AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीआरपीएफमध्ये 11 हजारांहून अधिक पदांसाठी भरती, ही आहे शेवटची तारीख, मोठी संधी आणि…

CRPF Constable Recruitment 2024 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर एक मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी वेळ न घालता अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच आहे.

सीआरपीएफमध्ये 11 हजारांहून अधिक पदांसाठी भरती, ही आहे शेवटची तारीख, मोठी संधी आणि...
CRPF
| Updated on: Sep 20, 2024 | 2:20 PM
Share

जर तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही एकप्रकारची मोठी संधी तुमच्यासाठी नक्कीच आहे. भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. विशेष म्हणजे ही बंपर भरती आहे. दहावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. CRPF मध्ये नोकरी मिळण्याची संधी आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. 

सीआरपीएफ कॉन्स्टेबल पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. 5 सप्टेंबरपासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये. 14 ऑक्टोबर 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे. उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. 

ssc.gov.in. या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेतून 11541 कॉन्स्टेबल पदे ही भरली जाणार आहेत. यामध्ये एकूण 11541 पदांपैकी 1299 पदे पुरुष आणि एकूण 242 पदे महिलांसाठी राखीव आहेत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. 

या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. यासोबतच 18 ते 23 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. प्रथम लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यात उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना पीईटी चाचणी, पीएसटी चाचणीही द्यावी लागेल. यानंतर कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीही केली जाईल.

यानंतरच उमेदवारांची निवड ही केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 100 रूपये फीस ही द्यावी लागेल. प्रवर्गातील उमेदवारांना फीस देण्याचे टेन्शन नसणार आहे. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना पगार देखील चांगला मिळणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.