AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IAS Officer : ट्रेनी IAS अधिकाऱ्याला किती पगार मिळतो?; तुमचा खरोखरच विश्वासही बसणार नाही…

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पूजा खेडकर प्रकरण चांगलंच गाजत आहे. पूजा खेडकर यांनी ट्रेनी ऑफिसर असतानाच अनेक सुविधा मागितल्या. त्यांच्या ऑडी कारवर लालबत्ती लावली इथपासून ते त्यांनी बोगस प्रमाणपत्र दिल्याचे आरोपही झाले आहेत. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. मात्र, ट्रेनी आयएएस अधिकाऱ्याला एवढ्या सुविधा मिळतात का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

IAS Officer : ट्रेनी IAS अधिकाऱ्याला किती पगार मिळतो?; तुमचा खरोखरच विश्वासही बसणार नाही...
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Jul 16, 2024 | 2:43 PM
Share

ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रकरण चांगलंच गाजत आहे. ट्रेनी असतानाही अवाजवी सुविधा मागण्यापासून सुरू झालेलं हे प्रकरण आता त्यांच्या बोगस प्रमाणपत्रांपर्यंत येऊन ठेपलं आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा ट्रेनी आयएएस अधिकाऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अधिकाऱ्यांना पगार किती असतो? त्यांना काय सुविधा मिळतात? त्यांच्यासाठीचे नियम काय असतात? याची आता चर्चा सुरू झाली आहे. त्यावरच टाकलेला हा प्रकाश.

सिव्हिल सर्व्हिस ही भारतातील सर्वात पॉवरफुल नोकरी आहे. त्यामुळेच लोकांची या नोकरीबाबत नेहमी चर्चा असते. सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाण्यासाठी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षा पास करणं बंधनकारक असतं. दोन वर्षाची ही ट्रेनिंग असते. त्यानंतर अधिकाऱ्याची पोस्टिंग केली जाते. या दोन वर्षात शिस्तबद्धता, कठिण प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी, प्रशासन, नियम आणि कायदे याची माहिती दिली जाते. ट्रेनिंगच्या शेवटच्या फेजमध्ये सर्व ट्रेनिंगचं परीक्षण केलं जातं. या दरम्यान ट्रेनी अधिकाऱ्याच्या राहण्याखाण्याची जबाबदारी संघ लोक सेवा आयोगाची असते.

काय सुविधा मिळते?

पूजा खेडकर प्रकरणानंतर ट्रेनी आयएएस अधिकाऱ्याला मिळणाऱ्या सुविधांची चर्चा सुरू झाली आहे. या अधिकाऱ्यांना काय सुविधा मिळतात याचं सर्वांना कुतुहूल वाटत आहे. ट्रेनी आयएएस अधिकाऱ्याचा पगार किती असतो, त्यांना काय काय दिलं जातं? अशी चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिव्हिल सर्व्हिसची ट्रेनिंग घेतलेल्या सर्व अधिकाऱ्यांना (आयएएस, आयआरएस, आयएफएस) समान सॅलरी असते. ट्रेनिंगच्या वेगवेगळ्या फेजमध्ये सॅलरी कमी होते आणि वाढते. साधारणपणे ट्रेनी आयएएस अधिकाऱ्याचा दरमाह पगार 50 हजार ते 60 हजार रुपये असतो. कधी कधी 70 हजार रुपये पगारही दिला जातो. सर्व डिडक्शन करून त्यांचा पगार त्यांच्या अकाऊंटमध्ये जमा केला जातो.

सुविधा काय मिळतात?

कधीही आयएएस अधिकाऱ्याला ट्रेनिंगच्या काळात सरकारी घर, कार, ड्रायव्हर, स्टाफ आदी सुविधा दिल्या जात नाहीत. संघ लोक सेवा आयोगाकडून त्यांची राहण्या-खाण्याची व्यवस्था केली जाते. फिल्ड पोस्टिंगच्यावेळी त्यांना दिवसाला 3 हजार रुपये टीए म्हणजे प्रवास भत्ता आणि डीए म्हणजे महागाई भत्ता दिला जातो. ट्रेनिंग दरम्यान फिल्ड पोस्टिंग मिळाल्यावर हे अधिकारी सरकारी गेस्ट हाऊसमध्ये राहू शकतात. किंवा एखाद्या हॉटेलमध्ये राहू शकतात.

आणखी फायदे काय?

आयएएस ट्रेनिंग दरम्यान या अधिकाऱ्यांना बरंच काही शिकायला मिळतं. फिल्ड एक्सपोजर आणि ट्रॅव्हेलिंगमुळे सिव्हिल सेवेचा खरा अर्थ उमगतो. त्याशिवाय अनेक प्रकारच्या एक्स्ट्रा करिकुलम मॉड्युल्समध्ये त्यांना भाग घेण्याची संधी मिळते. त्यात लीडरशीप, आर्ट ऑफ लिव्हिंग, ट्रेकिंग सारख्या अॅक्टिव्हिटीज असतात. त्याशिवाय संरक्षण मंत्री, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींसारख्या डिग्निटरीजसोबत कॉल ऑनची खास संधीही दिली जाते

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.