Law Clerk Recruitment 2021: अलाहाबाद हायकोर्टात लॉ क्लार्क पदावर भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड

अलाहाबाद उच्च न्यायालयाने कायदा क्लार्क (ट्रेनी) पद भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. अलाहाबाद हायकोर्टाच्या नोटिफिकेशननुसार 94 पदांवर भरती होणार आहेत.

Law Clerk Recruitment 2021: अलाहाबाद हायकोर्टात लॉ क्लार्क पदावर भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड
Allahabad High Court Job 2021

Law Clerk Recruitment नवी दिल्ली: अलाहाबाद उच्च न्यायालयाने कायदा क्लार्क (ट्रेनी) पद भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. अलाहाबाद हायकोर्टाच्या नोटिफिकेशननुसार 94 पदांवर भरती होणार आहेत. ज्या उमेदवारांना या जागांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी अलाहाबाद हायकोर्टाच्या अधिकृत वेबसाइट allahabadhighcourt.in ला भेट द्यावी.

अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

अलाहाबाद हायकोर्टातील कायदा लिपीक ट्रेनी पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 19 जुलैपासून सुरू झाली आहे. या रिक्त पदांसाठी अर्ज करण्यासाठी अखेरची मुदत 28 ऑगस्ट 2021 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन अर्ज दाखल करू शकतात. मात्र, या रिक्त पदांसाठीच्या परीक्षेची तारीख व प्रवेशपत्र अद्याप जाहीर झाले नाही.

अर्ज कसा करावा?

अलाहाबाद हायकोर्टाच्या क्लार्क ट्रेनी भरतीसाठी 28 ऑगस्ट 2021 पर्यंत ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करण्यात येणार आहेत. अलाहाबाद हायकोर्टाच्या allahabadhighcourt.in या वेबसाईट अर्ज डाऊनलोड करता येईल. अलाहाबाद उच्च न्यायालयात लॉ क्लार्क (ट्रेनी) पदासाठी अर्ज करण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे हा अर्ज अलाहाबाद उच्च न्यायालय किंवा लखनऊ खंडपीठाकडून 300 रुपये शुल्क जमा करुन घेता येऊ शकतो. वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करुन 300 रुपयांचा डिमांड ड्राफ्ट (डीडी) अर्जासोबत जमा करता येऊ शकतो. शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रतीही अर्जासोबत पाठवायच्या आहेत.

पात्रता

अलाहाबाद हायकोर्टातील क्लार्क ट्रेनी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडं कायद्याची पदवी असणं आवश्यक आहे. ती पदवी तीन वर्ष किंवा पाच वर्षांची असणं आवश्यक आहे. अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारानं कोणत्याही न्यायालयात प्रॅक्टिस करु नये. एलएलबीच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील या पदासाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराकडे डाटा एंट्री, वर्ड प्रोसेसिंग आणि कॉम्प्यूटर ऑपरेशन याचं ज्ञान असले पाहिजे.

अर्ज करणाऱ्या उमेदवारानं किमान 55% गुणांसह एलएलबी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. मुलाखतीच्या वेळी उमेदवारास अंतिम वर्षाचं गुणपत्रक सादर करावे लागणार आहे. या रिक्त जागांसाठी उमेदवारांचे वय 21 ते 26 वर्षांच्या दरम्यान असावं.

निवड प्रक्रिया

लॉ क्लार्क (ट्रेनी) पदासाठी पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होईल. अलाहाबाद उच्च न्यायालय, प्रयागराजमध्येच मुलाखत घेईल. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशन पाहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

इतर बातम्या:

NTPC Recruitment 2021: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांवर भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड

Law Clerk Recruitment 2021 in Allahabad High Court Know how to Apply

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI