सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; SBI मध्ये बंपर भरती

बँकेत सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने अर्ज मागवले आहेत. येथे स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; SBI मध्ये बंपर भरती
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 4:18 PM

SBI Recruitment 2024: सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. कारण, स्टेट बँक ऑफ इंडियाने अर्ज मागवले आहेत. येथे स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार sbi.co.in अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरीचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. SBI ने स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (एससीओ) पदाच्या 169 जागांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाची ही भरती प्रक्रिया अभियांत्रिकी आणि संबंधित क्षेत्रातील पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार sbi.co.in अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

22 नोव्हेंबर 2024 पासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवार 12 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2024 आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्या पदांची भरती?

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भरतीमध्ये सहाय्यक व्यवस्थापक अभियंत्यासह इतर अनेक पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. या पदांसाठी उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील कौशल्य आणि अनुभव असणे आवश्यक आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरी सुवर्णसंधी आहे.

पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमधील अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील अनुभवही असणे आवश्यक आहे. या अटींची पूर्तता करणारे उमेदवारच या पदासाठी अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा आणि वेतन

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे असावे. निवड झालेल्या उमेदवारांना 48,480 ते 85,920 रुपये मासिक वेतन दिले जाईल. याशिवाय अतिरिक्त भत्ते आणि लाभही बँकेकडून देण्यात येणार आहेत.

अर्ज कसा करावा?

सर्वप्रथम एसबीआयच्या वेबसाईटवर sbi.co.in. मुखपृष्ठावरील “चालू रिक्त जागा” दुव्यावर क्लिक करा. संबंधित पदाच्या लिंकवर क्लिक करा आणि अर्ज भरा. सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि शुल्क जमा करा. फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट कॉपी ठेवावी.

SBI ची ही भरती केवळ आकर्षक वेतनच नाही तर स्थिरता आणि इतर भत्ते देखील देते. भारतातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत करिअर करण्याची ही उत्तम संधी आहे.

'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य.
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा.
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का.
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर.
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?.
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी.
नितेश राणेंची सैफच्या हल्ल्यावर शंका, 'मला संशय, खरंच चाकू मारला की..'
नितेश राणेंची सैफच्या हल्ल्यावर शंका, 'मला संशय, खरंच चाकू मारला की..'.
ट्रम्पच्या नव्या धोरणामुळे अमेरिकेतील 20 हजार भारतीय मायदेशी परतणार?
ट्रम्पच्या नव्या धोरणामुळे अमेरिकेतील 20 हजार भारतीय मायदेशी परतणार?.
वाल्मिक कराडला आर्थर जेलमध्ये ठेवा, दमानियांची मागणी, तर जरांगे म्हणता
वाल्मिक कराडला आर्थर जेलमध्ये ठेवा, दमानियांची मागणी, तर जरांगे म्हणता.
Saif Ali Khan Attacked : 'सैफवर जीवघेणा हल्ला तर 'तो' इतका फिट कसा?'
Saif Ali Khan Attacked : 'सैफवर जीवघेणा हल्ला तर 'तो' इतका फिट कसा?'.