FIFA World Cup 2026: फुटबॉल सामने कधी आणि कसे पाहायचे? या ओटीटी प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपण
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेला आता अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. ओपनिंग सेरेमनीची फुटबॉलप्रेमींना उत्सुकता आहे. असं असताना फिफा वर्ल्डकप स्पर्धा टीव्हीवर आणि ओटीटीवर कुठे पाहता येईल? याबाबत शोधाशोध सुरू आहे. तुम्हाला या प्रश्नांची उत्तर या बातमीत मिळतील.

चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा फुटबॉलप्रेमींना वर्ल्डकप स्पर्धेची मेजवाणी मिळणार आहे. भारताचा संघ फिफा वर्ल्डकप स्पर्धेत पोहोचला नसला तरी भारतात फुटबॉलचे चाहते मोठ्या संख्येने आहेत. यंदाच्या स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडाकडे आहे. या स्पर्धेतील ओपनिंग सामना मॅक्सिको आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होणार आहे. असं असताना गेल्या काही दिवसांपासून फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा नेमकी कुठे पाहायला मिळेल? याबाबत घालमेल होती. पण फिफाने अखेर यावर तोडगा काढला आहे. भारतात स्ट्रीमिंग राइट्सवरून सुरू असलेला कल्लोळ अखेर संपुष्टात आला आहे. झी इंटरटेंनमेंटने पुढच्या आठ वर्षांसाठी फिफा वर्ल्डकप स्पर्धेचे हक्क आपल्याकडे घेतले आहे. तर दूरदर्शनच्या डीडी फ्री डीशवर स्पोर्ट्स चॅनेलच्या माध्यमातून काही निवडक सामने पाहण्याची संधी मिळणार आहे. जर तुम्हा फिफा वर्ल्डकप स्पर्धा पाहायची असेल, पण त्याबाबत माहिती नसेल तर चिंता करू नका. तुम्हाला पुढे इत्यंभूत माहिती मिळेल.
फिफा वर्ल्डकप 2026 सामना लाईव्ह कुठे पाहाल?
फिफा वर्ल्डकप स्पर्धेचे सर्व सामने तुम्ही झी एंटरटेनमेंटच्या नव्या स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेल असलेल्या युनाइटेड 8 स्पोर्ट्सवर पाहता येतील. इतकंच काय तर झी 5 ओटीटीवर त्याचं थेट प्रक्षेपण पाहता येईल. दरम्यान, उपांत्य फेरीपासून पुढील सर्व सामन्यांसह काही निवडक सामने डीडी स्पोर्ट्सवर दाखवण्यात येणार आहेत. झी 5 वर सामने पाहण्यासाठी तुम्हाला झी 5चे सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. तुमच्याकडे झी 5चे सबस्क्रिप्शन नसेल तर तुम्ही झी 5 सोबत येणारा कोणताही रिचार्ज प्लान निवडू शकता. तुम्ही झी 5 च्या अधिकृत वेबसाईटवरून सबस्क्रिप्शन प्लान खरेदी करू शकता.
पहिला फुटबॉल सामना केव्हा आणि कुठे होणार?
फिफा वर्ल्डकप स्पर्धेला 12 जूनपासून सुरूवात होणार आहे. म्हणजेच भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. मेक्सिको सिटी स्टेडियमवर मेक्सिको आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने येतील. त्यानंतरचा सामना 12 जूनच्या सकाळी 7.30 दक्षिण कोरिया आणि झेकिया यांच्यात होईल. 13 जूनच्या मध्यरात्री 12.30 वाज कॅनडचा सामना बोस्निया अँड हर्झेगोविनाशी होईल. त्यानंतर सकाळी 6.30 वाजता अमेरिका आणि पॅराग्वे यांच्यात लॉस एंजेलिस येथे सामना होईल.
