हॉटेलमध्ये स्वत: कूक म्हणून काम, स्वत:च्या हाताने चवदार जेवण बनवलं, आज जगभरात 450 हॉटेल्स, कोण आहेत विठ्ठल कामत?

मुंबईत भारतातील पहिले इको टेल पंचतारांकित हॉटेल बांधल्यानंतर कामत प्रकाशझोतात आले. त्यांनी एकदा लंडनमधील एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये काम केले. आता त्यांच्याकडे जगभरात 450 पेक्षा जास्त रेस्टॉरंट्स आहेत. विठ्ठल कामत यांचा जीवन प्रवास जाणून घेऊयात.

हॉटेलमध्ये स्वत: कूक म्हणून काम, स्वत:च्या हाताने चवदार जेवण बनवलं, आज जगभरात 450 हॉटेल्स, कोण आहेत विठ्ठल कामत?
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 7:50 AM

मुंबई : महाराष्ट्राच्या मातीनं अनेक रत्ने घडवलीत. त्यातील अनेकांनी स्वकर्तृत्वानं नामाभिधान मिळवलंय. विठ्ठल कामत यांनीसुद्धा स्वकष्टानं मोठं साम्राज्य उभं केलंय. देशभरात त्यांनी अनेक हॉटेल्स उभारलीत. मुंबईत भारतातील पहिले इको टेल पंचतारांकित हॉटेल बांधल्यानंतर कामत प्रकाशझोतात आले. त्यांनी एकदा लंडनमधील एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये काम केले. आता त्यांच्याकडे जगभरात 450 पेक्षा जास्त रेस्टॉरंट्स आहेत. विठ्ठल कामत यांचा जीवन प्रवास जाणून घेऊयात.

विठ्ठल कामत यांचा जीवन प्रवास

विठ्ठल कामत यांचा जन्म मुंबईतील ग्रँट रोड स्टेशनजवळील कामत कुटुंबात झाला. रॉबर्टमनी हायस्कूलमधून शिक्षणानंतर त्यांनी अभियांत्रिकी पदवीही मिळवली. वडील व्यंकटेश यांचे एक छोटे रेस्टॉरंट होते. नोकरी करण्याऐवजी विठ्ठलने वडिलांच्या कामात मदत करावी, अशी आईची इच्छा होती. पण विठ्ठलला पुढे काहीतरी करून दाखवायचे होते, त्यामुळे ते काहीतरी नवीन करण्याचा विचार करीत होते. अशा परिस्थितीत कोणी तरी फसवणूक करून वडिलांचे रेस्टॉरंट हिसकावले. तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला आणि नुकसानही झाले. विठ्ठल यांना वाटले की, आता त्यांच्याकडे असलेले दुसरे रेस्टॉरंट हिसकावून घेतलं जाईल, त्यामुळे त्यांनी तिथे वडिलांबरोबर काम करण्यास सुरुवात केली. पालकांनाही विठ्ठल यांचा हा निर्णय आवडला.

व्यवसाय वाढवण्यासाठी कूकचे केले काम

जेव्हा त्यांचे ‘सत्कार’ रेस्टॉरंट चांगले चालू लागले, तेव्हा विठ्ठल यांनी वडिलांना व्यवसाय वाढवण्याचा आपला हेतू सांगितला. वडिलांनीही होकार दिला. यानंतर विठ्ठल यांनी परदेश प्रवास करण्याचा आणि हॉटेल व्यवसायाबद्दल शक्य तितकी माहिती गोळा करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी लंडनमधील एका रेस्टॉरंटमध्ये कूक म्हणून प्रति आठवडा 75 पौंडची नोकरी घेतली. या रेस्टॉरंटमधून पैसे कमावले, अनेक देशांचा प्रवास केला आणि हॉटेल व्यवसायाचे बारकावे शिकले.

भारतातील पहिले इको टेल पंचतारांकित हॉटेल बांधले

भारतात परतल्यावर विठ्ठल आपला रेस्टॉरंट व्यवसाय चांगला वाढवत होते. त्यांनी मुंबईत अनेक छोटी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट उघडली होती. एके दिवशी त्याला कळले की, सांताक्रूझ विमानतळाजवळील फोर स्टार हॉटेल ‘प्लाझ्मा’ विकले जात आहे. त्यांनी ते विकत घ्यायचे ठरवले, पण त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते. पण विठ्ठल यांनी हिंमत हारली नाही आणि पैसे गोळा केल्यानंतर हॉटेल विकत घेतले. भारतातील पहिले इको टेल फाइव्ह स्टार हॉटेल ‘ऑर्किड’ हेसुद्धा याच ठिकाणी त्यांनी उभे केले. 30 वर्षांपूर्वी पाहिलेले विठ्ठल यांचे स्वप्न या हॉटेलच्या बांधकामामुळे पूर्ण झाले.

देशात आणि परदेशात 450 हून अधिक रेस्टॉरंट उघडली

भारताचे पहिले इको टेल पंचतारांकित हॉटेल बांधल्यानंतर विठ्ठल कामत यांनी परदेशात व्यवसायाचा विस्तार केला. जगातील अनेक देशांमध्ये त्यांच्या विठ्ठल कामत रेस्टॉरंट्सच्या फ्रँचायझी आहेत. त्याचबरोबर भारतातील अनेक राज्यांमध्ये त्यांची हॉटेल्सही आहेत.

संबंधित बातम्या

Gold Monetisation Scheme: आता घरी पडून असलेल्या सोन्यातून कमाईची संधी, जाणून घ्या मोदी सरकारची योजना

नोकरीत पगाराच्या स्लिपचे काय महत्त्व, जाणून घ्या कामाच्या 10 गोष्टी

Working as a cook in a hotel, making tasty food with his own hands, today there are 450 hotels all over the world, who is Vitthal Kamat?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.