AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WITT Summit 2026: स्टार्टअपमध्ये मूल्य आणि व्हॅल्युएशनचा समतोल साधणं आवश्यक – तज्ज्ञ

युनिकॉर्न्सचा ट्रेंड आता काहीसा जुना वाटू लागला आहे. स्टार्टअप्सच्या जगात आता “व्हॅल्यू (मूल्यनिर्मिती) विरुद्ध व्हॅल्युएशन (कंपनीचे बाजारमूल्य)” यावर नवा वाद सुरू झाला आहे. WITT Summit 2026 या व्यासपीठावर तज्ज्ञांच्या पॅनेलने या दोन्ही गोष्टींमधील नाजूक समतोल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या संबंधांवर चर्चा केली. “The Values vs Valuation: Building the Business Case” हा विषय या चर्चेचा सारांश ठरला.

WITT Summit 2026: स्टार्टअपमध्ये मूल्य आणि  व्हॅल्युएशनचा समतोल साधणं आवश्यक - तज्ज्ञ
What India thinks today
| Updated on: Mar 24, 2026 | 3:58 PM
Share

‘What India Thinks Today Summit 2026’ हे TV9 Network च्या सिग्नेचर थॉट फेस्टचे चौथे संस्करण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेलं भाषण हे 23-24 मार्च रोजी भरलेल्या या फेस्टिव्हलचं मुख्य आकर्षण होतं. TV9 च्या या सिग्नेचर आयडियाज कार्निव्हलच्या मंचावर उपस्थित राहण्याची पंतप्रधानांची ही तिसरी वेळ होती.

कोणत्याही कंपनीसाठी मूल्यनिर्मिती ही केंद्रस्थानी असते. आणि दीर्घकालीन यशस्वी स्टार्टअपसाठी मूल्य आणि व्हॅल्युएशन यांचा संगम होणे आवश्यक आहे असं सोमवारी WITT Summit 2026 मध्ये तज्ज्ञांनी एकमताने सांगितलं. या रोचक चर्चेमध्ये स्टार्टअप क्षेत्रातील चार तज्ज्ञ सहभागी होते. मूल्यनिर्मितीवर लक्ष केंद्रित केलं तर त्यानुसार व्हॅल्युएशन आपोआप वाढेल, हाच या चर्चेचा मुख्य संदेश होता.

मूल्यनिर्मिती विरुद्ध व्हॅल्युएशन

स्टार्टअप्समधील मूल्यनिर्मिती (Value) विरुद्ध व्हॅल्युएशन (Valuation) या वादविवादात स्टार्टअप्ससमोर असलेली सध्याची आव्हानं आणि त्यांच्यापासून बदलत असलेल्या अपेक्षांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं. “The Values vs Valuation: Building the Business Case” असं या सत्राचं नाव होतं. उपासना शर्मा (एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर TiE – Delhi NCR), अर्पणा शाही (सह-संस्थापक, Gabit), अंकित कुमार (संस्थापक आणि सीईओ, Skye Air Mobility) आणि आशिष कुमार, (सह-संस्थापक, Fundamentum Investment Advisors) अशी या सत्रात सहभागी झालेल्यांची नावं होती.

अनिश्चितता: नवं वास्तव

“युद्ध असो किंवा नसो, सध्याच्या काळात अनिश्चितता ही जागतिक वातावरणातील महत्त्वाचा पैलू आहे. आणि नवीन व्यवसाय सुरू करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी हेच क्षेत्र निश्चित करणार आहे,” असे उपासन शर्मा म्हणाल्या. टेक्नॉलॉजिकल शिफ्ट हा त्यातील दुसरा महत्वाचा पैलू असेल असंही त्यांनी नमूद केलं.

मात्र जेव्हा टिकाऊपणाचा प्रश्न येतो, तेव्हा स्टार्टअपच्या दृष्टिकोनातून त्यात दोन घटक असतात. पहिला घटन म्हणजे, तुम्ही जे काही तयार करत आहात ते स्वतःच्या पायावर टिकून राहण्याची क्षमता आहे का,? आणि जे भांडवल आहे, त्याचा अत्यंत कार्यक्षमतेने वापर करण्याची क्षमता आहे का हाही प्रश्न तिथे येतो. कारण आज भांडवल खूप महाग झालंय, हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे, असे स्काय एअर मोबिलिटीचे संस्थापक आणि सीईओ अंकित कुमार म्हणाले. परिस्थिती जवळपास दर महिन्याला बदलत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सस्टेनेबिलिटीचा प्रश्न

जागतिक लॉजिस्टिक्स इकोसिस्टम ही स्टार्टअप्सना स्थानिक स्तरावर उत्पादन विकसित करण्यात मदत करू शकते आणि त्यामुळे देशालाही फायदा होऊ शकतो, असा विचार Skye Air Mobility च्या अंकित कुमार यांनी मांडला. त्यांच्या कंपनीद्वारे ड्रोनच्या मदतीने घरपोच पार्सल डिलीव्हर केले जातात, ज्यामुळे खर्च तर कमी होतोच पण कार्बन उत्सर्जनही कमी होतं.

डीप टेक आणि स्पेस टेक या क्षेत्रांमध्ये अनेक स्टार्टअप्स उदयास येत आहेत, असं कुमार यांनी सांगितलं. मात्र, पुढे त्यांनी असंही सांगितलं की फक्त तीन वर्षांत भारतात उत्पादन तयार करणे शक्य नाही. “ही दहाएक वर्षांची प्रक्रिया आहे,” असे त्याने स्पष्ट केलं. पर्यावरण आणि सर्वसामान्य जनतेवर परिणाम करू शकेल अशी एखादी गोष्ट तयार करणे हे देखील अत्यंत मौल्यवान असल्याचा विचारही त्यांनी मांडलाय .

इन्व्हेस्टमेंट टेस्ट

पण ज्या कंपन्यांकडे योग्य तंत्रज्ञान आहे, पण त्याचा स्वीकार (adoption)अपेक्षित पातळीवर होत नाही, अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूकदार आपले पैसे गुंतवतील का? असा सवाल उपस्थित झाला. त्यावर फंडामेंटम इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्सचे सह-संस्थापक आशिष कुमार यांनी उत्तर दिलं. जर गुंतवणूकदार कंपनीत गुंतवणूक करून नफा कमवू इच्छित असेल, तर मूल्यनिर्मिती (value creation) करणे आवश्यक आहे. “दीर्घकालीन संपत्तीमध्ये गुंतवणूक करून नफा कमवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपण जे काही करत आहोत त्याचं मूल्य (value) आणि व्हॅल्युएशन (valuation) यांच्यात समतोल साधणे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

आम्ही 10 टक्के वाढीकडे पाहत नाही तर 20 टक्के वाढ पाहत आहोत, पण ते दरवर्षी शक्य होईलचं असं नाही, असं आशिष कुमार म्हणाले. स्टार्टअपच्या सुरुवातीच्या काही वर्षांत क्षमतांची उभारणी होच असते, म्हणून कंपनी त्या दिशेने काम करत आहे का हे पाहणं गरजेचं असतं.

गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांच्या अपेक्षा बदललेल्या नाहीत आणि त्या नेहमीच तशाच राहिल्या आहेत यावरही Fundamentum Investment Advisors चे संस्थापक आशिष कुमार यांनी जोर दिला.

गॅबिट जगातील सर्वोत्तम हेल्थ वेअरेबल्स तयार करत आहे आणि या क्षेत्रात ते सर्वोत्तम उपकरण कंपन्यांपेक्षाही सरस आहेत, असे गॅबिटच्या सह-संस्थापक अर्पणा शाही यांनी सांगितले. ही कंपनी असे हेल्थ वेअरेबल्स पुरवते, जे ॲपलसारख्या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तुलनेतही आरोग्याच्या मापदंडांची मोठी रेंज प्रदान करतात, असा दावा करण्यात आला आहे.

Follow Us
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.