AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RRB Group D Exam Date : परीक्षेची तारीख व प्रवेशपत्र लवकरच जाहीर होणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

रेल्वे भरती मंडळ एप्रिलमध्ये ग्रुप डी परीक्षेची तारीख जाहीर करू शकते. ही परीक्षा एनटीपीसी परीक्षेसारख्या अनेक टप्प्यात घेण्यात येईल. (RRB exam date and admission card will be announced soon, know the details)

RRB Group D Exam Date : परीक्षेची तारीख व प्रवेशपत्र लवकरच जाहीर होणार, जाणून घ्या सविस्तर माहिती
| Updated on: Mar 16, 2021 | 5:25 PM
Share

नवी दिल्ली : रेल्वेतील एक लाखाहून अधिक पदांवर भरतीसाठी गट डी परीक्षा घेण्यात येणार आहे. रेल्वे भरती मंडळामार्फत ही परीक्षा एप्रिल ते जून या कालावधीत घेण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मंडळाने जाहीर केली आहे. आरआरबी एनटीपीसीच्या पाचव्या टप्प्यातील परीक्षा जवळ जवळ संपली आहे. एनटीपीसीची परीक्षा 27 मार्चपर्यंत चालणार आहे. यानंतर, आरआरबी ग्रुप डी परीक्षेची तारीख रेल्वेकडून जाहीर करण्यात येईल. रेल्वे भरती मंडळ एप्रिलमध्ये ग्रुप डी परीक्षेची तारीख जाहीर करू शकते. ही परीक्षा एनटीपीसी परीक्षेसारख्या अनेक टप्प्यात घेण्यात येईल. या परीक्षेसाठी अडीच दशलक्ष विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. (RRB exam date and admission card will be announced soon, know the details)

आरआरबी ग्रुप डी प्रवेश पत्र (RRB Group D Admit Card) रेल्वेच्या सर्व परीक्षांच्या तारखेच्या 4 दिवस आधी दिले जाईल. आरआरबीच्या सर्व क्षेत्रीय वेबसाईटवर परीक्षेची तारीख, शहर, शिफ्ट डिटेल आणि प्रवेश पत्र दिले जाईल. उमेदवार आपल्या क्षेत्रातील आरआरबी वेबसाईटला भेट देऊन ही सर्व माहिती मिळवू शकतील. परीक्षेची तारीख, शहर, शिफ्ट डिटेल आणि प्रवेश पत्र तपासण्यासाठी व डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना अर्ज क्रमांक आणि जन्मतारखेच्या सहाय्याने लॉग इन करावे लागेल.

RRB Group D परीक्षा पॅटर्न

– ग्रुप डी कॉम्प्युटर बेस टेस्टमध्ये 100 प्रश्न विचारले जातील. सीबीटी 100 गुणांचे असेल. – परीक्षेत नकारात्मक चिन्हांकन असेल, 3 प्रश्न चुकीचे असल्यास 1 गुण वजा केला जाईल. – परीक्षेसाठी उमेदवारांना 90 मिनिटांचा वेळ दिला जाईल.

असा असेल पेपर पॅटर्न

मॅथमेटिक्स : 25 सवाल जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग : 30 सवाल जनरल सायन्स : 25 सवाल जनरल अवेअरनेस आणि करंट अफेयर्स : 20 सवाल

RRB Group D अभ्यासक्रम

जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग

अ‍ॅनालॉजीज, वर्णमाला व संख्या मालिका, कोडिंग आणि डिकोडिंग, गणितीय ऑपरेशन, रिलेशनशिप, सिलोजिज्म, जंबलिंग, वेन डायग्राम, डाटा इंटरप्रिटेशन एण्ड सफिशिएन्सी, समानता व अंतर, एनालिटिकल रिजनिंग, क्लासिफिकेशन, दिशा, कथन- तर्क व धारणा आदी.

जनरल सायन्स (सामान्य विज्ञान)

इयत्ता दहावीच्या स्तरावरील फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजी विषयांचा अभ्या करा.

जनरल अवेअरनेस एण्ड करंट अफेअर

सामान्य जनजागृती विज्ञान आणि प्रोद्यौगिकी, खेळ, संस्कृती, व्यक्ति विशेष, अर्थशास्त्र, राजकारण व अन्य महत्वपूर्ण विषयांचे वाचन करा. (RRB exam date and admission card will be announced soon, know the details)

इतर बातम्या

Special Report : न्यायाधिशांकडून टोलमध्ये सूट मिळवण्याचा प्रयत्न, टोल मॅनेजरनेच शिकवला कायदा

बेरोजगार आहात? ‘हे’ राज्य सरकार देतेय 4500 रुपयांचा भत्ता

सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....