RBI Office Attendant Admit Card 2021 : आरबीआय ऑफिस अटेंडंट भरती परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी, असे करा डाउनलोड

वेबसाईटवर प्रवेश पत्र (RBI Office Attendant Admit Card 2021) जारी करण्यात आले आहे. या पदांसाठी ऑनलाईन परीक्षा 09 आणि 10 एप्रिल 2021 रोजी घेण्यात येईल. (admit card issued for RBI Office Attendant Recruitment Exam Download it)

RBI Office Attendant Admit Card 2021 : आरबीआय ऑफिस अटेंडंट भरती परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी, असे करा डाउनलोड
बिटकॉईन, डॉजकॉईन आता विसरून जा! आरबीआय लवकरच आणतेय डिजीटल चलन

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ऑफिस अटेंडंट भरती परीक्षेसाठी (RBI Office Attendant Admit Card 2021) साठी प्रवेश पत्र जारी केले आहे. या परीक्षेसाठी अर्ज करणारे उमेदवार अधिकृत वेबसाईट opportunities.rbi.org.in वरून प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात. या परीक्षेच्या माध्यमातून 841 ऑफिस अटेंडंटची भरती करण्यात येईल. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 24 फेब्रुवारी 2021 पासून सुरू आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 15 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. वेबसाईटवर प्रवेश पत्र (RBI Office Attendant Admit Card 2021) जारी करण्यात आले आहे. या पदांसाठी ऑनलाईन परीक्षा 09 आणि 10 एप्रिल 2021 रोजी घेण्यात येईल. परीक्षेस सहभागी होण्यासाठी अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड करुन तपासून पहा. (admit card issued for RBI Office Attendant Recruitment Exam Download it)

असे डाउनलोड करा प्रवेश पत्र

प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाईट opportunities.rbi.org.in वर जा.
येथे ‘Current Vacancies’ च्या विभागात जा.
आता CALL LETTERS क्लिक करा.
येथे ‘Mar 31, 2021- Recruitment for the post of Office Attendants (2020)’ या लिंकवर क्लिक करा.
यानंतर Registration No / Roll No आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख प्रविष्ट करा.
आता प्रवेशपत्र स्क्रीनवर ओपन होईल.
ते डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.
या थेट लिंकवर क्लिक करून आपण प्रवेश पत्र डाउनलोड करू शकता.

कुठे होणार पोस्टिंग?

या परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना देशातील विविध शहरांमधील आरबीआय कार्यालयात पोस्ट केले जाईल. यात अहमदाबादमध्ये 50, बंगलोरमध्ये 28, भोपाळमध्ये 25, चंदीगडमध्ये 31, चेन्नईमध्ये 71, हैदराबादमध्ये 57, कानपूरमध्ये 69, मुंबईत सर्वाधिक 202, नागपुरात 55 आणि नवी दिल्लीत 50 जागा आहेत. इतर जागांच्या तपशीलासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

कसा असेल एक्झाम पॅटर्न?

प्रश्नपत्रिकेत रिझनिंग, जनरल इंग्लिश, जनरल अवेअरनेस, न्यूमेरिकल एबिलिटी असे 30-30 प्रश्न असतील. 120 गुणांसाठी 120 प्रश्न असतील. यासाठी 90 मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा केला जाईल.

एकूण पदे

एकूण 841 पदांवर नियुक्तीसाठी ही भरती परीक्षा घेण्यात येत आहेत. यापैकी 454 पदे अनारक्षित आहेत. ओबीसीसाठी 211, ईडब्ल्यूएससाठी 76, एसटीसाठी 75 आणि एससीसाठी 25 पदे आरक्षित आहेत. (admit card issued for RBI Office Attendant Recruitment Exam Download it)

इतर बातम्या

पोस्टाच्या 32 वर्ष जुन्या योजनेचे व्याजदर घटवले, 14 महिने उशिरानं होणार पैसे दुप्पट

केंद्र सरकारची शेतकर्‍यांसाठी मोठी घोषणा, नवीन रोजगारासह मिळतील हे फायदे

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI