AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PGCIL मध्ये ‘या’ रिक्त पदांसाठी थेट भरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच करा अर्ज

PGCIL TE Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी एक अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. ही मेगा भरतीच म्हणावी लागेल.

PGCIL मध्ये 'या' रिक्त पदांसाठी थेट भरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच करा अर्ज
Power Grid Corporation of India Limited
| Updated on: Oct 17, 2024 | 3:01 PM
Share

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी फटाफट अर्ज करावीत. ही खरोखरच मोठी संधीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी आपण कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही आरामात अर्ज करू शकता. ही भरती प्रक्रिया पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून राबवली जातंय. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. 

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ही तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. प्रशिक्षणार्थी अभियंता (इलेक्ट्रिकल) पदांवर भरती केली जाणार आहे. ही एकप्रकारची मेगा भरतीच नक्कीच म्हणावी लागेल. 

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये एकूण 47 रिक्त जागांसाठी भरती राबवली जातंय. BE/B.Tech/B.Sc (अभियांत्रिकी) ची पदवी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. उमेदवाराला पदवीमध्ये 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे. बाकी भरती प्रक्रियेची इतर माहिती ही उमेदवाराला अधिसूचनेवर मिळेल. 

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 28 वयोगटापेक्षा अधिक वय असलेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकणार नाहीत. प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट ही देण्यात आलीये. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला powergrid.in या साईटवर जावे लागेल. तिथेच जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागेल. याच साईटवर तुम्हाला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल. उमेदवारांना 6 नोव्हेंबर 2024 च्या अगोदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. 

Follow Us
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत
महायुतीसमोरचं सर्वात मोठं संकट टळलं; गोकुळ गीते यांचं बंड अखेर थंडावलं
मोठी ब्रेकिंग! महायुतीसमोरचं सर्वात मोठं संकट टळलं; गोकुळ गीते यांचं बंड अखेर थंडावलं
घरं फोडा, पक्ष फोडा आणि सत्तेत या! भाजप सरकारवर सुळेंचा हल्लाबोल
Supriya Sule | घरं फोडा, पक्ष फोडा आणि सत्तेत या! भाजप सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
कुंभार समाजाला सरकारची मोठी भेट! बावनकुळेंची थेट महत्त्वाची घोषणा
Chandrashekhar Bawankule | कुंभार समाजाला सरकारची मोठी भेट! बावनकुळेंची थेट महत्त्वाची घोषणा; नेमका काय फायदा होणार?