AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Job Alert : सरकारी नोकरी शोधत असाल तर हे चुकवू नका.. महाराष्ट्रापासून ते राजस्थानपर्यंत, कुठे कुठे ओपनिंग ?

Job Alert : सरकारी नोकरीच्या शोधात जे आहेत ,त्यांच्यासाठी नियमितरित्या जॉब अलर्ट समोर येत असतात. महाराष्ट्रास विविध राज्यांतील नोकरीच्या संधींबद्दल जाणून घेण्यासाठी ही वाचणं महत्वाचं ठरेल. नोकरीसाठी कुठे अप्लाय करू शकता, पात्रता काय, पगार कती, याची सविस्तर माहिती घ्या जाणून.

Job Alert : सरकारी नोकरी शोधत असाल तर हे चुकवू नका.. महाराष्ट्रापासून ते राजस्थानपर्यंत, कुठे कुठे ओपनिंग ?
जॉब अलर्ट
| Updated on: Jan 27, 2026 | 2:55 PM
Share

Job Alert : नवीन वर्ष सुरू होऊन 27 दिवस उलटले. नवीन वर्षाचा पहिला महीना, अर्थात जानेवारी 2026 संपायलासुद्ध आला. हे वर्ष बंपर नोकऱ्यांचं असेल हे आधीपासूनच सांगण्यात येत होतं. याची झलकच जानेवारी मध्ये दिसली. जानेवारीच्या सुरुवातीला मोठ्या नोकऱ्यांच्या घोषणा करण्यात आल्या होत्या, परंतु जानेवारीच्या अखेरीस सरकारी नोकऱ्यांच्या सूचनांमध्येही वाढ झाली. इंडिया पोस्ट जीडीएस भरती 2026 ची अधिसूचना 31 जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. तर दुसरीकडे राजस्थान मध्ये लॅब असिस्टंटसह JE, AAO अनेक पदावंर भरती सुरू होणार आहे.

जॉब अलर्टच्या या भागात, आपण महाराष्ट्र-यूपीमध्ये इंडिया पोस्ट जीडीएस भरतीमध्ये जास्तीत जास्त रिक्त पदांबद्दल, राजस्थानमध्ये लॅब असिस्टंटसह जेई, एएओसह अनेक पदांसाठी भरती याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

इंडिया पोस्ट जीडीएस भरती 2026, महाराष्ट्र-यूपी मध्ये सगळ्यात जास्त जागा

इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती 2026 ची अधिसूचना येत्या 31 जानेवारी रोजी प्रसिद्ध होईल. यामुळे इंडिया पोस्ट GDS भरती 2026 साठी अर्ज प्रक्रिया सुरू होईल. इंडिया पोस्ट एकूण 28 हजार 740 पदांसाठी भरती करणार आहे.इंडिया पोस्ट 23 राज्यांमध्ये जीडीएसची भरती करणार आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक रिक्त पदे आहेत. जे 10 वी पास झाले आहेत, ते उमेदवार देखील इंडिया पोस्ट जीडीएस भरती 2026 साठी अर्ज करू शकतात. त्यासाठी दहावीच्या वर्गात गणित शिकणं आवश्यक आहे. तसेच तुम्ही ज्या राज्यासाठी अर्ज करत आहात त्या राज्याच्या स्थानिक भाषेचे ज्ञान आणि मूलभूत संगणक कौशल्ये आवश्यक आहेत. अर्ज ऑनलाइन करता येऊ शकतात.

Rajasthan RIICO भरती 2026 नोटिफिकेशन जारी

राजस्थानमध्ये नोकरीची तयारी करणाऱ्या तरूणांसाठी एक महत्वाची बातमी आहे. राजस्थान राज्य औद्योगिक विकास आणि गुंतवणूक महामंडळ (RIICO) ने 2026 च्या भरती मोहिमेसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. RIICO ने कनिष्ठ अभियंता आणि सहाय्यक लेखापाल यासह विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांमध्ये कनिष्ठ अभियंते आणि सहाय्यक लेखापाल यांच्यासह इतर पदांचा समावेश आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण 98 पदे भरली जातील. 20 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

राजस्थानमध्ये 804 लॅब असिस्टंट भरती

राजस्थानमधील 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी देखील आनंदाची बातमी आहे. राजस्थान स्टाफ सिलेक्शन बोर्ड (RSSB) लॅब असिस्टंट पदासाठी भरती करत आहे. यासाठी, आरएसएसबीने (RSSB) तयारी पूर्ण केली आहे, ज्या अंतर्गत RSSB राज्यात लॅब असिस्टंटच्या 804 पदांसाठी भरती करणार आहे. 27 जानेवारी म्हणजे आजपासूनच या पदांसाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. तर 25 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार हे rsmssb.rajasthan.gov.in या RSSB च्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, ही पदे भरण्यासाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे, उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर फायनल गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.

तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले.
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध.
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी...
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी....
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी.
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस.
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट.
पुन्हा परीक्षा पे चर्चा, भारतात किती विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग?
पुन्हा परीक्षा पे चर्चा, भारतात किती विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग?.
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख..
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख...
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?.
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.