भारतीय सैन्यात करिअर करण्यासाठी जाणून घ्या सर्व आवश्यक माहिती
TES-54 भरती ही भारतीय सैन्यात अधिकारी होण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी एक सुवर्णसंधी आहे. योग्य पात्रता आणि तयारीच्या जोरावर तुम्ही या स्पर्धेत यशस्वी होऊन देशसेवा करण्याचा अभिमान अनुभवू शकता. अधिक माहितीसाठी आम्ही दिलेली 'ही' माहिती नक्की वाचा.

भारतीय सैन्यात अधिकारी होण्याचा स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. टेक्निकल एंट्री स्कीम (TES-54) अंतर्गत 2026 च्या जानेवारीपासून सुरू होणाऱ्या कोर्ससाठी भारतीय सैन्याने 90 जागांसाठी भर्ती जाहीर केली आहे. जर तुम्ही 10+2 (PCM) मध्ये किमान 60% गुण मिळवले असाल आणि JEE Mains 2025 परीक्षेत सहभागी झाला असाल, तर ही संधी तुम्हाला मिळू शकते. चार वर्षांच्या प्रशिक्षणानंतर तुम्हाला लेफ्टनंट म्हणून कायमस्वरूपी प्रमोशन मिळेल आणि वार्षिक पगार सुमारे 17-18 लाख रुपये असेल.
पात्रता निकष
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त मंडळातून 10+2 (PCM) मध्ये किमान 60% गुण असणे आवश्यक आहे सोबतच JEE Mains 2025 परीक्षेत सहभागी होणे अनिवार्य.
वय मर्यादा : 16.5 ते 19.5 वर्षे
राष्ट्रीयत्व : भारत, भूतान, नेपाळचा नागरिक, 1962पूर्वी भारतात स्थायिक झालेला तिबेटी निर्वासित किंवा काही विशिष्ट देशातून भारतात स्थायिक झालेला भारतीय वंशाचा असावा.
वैवाहिक स्थिती : अविवाहित पुरुष असावा.
शारीरिक पात्रता : भारतीय सैन्याच्या वैद्यकीय मानकांनुसार तंदुरुस्त असणे आवश्यक.
अधिकृत माहिती आणि नियमांसाठी joinindianarmy.nic.in ला भेट देणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया
- भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- ‘Officers Entry Apply/Login’ वर क्लिक करा.
- नवीन वापरकर्त्यांनी ‘Registration’ करून नोंदणी करावी.
- लॉगिन करून अर्ज भरा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- सबमिट केल्यानंतर रोल नंबर तयार होईल.
- अर्जाची दोन प्रिंटआउट्स घेऊन ठेवा; एक SSB मुलाखतीसाठी आणि एक स्वतःसाठी.
- अर्ज शुल्क नाही. एकापेक्षा अधिक अर्ज सादर करू नयेत. अंतिम तारीख 12 जून 2025 आहे, त्यामुळे लवकर अर्ज करावा.
निवड प्रक्रिया
- TES-54 मध्ये कोणतीही लेखी परीक्षा नाही. निवड खालील टप्प्यांत होते.
- शॉर्टलिस्टिंग: 12वी PCM गुण आणि JEE Mains गुणांवर आधारित.
- SSB मुलाखत: 5 दिवसांची प्रक्रिया, ज्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी, मानसशास्त्रीय चाचणी, गट चाचणी आणि वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश आहे.
- वैद्यकीय तपासणी: मुलाखतीत यशस्वी झालेल्यांची वैद्यकीय तंदुरुस्ती तपासली जाते.
- मेरिट लिस्ट: अंतिम निवड SSB गुण आणि वैद्यकीय तपासणीच्या आधारावर होते.
प्रशिक्षण आणि पदोन्नती
तीन वर्षे CME पुणे, MCTE म्हो किंवा MCEME सिकंदराबाद येथे मूलभूत लष्करी आणि अभियांत्रिकी प्रशिक्षण दिले जाते, त्यानंतर एक वर्ष IMA देहरादून किंवा प्री-कमिशन ट्रेनिंग अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले जाते. हे चार वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना अभियांत्रिकी पदवी प्रदान केली जाते आणि त्यांना लेफ्टनंट पदावर कायमस्वरूपी कमिशन मिळते.
पगार आणि फायदे
- प्रशिक्षणादरम्यान मासिक स्टायपेंड: ₹56,100.
- लेफ्टनंट पदावर प्रारंभिक पगार: ₹56,100 ते ₹1,77,500 (डिफेन्स पे मॅट्रिक्स लेव्हल 10).
- मासिक मिलिटरी सर्व्हिस पे: ₹15,500.
- इतर भत्ते: महागाई भत्ता, ड्रेस भत्ता, जोखीम भत्ता, प्रवास भत्ता, रेशन भत्ता आणि मुलांच्या शिक्षणासाठी भत्ता.
- एकूण वार्षिक पगार अंदाजे ₹17-18 लाख.
