ASRB NET, ARS, STO 2021 : नेट, कृषी शास्त्रज्ञ आणि एसटीओच्या भरतीसाठी संयुक्त अधिसूचना जारी, 21 ते 27 जून दरम्यान घेणार परीक्षा

मंडळाने 30 मार्च 2021 रोजी जारी केलेल्या अधिसूचना (सं. 1(2)/2020-Exam.II) नुसार तिन्ही परीक्षांसाठी एकत्रित परीक्षा 21 जून ते 27 जून 2021 या कालावधीत घेण्यात येईल. (Joint Notification for recruitment of NET, Agricultural Scientists and STOs issued, Examination to be held from 21st to 27th June)

ASRB NET, ARS, STO 2021 : नेट, कृषी शास्त्रज्ञ आणि एसटीओच्या भरतीसाठी संयुक्त अधिसूचना जारी, 21 ते 27 जून दरम्यान घेणार परीक्षा
नेट, कृषी शास्त्रज्ञ आणि एसटीओच्या भरतीसाठी संयुक्त अधिसूचना जारी
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 3:43 PM

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत कृषी वैज्ञानिक निवड मंडळ (एएसआरबी) ने राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) 2021, कृषी संशोधन सेवा (एआरएस) प्रारंभिक परीक्षा व वरिष्ठ तंत्र अधिकारी (एसटीओ) भरती परीक्षेसाठी संयुक्त अधिसूचना जारी केली आहे. मंडळाने 30 मार्च 2021 रोजी जारी केलेल्या अधिसूचना (सं. 1(2)/2020-Exam.II) नुसार तिन्ही परीक्षांसाठी एकत्रित परीक्षा 21 जून ते 27 जून 2021 या कालावधीत घेण्यात येईल. (Joint Notification for recruitment of NET, Agricultural Scientists and STOs issued, Examination to be held from 21st to 27th June)

5 एप्रिलपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु

जे उमेदवार एएसआरबी नेट 2021 किंवा एएसआरबी एआरएस 2021 किंवा एएसआरबी एसटीओ 2021 परीक्षांची तयारी करीत आहेत आणि अर्ज करण्यास इच्छुक आहेत, ते मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रदान केलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे अर्ज करू शकतील. अर्ज करण्याची प्रक्रिया सोमवार 5 एप्रिल 2021 रोजी सुरू होणार आहे. कृषी वैज्ञानिक निवड मंडळाने (ASRB) 25 एप्रिल 2021 रोजी या संयुक्त परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख निश्चित केली आहे. उमेदवारांनी नोंद घ्यावी की ऑनलाईन अर्जाच्या वेळी त्यांना एआरएस व एसटीओ परीक्षेसाठी 500 रुपये आणि नेट परीक्षेसाठी 1000 रुपये शुल्क भरावे लागेल, जे ऑनलाईन माध्यमातून भरले जाऊ शकते.

एएसआरबी नेट 2021

देशभरातील राज्य कृषि विद्यापीठे व अन्य कृषी विद्यापीठांमधील व्याख्याता / सहाय्यक प्राध्यापकांच्या पदांसाठी पात्रता निश्चित करण्यासाठी एएसआरबीकडून राष्ट्रीय पात्रता परीक्षा 2021 घेण्यात येणार आहे. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पात्रता उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. तसेच 1 जानेवारी 2021 रोजी उमेदवारांचे वय 21 वर्षांपेक्षा कमी नसावे.

एएसआरबी एआरएस 2021

एकूण 222 कृषी संशोधन सेवांसाठी एएसआरबीकडून एआरएस परीक्षा घेण्यात येणार आहे. या सेवांसाठी विहित निवड प्रक्रियेअंतर्गत प्राथमिक परीक्षा संयुक्त परीक्षेच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. प्राथमिक परीक्षेत यशस्वी घोषित झालेल्या उमेदवारांसाठी 19 सप्टेंबर 2021 रोजी मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे.

एएसआरबी एसटीओ 2021

याच प्रकारे वरिष्ठ तंत्र अधिकारी भरती 2021 अंतर्गत एकूण 65 पदांसाठी निवड प्रक्रिया एएसआरबीद्वारे राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील संयुक्त परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना पुढील टप्प्यातील मुलाखतीत उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले जाईल. (Joint Notification for recruitment of NET, Agricultural Scientists and STOs issued, Examination to be held from 21st to 27th June)

लहाणपणी आंब्याचं लोणचं आवडायचं, ‘या’ शेतकऱ्यानं तब्बल आंब्याच्या 150 दुर्मिळ प्रजातींचं केलं संवर्धन

सह्याद्रीतील वनस्पतीला राजकारणातील ‘सह्यगिरी’चं नामकरण, कोल्हापूरच्या संशोधकांकडून वेलीला शरद पवारांचं नाव

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.