Indian Army Recruitment : सैन्यात सेवा करू इच्छिणारे इकडे लक्ष द्या ! लवकरात लवकर अर्ज करा…

Indian Army Recruitment : सैन्यात सेवा करू इच्छिणारे इकडे लक्ष द्या ! लवकरात लवकर अर्ज करा...
सैन्यदलात भरती व्हायचंय का ?
Image Credit source: Facebook

भारतीय लष्कराने जारी केलेल्या न्हावी आणि चौकीदार पदासाठी अर्ज जाहिरात जारी झाल्यापासून 45 दिवसांच्या आत पाठवणे आवश्यक आहे. आरोग्य निरीक्षक पदांच्या भरतीसाठी, उमेदवारांनी 06 जून 2022 पूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावेत.

रचना भोंडवे

|

May 14, 2022 | 6:44 PM

सैन्यात सेवा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी (Good News) आहे. भारतीय लष्कराने एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये आरोग्य निरीक्षकासह (health inspector) विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही जाहिरात 07 मे 2022 च्या जाहिरातीत काढण्यात आली आहे आणि यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात आपले अर्ज वेळेवर पाठवावेत. असे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय लष्कराने जारी केलेल्या न्हावी आणि चौकीदार पदासाठी (Barber And Watchman) अर्ज जाहिरात जारी झाल्यापासून 45 दिवसांच्या आत पाठवणे आवश्यक आहे. आरोग्य निरीक्षक पदांच्या भरतीसाठी, उमेदवारांनी 06 जून 2022 पूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावेत. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा काय आहे याबाबत सविस्तर माहिती जाहिरातीद्वारे देण्यात आली आहे.

भारतीय सैन्य भरती तपशील

पदांची नावं – आरोग्य निरीक्षक, न्हावी आणि चौकीदार

एकूण 113 रिक्त पदे

हे सुद्धा वाचा

  • आरोग्य निरीक्षक- 58
  • न्हावी – 12
  • चौकीदार- 43

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

  • न्हावी पदासाठी:- न्हावी कामात प्रवीणता असलेल्या मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक पास किंवा त्याच्या समकक्ष. (वय मर्यादा- 18 ते 27 वर्षे)
  • चौकीदार – मॅट्रिक पास किंवा मान्यताप्राप्त मंडळाकडून त्याच्या समकक्ष पात्रता. (वय मर्यादा- 18 ते 27 वर्षे)
  • आरोग्य निरीक्षक- मान्यताप्राप्त संस्थेतून मॅट्रिक किंवा त्याच्या समकक्ष पात्रता आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्समधील प्रमाणपत्र. (वय मर्यादा- 18 ते 25 वर्षे)
  1. Official Website – Click Here

अर्ज कसा करावा?

  • न्हावी आणि चौकीदार पदाच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी पीठासीन अधिकारी (BOO-I), HQ Southern Command (BOO-I) यांच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून त्यांचे अर्ज पाठवावेत.
  • आरोग्य निरीक्षकाच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी विहित नमुन्यात सर्व कागदपत्रांसह त्यांचे अर्ज स्पीड पोस्टद्वारे कमांडिंग ऑफिसर, 431 फील्ड हॉस्पिटल, पिन- 903431, c/o 56 APO कडे पाठवावेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें