AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhandara Zilha Parishad Recruitment 2023 : भंडारा जिल्हा परिषदेमध्ये इतक्या जागांसाठी भरती, ‘या’ तारखेपर्यंत भरा अर्ज!

Bhandara Zilha Parishad Recruitment 2023 : भंडारा जिल्ह्यासाठी एकूण 320 जागांसाठी भरती होणार आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी प्रक्रिया शनिवारपासून सुरुवात झाली. भंडारा जिल्हा परिषदेत 320 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Bhandara Zilha Parishad Recruitment 2023 : भंडारा जिल्हा परिषदेमध्ये इतक्या जागांसाठी भरती, 'या' तारखेपर्यंत भरा अर्ज!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 06, 2023 | 6:33 PM
Share

भंडारा : जिल्हा परिषदेमधील जागांसाठी मेगा भरतीला सुरूवात झाली आहे. एकूण 34 जिल्हा परिषदांसाठी 19, 460 पदांसाठीची भरती होणार आहे. यातील भंडारा जिल्ह्यासाठी एकूण 320 जागांसाठी भरती होणार आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी प्रक्रिया शनिवारपासून सुरुवात झाली. भंडारा जिल्हा परिषदेत 320 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

ऑनलाईन पद्धतीने 5 ऑगस्टपासून अर्ज करता येणार असून 25 ऑगस्ट ही अंतिम तारीख असणार आहे. या परीक्षेसाठीचे उमेदवारांचे प्रवेशपत्र परीक्षेच्या 7 दिवस आधी मिळणार आहे. या पराक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 38 आणि मागासवर्गीय उमेदवारासांठी 18 ते 43 इतकी असणार आहे. तर दरमहा वेतन हे 19,900 ते  1,12,400 इतका असणार आहे.

कसा करावा अर्ज

  • जिल्हा परिषदेतील भरतीसाठी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या संकेतस्थळावरुन अर्ज करावे लागणार आहे.
  • अर्ज करण्यासाठी आधी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.
  • ५ ते २५ ऑगस्टपर्यंत हा अर्ज करता येणार आहे. याच कालवधीत परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

अनुसूचित क्षेत्राबाहेरील (बिगर पेसा) सरळसेवेची रिक्त पदे पदभरतीसाठी संवर्गनिहाय घोषित पदे पुढील प्रमाणे आहेत.

आरोग्य पर्यवेक्षक 02, आरोग्य सेवक (पुरुष) 40% 22, आरोग्य सेवक (पुरुष) 50% 37, आरोग्य सेविका (महिला) 120, औषध निर्माण अधिकारी 04, कंञाटी ग्रामसेवक 33, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम / प्रा.पा.पू.विभाग) 31, कनिष्ठ लेखा अधिकारी 02, कनिष्ठ सहायक (लिपीक) 18, कनिष्ठ सहायक (लेखा) 07, पशुधन पर्यवेक्षक 05, घुलेखक (निम्न श्रेणी) 01, वरिष्ठ सहायक (लिपीक) ०4, वरिष्ठ सहायक (लेखा) 02, विस्तार अधिकारी (कृषि) 04, विस्तार अधिकारी (पंचायत) 02, विस्तार अधिकारी (सांख्यीकी) 04, स्थापत्य अभियांत्रीकी सहायक 17, आणि अंगणवाडी पर्यवेक्षीका 5

जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रिया इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन या संस्थेकडून राबण्यात येणार आहे. ही संस्था भरतीसाठी परीक्षा घेणार आहे. जिल्हा परिषदेतील विविध ३४ विभागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. परीक्षेसाठी अभ्यासक्रमाचा पॅटर्न मात्र जिल्हा परिषदेने तयार केला आहे.

Follow Us
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी