MPSC Memes : रे भाई भाई भाई ! नाद नाय रे अभ्यासात आणि मिम्स मध्ये MPSC चा नाद नाय…

बातमी काहीही असू, विद्यार्थ्यांना मानलं पाहिजे, सगळं कसं हसता हसता निभावतात. आम्ही असेच काही मिम्स शोधून आणलेत, प्रयत्न केलाय हसवायचा. तुमच्याकडे नक्कीच अजून मवाढीव मिम्स असतील. खाली कमेंट्स मध्ये टाका आणि इतर एमपीएससी च्या विद्यार्थ्यांना हसवा !

MPSC Memes : रे भाई भाई भाई ! नाद नाय रे अभ्यासात आणि मिम्स मध्ये MPSC चा नाद नाय...
MPSC meme रे भाई भाई भाई ! Image Credit source: facebook
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 2:27 PM

एमपीएससी (MPSC) आणि यूपीएससी हा तसा सगळ्यांचाच जवळचा विषय आहे मग कुणी त्या परीक्षेची तयारी करू अथवा न करू. या परीक्षेच्या संदर्भातल्या बातम्या, त्याचे वेळोवेळी येणारे अपडेट्स या कडे सगळेजण लक्ष देऊन असतात. या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात खरंच खूप स्ट्रगल (Struggle) असतो. मानसिक म्हणा, आर्थिक म्हणा सगळ्याच बाबतीत विद्यार्थी खूप स्ट्रगल करत असतात, शेवटी या परीक्षेच्या प्रोसेसचाच भाग आहे हा चांगला अधिकारी घडवायचा आहे म्हटल्यावर हे सगळं आलंच. विद्यार्थी पण काय कमी नाहीत. मेहनतीच्या वेळी मेहनत करतात पण मजा घेऊन करतात. आयोगाकडून परीक्षा, निकाल, उत्तर तालिका अगदी काहीही येऊ दे पोरं मिम्स घेऊन तयारच असतात. काही मिम्स (Memes) मधून तर विद्यार्थ्यांचं दुःख दिसून येतं. बातमी काहीही असू, विद्यार्थ्यांना मानलं पाहिजे, सगळं कसं हसता हसता निभावतात. आम्ही असेच काही मिम्स शोधून आणलेत, प्रयत्न केलाय हसवायचा. तुमच्याकडे नक्कीच अजून मवाढीव मिम्स असतील. खाली कमेंट्स मध्ये टाका आणि इतर एमपीएससी च्या विद्यार्थ्यांना हसवा !

1) अय लका कुटाय काळ्या शाईचा पेन ?

हे मिम बघा, जग कुठच्या कुठे चाललंय…कुणी क्रिप्टो, कुणी शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट करतंय आणि एमपीएससी ची पोरं मात्र तिथंच आहेत आयुष्यात काळ्या शाईच्या पेनात ! सगळं जग वेगानं बदलतंय पण काळ्या शाईचा पेन वापरायचा, सतत मेहनत करायची ही एक गोष्ट काय एमपीएससी च्या विद्यार्थ्यांसाठी बदलली नाही. पुढे अनेक अनेक समस्या येतील जगासमोर पण…पण काळ्या शाईचा पेन इज बेसिक !

हे सुद्धा वाचा

2) लई लई… लई वेळा mpsc ला बसलेलो मी !

एमपीएससी पहिल्यांदा देणारा आणि पाचव्यांदा देणारा यावर एक मिम्स चा पाऊस असतो. पहिल्यांदा देणारे फ्रेशर्स आणि चौथ्या पाचव्यांदा देणारे अनुभवी माणसं. देव माणसं ! ही अनुभवी माणसं तसे तर फार सल्ले देणारे असतात बरं पण आयुष्यात ही लोकं थकलेली असतात, परीक्षा देऊन देऊन… या गोष्टीचं उत्तम चित्रण करणारं हे मिम बघा कसं वाटतंय…

3) सदाशिव पेठ आणि एमपीएससी

अरे भाई भाई भाई… ! MPSC चे मिम्स आणि पुण्याचा उल्लेख नाही म्हणजे हा तर पुण्याचा अपमान आहे. पुण्यात एमपीएससी ची तयारी करणारी मोक्कार पोरं पोरी आहेत. आमचं पुणे तुमच्या एमपीएससी वाल्यांमुळेच तुडुंब भरलंय असं कधी कधी पुणेकर हसत हसत म्हणतात. थोडक्यात काय एमपीएससी आणि पुण्याचं नातं अतूट आहे. आता एमपीएससी चे विद्यार्थी अभ्यासात इतके बुडालेले असतात बाहेरच्या लोकांसोबत त्यांची ओळख मेस, अभ्यासिका अशाच ठिकाणी होणार ना ? मिम वाचा कळेल…

4) एमपीएससी आणि पाकिस्तानचं कनेक्शन !

मित्रांनो ! एमपीएससीच्या मिम्स ने अगदी पाकिस्तानला पण सोडलेलं नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा हा फोटो. हा फोटो बराच वायरल झाला होता. याच फोटोचा वापर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा केला. तुम्हीच बघा…

5) आता नको ! माझी परीक्षा आहे

तो प्रिया वॉरियरचा वायरल व्हिडीओ आठवतोय का ? साऊथची ती हिरोईन जी व्हिडीओ मध्ये एका मुलाला भुवई उडवून मोठ्या स्टाईल मध्ये डोळा मारते. त्या हिरोईनला नंतर मस्त मस्त सिनेमे मिळत गेले मात्र तिच्या त्या व्हिडीओ वर अजूनही मिम्स बनतात. हे मिम तसं जुनंच पण अजूनही हे वायरल होत राहतं… एमपीएससी ची पूर्व परीक्षा आल्यावर विद्यार्थी कसे अभ्यासात स्वतःला झोकून देतात ते यात दिसून येतं. त्यांना मग परीक्षेची तयारी करताना स्वतःला आणि दुसऱ्याला लक्षात आणून द्यावं लागतं,” माझी पूर्व परीक्षा आहे.”

टीप : केवळ मनोरंजनासाठी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन बनवलेली ही बातमी आहे यात कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.