AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Bank मध्ये काम करायचंय? लगेच करा अर्ज, अशी होणार निवड?

तुम्ही जागतिक बँकेसोबत काम करण्याची सुवर्णसंधी आहे. तुम्ही 14 फेब्रुवारीपर्यंत किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकता. तसेच अर्ज करण्यापूर्वी दिलेल्या गोष्टी नीट वाचा. 3,000 अमेरिकन डॉलर्स (अंदाजे 2,60,590 रुपये) पर्यंतचा प्रवास खर्च दिला जाऊ शकतो, ज्यात ड्युटी स्टेशन शहरात ये-जा करण्यासाठी विमान भाड्याचा समावेश असू शकतो.

World Bank मध्ये काम करायचंय? लगेच करा अर्ज, अशी होणार निवड?
| Edited By: | Updated on: Feb 14, 2025 | 2:32 PM
Share

तुम्ही जागतिक बँकेसोबत काम करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. यासाठी जागतिक बँकेने इंटर्नशिपसाठी जागा काढली आहे. या इंटर्नशिप प्रोग्रॅमअंतर्गत तुम्ही तुमच्या करिअरचा भक्कम पाया घालू शकता.

संशोधनाचा अनुभव मिळविण्याची संधी

या कार्यक्रमाच्या माध्यमातून उमेदवारांना विकास क्षेत्रात काम करण्याची, नवीन कल्पनांची देवाणघेवाण करण्याची आणि व्यापक संशोधनाचा अनुभव मिळविण्याची संधी मिळते. तुम्हालाही येथे इंटर्नशिप करायची असेल तर तुम्ही 14 फेब्रुवारीपर्यंत किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकता. तसेच अर्ज करण्यापूर्वी दिलेल्या गोष्टी नीट वाचा.

या इंटर्नशिप कार्यक्रमासाठी निवड झालेल्या उमेदवारांना विविध व्यावसायिक आणि तांत्रिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे.

‘या’ विषयांचा समावेश

  • अर्थशास्त्र आणि वित्त
  • मानव विकास (सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, पोषण आणि लोकसंख्या)
  • मानव विकास (सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, पोषण आणि लोकसंख्या)
  • कृषी आणि पर्यावरण
  • अभियांत्रिकी आणि शहरी नियोजन
  • नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन
  • खाजगी क्षेत्र विकास आणि कॉर्पोरेट समर्थन (लेखा, दळणवळण, मानव संसाधन, माहिती तंत्रज्ञान आणि वित्त)

शैक्षणिक पात्रता

उमेदवाराकडे बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे किंवा नियमित पदवी कार्यक्रमात प्रवेश घेतलेला असावा.

भाषा कौशल्य

इंग्रजीवर प्रभुत्व असणे अनिवार्य आहे. याशिवाय फ्रेंच, स्पॅनिश, रशियन, अरबी, पोर्तुगीज आणि चिनी भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

तांत्रिक कौशल्ये

तांत्रिक कौशल्ये यामध्ये तुम्हाला संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.

विद्यावेतन किती मिळणार?

जागतिक बँक आपल्या इंटर्न्सना दर तासाला पैसे देते.

ट्रॅव्हल अलाउंस किती दिली जाईल?

मॅनेजरच्या मर्जीनुसार, 3,000 अमेरिकन डॉलर्स (अंदाजे 2,60,590 रुपये) पर्यंतचा प्रवास खर्च दिला जाऊ शकतो, ज्यात ड्युटी स्टेशन शहरात ये-जा करण्यासाठी विमान भाड्याचा समावेश असू शकतो.

राहण्याची व्यवस्था काय?

इंटर्न्सना स्वत:च राहण्याची व्यवस्था करावी लागेल.

निवड कशी केली जाईल?

  • सूचना: निवड झालेल्या उमेदवारांना मार्च 2025 अखेरपर्यंत कळविण्यात येईल.
  • मुलाखत: निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीच्या फेरीतून जावे लागेल.
  • अंतिम निवड: अंतिम निवड एप्रिल 2025 मध्ये होईल.
  • इंटर्नशिप सुरू: हा कार्यक्रम मे 2025 च्या सुरुवातीपासून सुरू होईल आणि ऑगस्ट 2025 पर्यंत चालेल.

14 फेब्रुवारीपर्यंत किंवा त्यापूर्वी अर्ज करा

तुम्हालाही येथे इंटर्नशिप करायची असेल तर तुम्ही 14 फेब्रुवारीपर्यंत किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकता. तसेच अर्ज करण्यापूर्वी दिलेल्या गोष्टी नीट वाचा.

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.