AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अग्निवीरांबाबत सैन्यदलाचा महत्वाचा निर्णय, परमानंट व्हायचंय तर ही मोठी अट पाळा, अन्यथा शर्यतीतून बाहेर

अग्निवीर योजनेवर विरोधकांनी अनेकदा टीका केली आहे.आता अग्निवीरांची पहिली बॅच सेवानिवृत्त होणार आहे. मात्र, चार वर्षांच्या सेवेनंतर ज्यांना परमानंट सैनिक व्हायचे असेल त्यांना एक मोठी अट लावण्यात आली आहे.

अग्निवीरांबाबत सैन्यदलाचा महत्वाचा निर्णय, परमानंट व्हायचंय तर ही मोठी अट पाळा, अन्यथा शर्यतीतून बाहेर
agniveer news
| Updated on: Jan 05, 2026 | 11:25 PM
Share

भारतीय सैन्याच्या अग्निवीर योजनसंदर्भात सरकारकडून एक महत्वाची माहीती समोर आली आहे. साल 2022 मध्ये सुरु झालेल्या या योजनेची पहिली बॅच आता चार वर्षांची सेवा पूर्ण करणार आहे.अशात हजारो अग्निवीरांच्या भविष्या संदर्भात प्रश्न निर्माण झाले असताना आता भारतीय सैन्याने नियम जारी करीत याचे उत्तर दिले आहेत. भारतीय सैन्याने स्पष्ट केले की जर पर्मानंट सैनिक व्हायचे असेल तर प्रक्रीयेत शिस्त आणि नियमांचे पालन करणे सर्वाधिक गरजेचे असणार आहे.

जून-जुलैमध्ये हजारो अग्निवीर डिस्चार्ज

मिळालेल्या माहितीनुसार जून आणि जुलै महिन्यात २० हजाराहून जास्त अग्निवीरांना त्यांच्या चार वर्षांच्या सेवापूर्तीनंतर त्यांना डिस्चार्ज केले जाणार आहे. यात सुमारे २५ टक्के अग्निवीरांना त्यांच्या चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन, लेखी परीक्षा आणि शारीरिक क्षमतेआधारे कायम सैनिक म्हणून पुन्हा सैन्यात रुजू करण्याची संधी मिळणार आहे.

लग्नासंदर्भात सैन्याचे कठोर नियम

परमानंट होण्यासंदर्भात सैन्याने लग्ना संदर्भात नियमांना स्पष्ट केले आहे. भारतीय सैन्य दलाच्या मते अग्निवीर आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळादरम्यान लग्न करु शकणार नाहीत. डिस्चार्ज झाल्यानंतर लागलीच लग्नाची परवानगी दिली जाणार नाही. जोपर्यंत परमानंट सैनिक बनण्याची निवड प्रक्रीया पूर्ण समाप्त होत नाही आणि अंतिम परिणाम घोषीत केले जात नाहीत तोपर्यंत अग्निवीरांना अविवाहित राहावे लागणार आहे.

नियम तोडला तर परमानंट नोकरी जाणार

सैन्य दलाने स्पष्ट केले आहे की जर कोणा अग्निवीराने या नियमांचे उल्लंघन करीत या काळात लग्न केले तर त्यास परमानंट सैनिक पदासाठी अयोग्य घोषीत केले जाईल.असे उमेदवार निवड प्रक्रीयेच्या बाहेर जातील, मग भले त्यांचे प्रदर्शन कितीही चांगले असेल.

वय आणि निवड प्रक्रिया

अग्निवीरांचा भरती सर्वसाधारणपणे २१ व्या वयापर्यंत होत आहे. आणि त्यांना २५ वर्षाचे असताना डिस्चार्ज केले जाते. यानंतर परमानंट होण्याच्या प्रक्रियेसाठी सुमारे ४ ते ६ महिन्यांचा काळ लागू शकतो. या दरम्यान सैन्याचे नियम आणि शिस्त पाळणे गरजेचे आहे असे सैन्य दलाने म्हटले आहे.

केवळ योग्य आणि शिस्तबद्ध अग्निवीरांना संधी

या परमानंट नेमणूकीसाठी तेच अग्निवीर अर्ज करु शकतात ज्यांनी त्यांचा चार वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला आहे. आणि चांगला रेकॉर्ड केला आहे. जे या काळात अविवाहित असतील त्यांनाच परमानंट होण्याची संधी मिळणार आहे.

फडणवीस संतापले अन् स्पष्टच म्हणाले, काँग्रेस-MIM सोबत आघाडी कधीही...
फडणवीस संतापले अन् स्पष्टच म्हणाले, काँग्रेस-MIM सोबत आघाडी कधीही....
भाजपसोबत नो, नेव्हर...जलील यांचा मोठा निर्णय; थेट नगरसेवकांनाच आदेश
भाजपसोबत नो, नेव्हर...जलील यांचा मोठा निर्णय; थेट नगरसेवकांनाच आदेश.
भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नये, राज ठाकरे यांचा घणाघात
भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नये, राज ठाकरे यांचा घणाघात.
अंबरनाथमध्ये धक्कादायक युती! शिंदेंविरोधात भाजपची काँग्रेस,NCP शी युती
अंबरनाथमध्ये धक्कादायक युती! शिंदेंविरोधात भाजपची काँग्रेस,NCP शी युती.
अकोटमध्ये भाजपची MIM शी हातमिळवणी, बहुमतासाठी BJP ची रणनिती नेमकी काय?
अकोटमध्ये भाजपची MIM शी हातमिळवणी, बहुमतासाठी BJP ची रणनिती नेमकी काय?.
पुणे मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा भव्य रोड शो
पुणे मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा भव्य रोड शो.
महायुतीकडून निवडणुकीपूर्वी प्रचाराचा झंझावत; फडणवीस, शिंदे, दादा कुठ?
महायुतीकडून निवडणुकीपूर्वी प्रचाराचा झंझावत; फडणवीस, शिंदे, दादा कुठ?.
या प्रचारसेभेत चाललंय काय? पाठीमागं शिवरायांचा पुतळा, पुढं नाचगाणं....
या प्रचारसेभेत चाललंय काय? पाठीमागं शिवरायांचा पुतळा, पुढं नाचगाणं.....
संतोष धुरी भाजपात, उद्धव ठाकरेंसमोर मनसे सरेंडर, ठाकरेंवर थेट हल्लाबोल
संतोष धुरी भाजपात, उद्धव ठाकरेंसमोर मनसे सरेंडर, ठाकरेंवर थेट हल्लाबोल.
विलासरावांच्या आठवणी पुसण्याचं वक्तव्य अखेर रवींद्र चव्हाणांकडून माफी
विलासरावांच्या आठवणी पुसण्याचं वक्तव्य अखेर रवींद्र चव्हाणांकडून माफी.