IBPS RRB Admit Card 2021: आयबीपीएस आरआरबी प्रोबेशनरी ऑफिसर परीक्षेचं ॲडमिट कार्ड जारी, 1 ऑगस्टपासून परीक्षा

IBPS RRB Admit Card 2021: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शननं आरआरबी पीओ भरती परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहेत.

IBPS RRB Admit Card 2021: आयबीपीएस आरआरबी प्रोबेशनरी ऑफिसर परीक्षेचं ॲडमिट कार्ड जारी, 1 ऑगस्टपासून परीक्षा
आरआरबी पीओ भरती परीक्षेचा निकाल जाहीर
Follow us
| Updated on: Jul 18, 2021 | 1:56 PM

IBPS RRB Admit Card 2021 नवी दिल्ली: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शननं आरआरबी पीओ भरती परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहेत. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केला असेल ते अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाऊन प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात. या भरती परीक्षेच्या माध्यमातून एकूण 12097 पदे भरली जाणार आहेत.

आयबीपीएस आरआरबीने जाहीर केलेल्या या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 8 जून 2021 पासून सुरू झाली होती. यामध्ये उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 28 जून 2021 पर्यंत मुदत देण्यात आली होती. आयबीपीएस भरती परीक्षा ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहे. यासाठी प्रवेश पत्रे जारी करण्यात आली आहेत. पुढील महिन्यात 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

प्रवेश पत्र डाऊनलोड कसे करावे

स्टेप 1: प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ- ibps.in वर भेट द्या. स्टेप 2: वेबसाइटच्या मुख्य पृष्ठावरील IBPS Rural Regional Bank RRB X Recruitment 2021 वर क्लिक करा. स्टेप 3 : आता Common Recruitment Process for RRBs (CRP-RRBs-X) for Recruitment of Group “A” – Officers (Scale-I) लिंकवर क्लिक करा स्टेप 4: नोंदणी क्रमांक आणि जन्मतारिख टाकून लॉगिन करा स्टेप 5 : लॉगिन केल्यानंतर प्रवेश पत्र डाऊनलोड करा आणि एक प्रिंट आऊट घ्या.

IBPS PO परीक्षा 45 मिनिटांची असेल

आयबीपीएस आरआरबी भरती परीक्षा एकूण 45 मिनिटांची असेल. परीक्षेतील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ प्रकारचे असतील. 45 मिनिटांच्या परीक्षेत एकूण वस्तुनिष्ठ प्रकारचे 80 प्रश्न असतील, त्यापैकी प्रश्न रीझनिंगमधून आणि 40 प्रश्न क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूडमधून विचारले जातील. पूर्व परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा द्यावी लागेल.

आयबीपीएस आरआरबी परीक्षेशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी

IBPS RRB प्रिलिम्सची परीक्षा 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. ऑफिसर स्केल I साठी 4716 पदे रिक्त आहेत. आयबीपीएस आरआरबी प्रोबेशनरी ऑफिसर प्रिलिम्स परीक्षेसाठी 45 मिनिटे दिली जातील. ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे बहुपर्यायी प्रश्न परीक्षेत विचारले जातील. आयबीपीएस आरआरबी पीओ प्रीलिम परीक्षा एकूण 80 गुणांची असेल. ज्यामध्ये रीझनिंगमधून 40 प्रश्न आणि क्वांटिटेटिव एप्टीट्यूड विभागातून 40 प्रश्न विचारले जातील. आयबीपीएस आरआरबी पीओ प्रिलिम्स निकाल ऑगस्टमध्येच जाहीर केला जाईल. परीक्षेस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना सप्टेंबर 2021 मध्ये आयबीपीएस आरआरबी मुख्य परीक्षा द्यावी लागेल. मुख्य परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.

इतर बातम्या: 

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अ‌ॅलर्ट, विठ्ठल मंदिरातील 145 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी

Sanjay Raut | शरद पवार-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीत माध्यमांनी राजकारण पाहू नये : राऊत

IBPS RRB Admit Card 2021 Released for Officer Scale post know how to Download

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.