BECIL Recruitment 2021: ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड विविध पदांवर भरती, अर्ज कुठे करायचा?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 27, 2021 | 1:47 PM

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड द्वारे डेटा एंट्री ऑपरेटरसह अनेक पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार बीईसीआयएलमध्ये एकूण 103 पदांची भरती केली जाईल.

BECIL Recruitment 2021: ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड विविध पदांवर भरती, अर्ज कुठे करायचा?
job

BECIL Recruitment 2021 नवी दिल्ली: ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड द्वारे डेटा एंट्री ऑपरेटरसह अनेक पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार बीईसीआयएलमध्ये एकूण 103 पदांची भरती केली जाईल. पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईट becil.com वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) ने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार अप्रेन्टिस, डेटा एंट्री ऑपरेटर, पर्यवेक्षक आणि वरिष्ठ पर्यवेक्षक या पदांसाठी भरती होणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 7 ऑक्टोबर 2021 हा आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेलं नोटिफिकेशन वाचणं आवश्यक आहे.

रिक्त पदाचा तपशील

बीईसीआयएलने जारी केलेल्या जाहिरातीनसार 103 पदांची भरती केली जाईल. अॅप्रेंटिस/लोडरसाठी 57, डेटा एंट्री ऑपरेटरसाठी 7, सुपरवायझरसाठी 20 आणि वरिष्ठ पर्यवेक्षकासाठी 9 पदांसाठी भरती होणार आहे.

ईमेल आयडी आवश्यक

BECIL ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवारांकडे वैध वैयक्तिक ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. जर उमेदवाराकडे वैध वैयक्तिक ईमेल आयडी नसेल, तर त्याने ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी त्याचा नवीन ईमेल आयडी तयार करावा.

वयोमर्यादा

डाटा एंट्री ऑपरेटर, पर्यवेक्षक या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 30 वर्षे असावे. वरिष्ठ पर्यवेक्षक पदासाठी उमेदवारांचे वय 35 वर्षे असावे.

शैक्षणिक पात्रता

डेटा एंट्री ऑपरेटर, पर्यवेक्षक या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असावेत. या व्यतिरिक्त, इतर पदांची माहिती मिळण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन वाचावी. कोणत्याही पदावर अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

शैक्षणिक पात्रता:

प्रशिक्षणार्थी/लोडर – 8 वी पास
डेटा एंट्री ऑपरेटर, पर्यवेक्षक, वरिष्ठ पर्यवेक्षक – पदवीधर.

वय श्रेणी

प्रशिक्षणार्थी/लोडर – जास्तीत जास्त 45 वर्षे
डेटा एंट्री ऑपरेटर, पर्यवेक्षक – 30 वर्षे
वरिष्ठ पर्यवेक्षक – 35 वर्षे

कल्याण डोंबिवली महापालिकेनं विविध पदांवर भरती

कल्याण डोंबिवली महापालिकेनं विविध पदांच्या 26 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेकडून या संदर्भात नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांनी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या पदांसाठी ऑफलाईन अर्ज करायचे असून थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

कोणत्या पदांसाठी भरती

सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, केंद्रप्रमुख कम गुणवत्ता व्यवस्थापक, वरिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ तंत्रज्ञ या पदासाठी मुलाखतींद्वारे उमेदवारांची थेट निवड केली जाणार आहे. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ पदासाठी 1 जागा, केंद्रप्रमुख कम गुणवत्ता व्यवस्थापक 1 जागा वरिष्ठ तंत्रज्ञ 12 जागा आणि कनिष्ठ तंत्रज्ञ 11 जागांवर भरती करण्यात येणार आहे. या जागा कंत्राटी तत्त्वावर भरल्या जाणार आहेत.

इतर बातम्या:

SBI Clerk Result 2021 : स्टेट बँक ऑफ इंडिया क्लार्क पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, मुख्य परीक्षेची प्रवेशपत्र जारी

रेल्वे मंत्रालयाचा मेगा प्लॅन, 3 वर्षात 50 हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार, रेल्वे कौशल्य विकास योजनेला सुरुवात

BECIL Recruitment 2021 Vacancy for Data Entry Operator and Various Post in Broadcast Engineering Consultants India Limited check details here

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI