BARC | भाभा अटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये पदभरती, 78 हजारांपर्यंत पगार मिळणार

भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर (BARC), मुंबई आणि रेडिएशन मेडिसीन रिसर्च सेंटर(RMRC), कोलकत्ता येथील विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. BARC recruitment 2020

Yuvraj Jadhav

|

Jan 28, 2021 | 11:37 AM

मुंबई: भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर (BARC), मुंबई आणि रेडिएशन मेडिसीन रिसर्च सेंटर(RMRC), कोलकत्ता येथील विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. दोन्ही संस्थांमधील भरती प्रक्रिया BARC यांच्यातर्फे राबवली जाणार आहे. एकूण 63 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. इच्छूक उमेदवार BARC ची अधिकृत वेबसाईट barc.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात. BARC च्या भरतीचे तीन टप्पे असून पूर्व परीक्षा, अ‌ॅडव्हान्स परीक्षा आणि मुलाखत या सर्व टप्प्यांमध्ये उमेदवाराला उत्तीर्ण व्हावं लागेल. पूर्व आणि अ‌ॅडव्हान्स परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी किती प्रमाणात उमेदवारांना मुलाखतीला बोलवायचे, याचा अधिकार BARCनं राखून ठेवला आहे. (BARC recruitment 2020 sarkari naukri for 12th pass to post graduate salary upto 78800)

शैक्षणिक पात्रता

BARCकडील विविध पदांसाठी 12 वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर पदवी मिळवलेले उमेदवार अर्ज करु शकतात. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी BARCची मूळ जाहिरात वाचून घेणे गरजेचे आहे. उमेदवारानं अर्ज करण्यापूर्वी वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे. थेट भरतीसाठी कमाल वयोमर्यादा 50 वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे.

वेतन

BARC च्या कॅटेगरी 1 स्टायपेंडरी ट्रेनी पदांसाठी उमेदवारांना दुसऱ्या वर्षासाठी 16 आणि 18 हजार रुपये मिळतील. तर, कॅटेगरी 2 च्या पदांसाठी पहिल्या वर्षासाठी 10 हजार 500 तर दुसऱ्या वर्षासाठी 12500 वेतन मिळेल. थेट भरती आणि वरिष्ठ पदासांठी 21 हजार 700 ते 78 हजार 800 इतके वेतन मिळणार आहे.

BARC परीक्षा 2020 पद्धती

भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर  BARC च्या भरतीचे तीन टप्पे असून पूर्व परीक्षा, अ‌ॅडव्हान्स परीक्षा आणि मुलाखत या सर्व टप्प्यांमध्ये उमेदवाराला उत्तीर्ण व्हावं लागेल. पूर्व परीक्षा किंवा स्क्रीनिंग परीक्षेत 40 प्रश्न बहुपर्यायी स्वरुपात विचारलेले असतील. उमेदवारांची अ‌ॅडव्हान्स परीक्षेसाठी निवड करण्यासाठी ही परीक्षा असेल. यामध्ये गणित आणि विज्ञानावर 20 तर सामान्य ज्ञानावर 10 प्रश्न असतील. अ‌ॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 40 टक्के तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना 30 टक्के गुण मिळवणं गरजेचे असते.

टीप: उमेदवारांनी कोणत्याही संस्थांच्या नोकरभरतीसाठी अर्ज करताना संबंधित संस्थेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे गरजेचे आहे. BARCची मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित बातम्या:

PNB Recruitment 2021: पंजाब नॅशनल बँकेत 100 जणांची भरती; झटपट अर्ज करा

Recruitment 2021 | Loksabha मध्ये अनेक पदांसाठी भरती, कसा करता येईल अर्ज

(BARC recruitment 2020 sarkari naukri for 12th pass to post graduate salary upto 78800)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें