BHEL Recruitment 2021: भारत हेवी इलेक्ट्रिकल्समध्ये भरती, 2 लाखांपर्यंत पगाराची संधी

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 29, 2021 | 3:08 PM

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निर्माण जाली आहे. भेलकडून वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी पदभरती जाहीर केली आहे.

BHEL Recruitment 2021: भारत हेवी इलेक्ट्रिकल्समध्ये भरती, 2 लाखांपर्यंत पगाराची संधी
भेल

Follow us on

नवी दिल्ली: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निर्माण जाली आहे. भेलकडून वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी पदभरती जाहीर केली आहे. एकूण 27 पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. भेलकडून नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. अर्ज दाखल करण्यासाठी पात्र उमेदवारांनी ऑफिशियल वेबसाईट careers.bhel.in वर भेट द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिममिटेडने देशभरातील विवध शहरातील पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. भोपाळ , हरिद्वार, हैदराबाद, झाशी, रानीपेट,जगदीशपूर, त्रिची वायझॅक आणि दिल्ली येथील जागा भरण्यासाठी प्रक्रिया राबवण्यात येत आहे. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 7 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन वाचून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर वेबसाईटवरुन लिंक हटवली जाणार आहे.

अर्ज कसा दाखल करणार?

  1. सर्वप्रथम उमेदवारांनी भेलची वेबसाईट career.bhel.in वर भेट द्यावी
  2. त्यानंतर Recruitment of Medical Professionals याच्या लिंकवर क्लिक करावं
  3. यानंतर ऑनलाईन अप्लाय करावं, अर्जातील माहिती भरावी
  4. कागदपत्रं अपलोड करुन परीक्षा फी भरा
  5. अर्जाची प्रिंट काढून पुढील माहितीसाठी सोबत ठेवा

पात्रता

भेलकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार एकूण 27 पदं भरली जाणार आहेत. अर्ज दाखल करणारा उमेदवार हा वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवीसह एमबीबीएस पदवीधर असणं आवश्यक आहे. याशिवाय त्याच्याकडे मेडिकल क्षेत्रात काम केल्याचा एका वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. पात्र व इच्छूक उमेदवर भेलच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन अर्ज दाखल करु शकतात.

वयोमर्यादा

भेलच्या अधिकृत नोटिफिकेशननुसार अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराचं वय 37 वर्षांपेक्षा अधिक असून नेय. वरिष्ठ चिकित्सा अधिकारी पदासाठी पगार 70 हजार ते 2 लाखांपर्यंत दिलं जाणार आहे.

अर्जाचं शुल्क

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना 354 रुपये शुल्क जमा करावं लागणार आहे. याशिवाय जीएसटी देखील द्यावी लागणार आहे. अर्ज करण्यास इच्छूक उमेदवार भेलच्या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज दाखल करु शकतात.

इतर बातम्या:

IDBI Executive Admit Card 2021: आयडीबीआय बँकेकडून एक्झिक्युटिव्ह पदाच्या परीक्षेचं ॲडमिट कार्ड जारी, डाऊनलोड कसं करायचं?

SSC GD Constable 2021: एसएससी जीडी कॉन्स्टेबल 25 हजार जागांवर भरती, 31 ऑगस्टपर्यंत नोंदणींची संधी, वाचा सविस्तर

BHEL Recruitment 2021 for Medical Professional in Bharat Heavy Electricals Limited check details here

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI