India Post GDS Recruitment 2026 : कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा थेट पोस्टात नोकरी, 10 पास असणाऱ्यांसाठी विविध पदे, तब्बल इतक्या जागा…
India Post GDS Recruitment : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाटी मोठी संधी असून थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी आहे. जर तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. पोस्ट विभाग अर्थात भारतीय डाक विभागात मेगा भरती सुरू झाली असून तब्बल 25,000 पदे भरली जातील. संचार मंत्रालयाने या भरती प्रक्रियेबद्दले शेड्यूल जारी केले. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. 20 जानेवारी 2026 पासून भरती प्रक्रियेला अर्ज करू शकता. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 फेब्रुवारी 2026 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वी अर्ज करावी लागणार आहेत. भारतीय डाक विभागाकडून विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेतली जात आहे. यातून ब्रांन्च पोस्ट मास्टर अर्थात BPM, असिस्टेंट पोस्ट मास्टर, डाक सेवक या पदांसाठी भरती प्रक्रिया असेल.
या भरती प्रक्रियेची खास गोष्टी म्हणजे सर्व दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात. चला तर मग 20 तारखेच्या आता सर्व तयारी करा आणि लगेचच अर्ज करा. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची एक संधी तुमच्याकडे आहे. उमेदवाराला गणित आणि स्थानिक भाषा बोलताना आली पाहिजे, यासोबतच संगणकाचे बेसिक ज्ञान असणे आवश्यक आहे. सायकलही चालवता आली पाहिजे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला India Post GDS या वेबसाईटवक जाऊन अर्ज करावा लागेल. सर्वात अगोदर Indiapastgdsonline.gov.in वर जा. तिथे गेला की, ऑनलाईन नोंदणीसाठी असलेल्या ऑप्शनवर क्लिक करा. अर्जामध्ये मागितलेली माहिती तिथे भरा. त्यानंतर कागदपत्रे अपलो़ड करा. भरतीसाठी लागणारी फीस भरा ( जर तुम्हाला लागू असेल तर) त्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या आणि अर्ज सबमिट करा.
दहावीतील तुमच्या गुणांनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. कोणत्याही प्रकारची परीक्षा तुम्हाला द्यावी लागणार नाही. लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 फेब्रुवारी 2026 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावी लागणार आहेत. अनेकांचे स्वप्न केंद्र शासनाची नोकरी करण्याचे असते. आता ते स्वप्न न राहता सत्यात उतरण्याची शक्यता आहे. दहावीच्या गुणांनुसार उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
