AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! गुजरात कॅन्सर रिसर्चमध्ये १४८ पदांवर भरती

गुजरात कॅन्सर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट अहमदाबादमध्ये बंपर भरती, मेडिकल किंवा रिसर्च क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी. अर्ज कसा करायचा, भरती प्रक्रिया कशी असेल आणि अर्ज कोण करु शकतं? चला संपुर्ण माहिती जाणून घेऊया

तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! गुजरात कॅन्सर रिसर्चमध्ये १४८ पदांवर भरती
नोकरीची सुवर्णसंधी
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Jun 10, 2025 | 3:45 PM
Share

जर तुम्ही मेडिकल किंवा रिसर्च क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. गुजरात कॅन्सर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (GCRI), अहमदाबादने एकूण 148 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, सीनियर रेसिडेंट आणि फेलो अशा पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवार 6 जून 2025 पर्यंत gcriindia.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

भरती प्रक्रिया 31 मे 2025 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्यासाठी, जनरल आणि EWS कॅटॅगरीमधील उमेदवारांना 400 रुपये फी भरावी लागेल. तर, हिमाचल प्रदेशातील SC, ST, OBC आणि BPL उमेदवारांना 325 रुपये फी भरावी लागेल.

या भरतीमध्ये, पदानुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. अर्जदाराकडे डीएनबी, एमई/एम.टेक, एमबीए/पीजीडीएम, पीजी डिप्लोमा, एमएस/एमडी किंवा इक्विव्हॅलंट पदवी असावी.

वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाले तर, काही पदांसाठी कमाल वय 43 वर्षे आणि काही पदांसाठी 62 वर्षे ठेवण्यात आले आहे. राखीव कॅटॅगरीसाठी सरकारी नियमांनुसार वयात सूट दिली जाईल.

पगाराबद्दल बोलायचे झाले तर, प्रोफेरस पदासाठी दर महिना 1,44,200 ते 2,18,200 रुपये वेतन मिळेल. असोसिएट प्रोफेसरला 1,31,400 ते 2,17,100 रुपये आणि सिनियर रेसिडेंट पदासाठी 1,10,880 रुपये वेतन मिळेल. तj, फेलो पदासाठी 66,000 ते 70,000 रुपये वेतन मिळेल.

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. म्हणून अर्ज केल्यानंतर तयारी सुरू करा, जेणेकरून तुम्हाला मुलाखतीत यश मिळेल.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, प्रथम GCRI वेबसाइट gcriindia.org वर जा. वेबसाइटच्या होमपेजवर तुम्हाला रिक्रुटमेंटशी संबंधित लिंक मिळेल, ज्यावर क्लिक करून तुम्ही अर्ज भरू शकता. फॉर्म भरताना, सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा आणि फी भरा. फॉर्म सबमिट केल्यानंतर, त्याची प्रिंटआउट घ्या, जेणेकरून भविष्यातील मुलाखतीत किंवा इतर प्रक्रियेत कामाला येईल.

मुलाखतीशी संबंधित माहिती

ही मुलाखत गुजरात कॅन्सर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, सिव्हिल हॉस्पिटल कॅम्पस, असरवा, अहमदाबाद येथे असलेल्या संस्थेच्या एचआर विभागात घेतली जाईल.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी