AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबानी-अदानींचा वारस कोण असणार? कोण सांभाळणार कोट्यवधींचा व्यवसाय?

भारतात मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मात्र आता लवकरच या दोघांसह देशातील इतर श्रीमंत व्यक्ती आपला व्यवसाय नव्या पिढीकडे सोपवणार आहे. या दोघांचे वारस कोण असतील ते जाणून घेऊयात.

अंबानी-अदानींचा वारस कोण असणार? कोण सांभाळणार कोट्यवधींचा व्यवसाय?
Ambani and Adani
| Updated on: Sep 12, 2025 | 6:10 PM
Share

भारतात मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मात्र आता लवकरच या दोघांसह देशातील इतर श्रीमंत व्यक्ती आपला व्यवसाय नव्या पिढीकडे सोपवणार आहे. त्यामुळे बंदरे, विमानतळ, तेल शुद्धीकरण कारखाने, रिअल इस्टेट, आयटी, एफएमसीजी हे मोठे उद्योग आता युवा हातात जाणार आहेत. 2023 पर्यंत देशातील सुमारे 125 लाख कोटी रुपये किमतीचे व्यवसाय पुढच्या पिढीकडे सोपवले जाणार आहेत. याबाबात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अदानी समूहाचा वारस कोण?

गौतम अदानी हे देशांतील सर्वात श्रीमंत व्यवसायिकांपैकी एक आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार गौतम अदानी यांनी आधीच आपल्या उत्तराधिकाऱ्याबाबत योजना आखली आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार अदानी यांनी वयाच्या 70 व्या वर्षी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ते त्यांचा व्यवसाय चार वारसांमध्ये विभागून देणार आहेत. हे चार वारस म्हणजे मुलगा करण आणि जीत, पुतणे प्रणव आणि सागर हे आहेत.

करण अदानी बंदरे आणि लॉजिस्टिक्सचा कारभार पाहत आहेत. तर प्रणव अदानी खाद्यतेल, तेल आणि रिअल इस्टेटमधील काम पाहत आहेत. सागर अदानी हे ग्रीन एनर्जीच्या व्यवसायात आघाडीवर आहेत, तर जीत अदानी विमानतळ आणि डिजिटल व्यवसायाची जबाबदारी सांभाळत आहेत. सागरची पत्नी सृष्टी आणि जीतची पत्नी दिवा या दोघीही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.

अंबानींचे तीन वारस

रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी 2023 मध्ये त्यांच्या तिन्ही मुलांना संचालक मंडळात सामील केले आहे. मुलगी ईशा अंबानी यांना रिटेल क्षेत्राची जबाबदारी दिली आहे. जिओचा कारभार आकाश अंबानी आणि ग्रीन एनर्जीचा कारभार अनंत अंबानींकडे दिला जाण्याची शक्यता आहे.

गोदरेज ग्रुप

गोदरेज ग्रुपने 2024 मध्ये परस्पर संमतीने आपला व्यवसाय दोन भागात विभागला आहे. आदि आणि नादिर गोदरेज यांनी उद्योग आणि उत्पादन व्यवसायाची जबाबदारी घेतली आहे. तर जमशेद आणि स्मिता यांनी रिअल इस्टेट आणि गोदरेज अँड बॉयसची जबाबदारी घेतली आहे.

एचसीएल

एचसीएलचे संस्थापक शिव नादर यांनी आपली मुलगी रोशनी नादर हिला तिचा हिस्सा सोपवला आहे. रोशनी आता एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या अध्यक्षा आहेत आणि कंपनीच्या सर्वात मोठ्या शेअरहोल्डर देखील आहेत.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.