AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ISRO Apprentice: इस्रोत अप्रेंटिसची संधी, १० वी पास ते ग्रॅज्युएटपर्यंत करु शकतात अर्ज

इस्रोमध्ये विविध ट्रेडमध्ये अप्रेंटिस करण्याची संधी मिळणार आहे. इस्रोने अप्रेंटिससाठी अर्ज प्रक्रिया सुरु केलेली आहे. अप्रेंटिससाठी निवड झालेल्यांना स्टायपेंड मिळणार आहे.

ISRO Apprentice: इस्रोत अप्रेंटिसची संधी, १० वी पास ते ग्रॅज्युएटपर्यंत करु शकतात अर्ज
ISRO JOB
| Updated on: Nov 21, 2025 | 4:23 PM
Share

ISRO Apprentice: भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (ISRO) करियर करण्याची संधी चालून आली आहे. इस्रोने अंतराळ उपयोग केंद्राने विविध ट्रेड्समध्ये अप्रेंटिंससाठी अर्ज मागवले आहेत. या ट्रेडमध्ये अप्रेंटिस करण्यासाठी ग्रॅज्युएशन ते दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात.अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असून या अप्रेंटिससाठी निवड झालेल्या उमेदवाराला स्टायपेंड म्हणून १२,३०० रुपये महिना वेतन मिळणार आहे.

चला तर पाहूयात इस्रोच्या अप्रेंटिससाठी केव्हापर्यंत अर्ज करता येणार आहे. इस्रोने कोणत्या ट्रेड्समध्ये अप्रेंटिससाठी अर्ज मागवले आहेत ? कोणाला अर्ज करता येणार आहे ? तसेच स्टायपेंड संदर्भात माहिती घेऊयात…

तीन प्रकारच्या पदांसाठी अप्रेंटिसची संधी

इस्रोने तीन प्रकारच्या पदांसाठी अप्रेंटिससाठी अर्ज मागवले आहेत. नोटीफिकेशनुसार इस्रोने ग्रॅज्युएट अप्रेंटिस, टेक्नीशियन अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिससाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. एकूण २८ प्रकारच्या पदांसाठी अप्रेंटिससाठी अर्ज मागवले आहेत.

कोण कोणत्या पदासाठी करु शकतो अर्ज –

ग्रॅज्युएट अप्रेंटिसमध्ये पदवी झालेल्या उमेदवाराचे अर्ज मागवले आहेत. यात इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मॅकेनिकल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, आयटी, इलेक्ट्रीकल, सिव्हील, आर्किटेक्चर इंजिनिअरिंग, बीकॉम, बीसीए,लायब्ररी सायन्स, BSW, BA (हिंदी/इंग्लिश) मधून ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करु शकतात. ग्रॅज्युएशनमध्ये ६० टक्के मार्क हवेत.

टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, मॅकनिकल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग /IT, इलेक्ट्रिकल, सिव्हील इंजीनियरिंगमध्ये डिप्लोमा करणारे उमेदवार अर्ज करु शकतात.

ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी १० वी पास आणि कारपेंटर, पेंटर, ड्राफ्ट्समॅन ( मॅकेनिकल ) मशीनिस्ट, फिटर, टर्नर, लॅब अटेंडेंट ( केमिकल प्लांट ), AOCP, RAC, इलेक्ट्रॉनिक्स मॅकनिक, इलेक्ट्रीशियन सारखे ट्रेडमधून आयटीआय करणारे उमेदवार अर्ज करु शकतात.

४ डिसेंबरपर्यंत अर्ज करु शकता

इस्रोच्या अप्रेंटिससाठी अर्ज मागवण्याची प्रक्रीया सुरु आहे. अर्ज ४ डिसेंबर २०२५ पर्यंत ऑनलाईन करता येऊ शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाईट https://careers.sac.gov.in वर जाऊ अर्ज करता येईल

इस्रोच्या अप्रेंटिससाठी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दादरा नगर हवेली, गोवा , छत्तीसगड, मध्य प्रदेश, दमन आणि दिवमधील विद्यापीठ वा संस्थेमधून डिग्री आणि डिप्लोमा करणारे उमेदवार अर्ज करु शकतात. उमेदवाराने नोव्हेंबर २०२२ मध्ये वा त्यानंतर त्याची डिग्री/डिप्लोमा/ITI उत्तीर्ण केलेली हवी. म्हणजेच जे नोव्हेंबर २०२२ च्या आधी पास झाले आहेत त्यांना अर्ज करता येत नाही. ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी १८ ते २८ वर्षे, टेक्निशियन आणि ट्रेड अप्रेंटिंससाठी १८ ते ३५ वर्षांच्या उमेदवारांना सवलत मिळेल.

कशी होणार निवड आणि किती मिळेल स्टायपेंड

इस्रोच्या अप्रेंटिस प्रोग्रॅममध्ये निवड मेरिट आधारित आहे. निवडीसाठी कोणतीही लेखील परीक्षा किंवा मुलाखत नाही. अर्ज करताना उमेदवारांनी त्यांचे नंबर अपडेट करायचे आहे. त्याआधारे निवड होणार आहे. स्टायपेंडबाबत बोलायचे असेल तर ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी १२,३०० रुपये महिना, टेक्निशियन अप्रेंटिससाठी १०,९०० रुपये महिने आणि ट्रेड अप्रेंटिससाठी १०,५६० रुपये महिना स्टायपेंड दिली जाणार आहे. अप्रेंटिस एक वर्षांसाठी आहे. अशात १.२० लाख रुपयांहून अधिक स्टायपेंड वर्षभरात मिळणार आहे.

अप्रेंटिसनंतर काय ?

ISRO ची अप्रेंटिस पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ISRO अप्रेंटिस सर्टिफिकेट मिळणार आहे. या सर्टिफिकेट्सला इंडस्ट्रीत खूप व्हॅल्यू आहे. हे प्रमाणपत्र सरकारी सह प्रायव्हेट सेक्टर नोकरीत मदतीला येणार आहे.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.