दिल्लीतील ‘मोती महल’ आणि ‘दरियागंज’ ही दोन्ही रेस्टॉरंट एकमेकांसमोर उभी ठाकली आहेत. बटर चिकनचा शोध आम्हीच लावला असा त्यांचा दावा आहे.

ठोठावला हायकोर्टाचा दरवाजा

तर भारत-पाकिस्तानच्या विभाजनानंतर 1950 मध्ये पेशावर येथील कुंदन लाल जग्गी आणि कुंदन लाल गुजराल हे दोन मित्र दुःख उराशी कवटाळत भारतात आले. या दोघांनी हॉटेल उघडले. त्यात बटर चिकन या लोकप्रिय डिशचा जन्म झाला. गुजराल यांनी 1997 मध्ये तर कुंदन लाल जग्गी यांनी 2018 मध्ये शेवटचा श्वास घेतला. आता त्यांच्या वारसांमध्ये बटर चिकनच्या मालकीवरुन वाद हायकोर्टात पोहचला.

दोन कोटींच्या भरपाईचा दावा

मोती महल हॉटेलच्या मालकाने दरियागंजच्या मालकाकडे 2.40 लाख डॉलर म्हणजे भारतीय चलनात 2 कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा केला आहे. दरियागंजच्या मालकाने त्यांच्या टॅगलाईनमध्ये एक आगाऊपणा केल्याचा दावा मोती महलच्या मालकाने केला आहे. त्यानुसार या टॅगलाईनमध्ये बटर चिकणचा जनक, शोध त्यांच्या हॉटेलने लावल्याचा दावा केला आहे. कोर्टात या लढाई एक नवीन वळण लागले आहे.

पुराव्याचा गठ्ठाच केला सादर

  1. दिल्ली हायकोर्टात बटर चिकनचा वाद पोहचला. दोन्ही पक्षांनी पुराव्यांचे बाड सादर केले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, दरियागंज हॉटेलच्या मालकाने 642 पानी उत्तर दाखल केले आहे. त्यानुसार, कुंदन लाल जग्गी यांनी बटर चिकन डिश तयार केली होती. तर कुंदन लाल गुजराल हे केवळ हॉटेलच्या मार्केटिंगचे काम पाहत होते.
  2. कोर्टासमोर या दोन जिगरी मित्रांची 1930 मधील काही छायाचित्रे सादर करण्यात आली आहे. 1949 मध्ये दोघांमधील भागीदारीचा करार पण सादर करण्यात आला आहे. कुंदन लाल जग्गी यांचे बिझनेस कार्ड पण आहे. 2017 मधील एक व्हिडिओ पण समोर आला आहे. त्यात बटर चिकन कसे तयार झाल्याची याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.