Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रतन टाटा यांचे 15,000 करोड कोणाला मिळणार? जगासाठी एक उदाहरण बनणार टाटांचे मृत्यूपत्र

Ratan Tata's wealth: Ratan Tata's wealth: रतन टाटा यांची एकूण संपत्ती 15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. टाटा समूहाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, टाटा यांना आरटीईएफ टाटा ट्रस्टपासून वेगळे ठेवायचे होते. टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टचा 66% हिस्सा आहे.

रतन टाटा यांचे 15,000 करोड कोणाला मिळणार? जगासाठी एक उदाहरण बनणार टाटांचे मृत्यूपत्र
Follow us
| Updated on: Feb 05, 2025 | 11:10 AM

Ratan Tata’s wealth: दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले. परंतु त्यांची कामे आणि त्यांच्या संस्था नेहमीच सर्वांच्या स्मरणात राहणार आहे. त्यांनी तयार केलेला रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन (RTEF) संदर्भात थोडासा संभ्रम निर्माण झाला आहे. हा फाउंडेशन त्याच्या वैयक्तीक पैशांमधून चालवला जाणार आहे. त्यातून समाजसेवेची कामे होणार आहेत. परंतु या फाउंडेशनचे ट्रस्टची कोण निवड करणार? यासंदर्भात स्पष्ट काही रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रात दिले नाही. त्यासाठी टाटा ग्रुपशी संबंधित व्यक्ती यासाठी एखाद्या निष्पक्ष व्यक्तीची मदत घेऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायधीशांची मदत घेऊन त्यांना आर्बिट्रेटर बनवले जाऊ शकते. आर्बिट्रेटर ट्रस्टी बनवण्याचा अधिकार टाटा कुटुंब, टाटा ट्रस्टचे सदस्य यांच्यापैकी कोणाकडे असणार? हे निश्चित करणार आहे.

रतन टाटा यांनी समाजसेवेसाठी 2022 मध्ये दोन संस्था बनवल्या होत्या. या दोन्ही संस्था त्यांच्या वैयक्तीक निधीतून चालवल्या जातात. त्यात रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्टचा समावेश आहे. यामधील आरटीईएफ ही कंपनीज एक्ट 2013 च्या कलम 8 नुसार बनवण्यात आली आहे. टाटा ग्रुपची होल्डिंग कंपनी टाटा सन्समधील रतन टाटा यांची भागीदारी 0.83% आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 नुसार, रतन टाटा यांची एकूण संपत्ती सुमारे 7,900 कोटी रुपये होती. आरटीईएफचे टाटा डिजिटल आणि टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये काही भागेदारी आहे.

टाटांची एकूण संपत्ती 15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रतन टाटा यांची एकूण संपत्ती 15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. टाटा समूहाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, टाटा यांना आरटीईएफ टाटा ट्रस्टपासून वेगळे ठेवायचे होते. टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टचा 66% हिस्सा आहे. रतन टाटा यांना त्यांची बहुतेक संपत्ती समाजसेवेत गुंतवायची होती. त्यांच्या बहुतेक मालमत्तेचे व्यवस्थापन आरटीईएफद्वारे केले जाईल तर उर्वरित ट्रस्टद्वारे पाहिले जाईल. रतन टाटा यांच्याकडे फेरारीसह अनेक गाड्या होत्या. या गाड्यांचा लिलाव होऊ शकतो आणि त्यातून मिळणारा पैसा आरटीईएफकडे जाईल.

हे सुद्धा वाचा

यासाठी आर्बिट्रेटर नियुक्ती

रतन टाटा यांनी आर.आर शास्त्री आणि बुर्जिस तारापोरवाला यांना आरटीईएफचे होल्डिंग ट्रस्टी बनवले. तसेच जमशेद पोंचा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना व्यवस्थापकीय विश्वस्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु आरटीईएफचे ट्रस्टी कोण असणार? हे निश्चित नाही. त्यामुळे आर्बिट्रेटरची नियुक्ती करण्यात येणार आहे.

'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा
'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा.
शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट
शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट.
पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का
पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का.
'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा
'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा.
विकी कौशलची रायगडावर गर्जना; म्हणाला, “हम शोर नहीं करते, सीधा...”
विकी कौशलची रायगडावर गर्जना; म्हणाला, “हम शोर नहीं करते, सीधा...”.
राहुल गांधींनी अक्कल पाजळली, जयंतीच्या दिवशी शिवरायांना श्रद्धांजली
राहुल गांधींनी अक्कल पाजळली, जयंतीच्या दिवशी शिवरायांना श्रद्धांजली.
बॉसने तर ट्रॅपमध्ये नाही ना अडकवलं? राऊतांचा सुरेश धसांना खोचक सवाल
बॉसने तर ट्रॅपमध्ये नाही ना अडकवलं? राऊतांचा सुरेश धसांना खोचक सवाल.
'त्या' नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, मनोज जरांगेंचा रोख कोणावर?
'त्या' नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, मनोज जरांगेंचा रोख कोणावर?.
'कमाल'चा खोटापीडिया... आक्षेपार्ह मजकूर शेअर करत तोडले अकलेचे तारे
'कमाल'चा खोटापीडिया... आक्षेपार्ह मजकूर शेअर करत तोडले अकलेचे तारे.
'तानाजी सावंतांचं पोरंग सापडतं मग खुनी...', सुप्रिया सुळे का भडकल्या?
'तानाजी सावंतांचं पोरंग सापडतं मग खुनी...', सुप्रिया सुळे का भडकल्या?.