AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेत 11255 जागांसाठी बंपर भरती, दहावी आणि बारावी पास असणाऱ्यांसाठी संधी, लगेच करा अर्ज

Indian Railway Recruitment 2024 : सरकारी नोकरी करण्याची एक मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे रेल्वे विभागात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे.

रेल्वेत 11255 जागांसाठी बंपर भरती, दहावी आणि बारावी पास असणाऱ्यांसाठी संधी, लगेच करा अर्ज
Railway
| Updated on: Jul 15, 2024 | 11:43 AM
Share

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी वेळ न घालता लगेचच अर्ज करावीत. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी झटपट भरतीसाठी अर्ज करावीत. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी आपण कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही आरामात अर्ज करू शकतात. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करावी लागतील. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

थेट रेल्वेमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. रेल्वे भरती मंडळाने रेल्वे तिकीट तपासणीस पदांसाठी ही अर्ज मागवली आहेत. दहावी पास आणि बारावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.

ही भरती भारतीय रेल्वेमध्ये टिसी पदासाठी आहे. या भरती प्रक्रियेतून तब्बल 11255 पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी 18 आणि 38 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट देण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना परीक्षा देखील द्यावी लागेल. 

फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करावी लागतील. रेल्वेच्या साईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करावी लागतील. तिथेच तुम्हाला भरती प्रक्रियेची इतरही माहिती आरामात मिळेल. संगणक आधारित चाचणी, वैद्यकीय तपासणी, लेखी परीक्षा, मुलाखत, शारीरिक कार्यक्षमता चाचणीनंतर उमेदवारीच निवड केली जाईल.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 500 रूपये फीस ही भरावी लागेल. प्रवर्गातील उमेदवारांना 250 फीस भरावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा. लगेचच करा अर्ज आणि मिळवा थेट केंद्र शासनाची नोकरी.

...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.