AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skill India Mission : या योजनेतंर्गत तरुणांना सरकारकडून ट्रेनिंग आणि रोजगार, पाहा कसा लाभ घ्यायचा?

देशातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी 2015 मध्ये स्किल इंडिया मिशनची (Skill India Mission) सुरुवात करण्यात आली. (Skill india mission Government job policy)

Skill India Mission : या योजनेतंर्गत तरुणांना सरकारकडून ट्रेनिंग आणि रोजगार, पाहा कसा लाभ घ्यायचा?
Skill India Mission
| Edited By: | Updated on: Jun 19, 2021 | 10:10 AM
Share

नवी दिल्ली : देशातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी 2015 मध्ये स्किल इंडिया मिशनची (Skill India Mission) सुरुवात करण्यात आली. या योजनेंतर्गत दरवर्षी देशातील सुमारे 24 लाख तरुणांना कौशल्य आधारित प्रशिक्षण (स्किल इंडिया मिशन जॉब) प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य ठेवले गेलं होतं. स्किल इंडिया मिशनचा उद्देश देशभरातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना उद्योग संबंधित कौशल्य प्रशिक्षण दिले जाते जेणेकरून ते स्वत:चा रोजगार सुरू करू शकतील. या योजनेंतर्गत, दहावी-बारावीमध्ये ज्यांनी शाळा सोडून दिलीय किंवा कमी शिक्षित तरुणांना प्रशिक्षण दिले जाते. (Skill india mission Government job policy)

स्किल इंडिया मिशन अंतर्गत, युवा कौशल्य विकास योजनेत सामील होण्यासाठी युवकांना फी देण्याची गरज नाही. उमेदवार तीन महिने, सहा महिने किंवा एका वर्षाच्या कोर्ससाठी नोंदणी करू शकतात. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र दिले जाते, जे देशभरात वैध असते. तरुणांना रोजगार मिळण्यासाठी रोजगार मेळाव्यातून मोठी मदत होते. सरकार यामधून बेरोजगारीची समस्या कमी करण्यासाठीही प्रयत्नशील आहे.

कोणत्या क्षेत्रांत प्रशिक्षण दिलं जातं?

आंतरराष्ट्रीय स्तरांनुसार प्रशिक्षण दिलं जावं, असा सरकारचा आग्रह आहे. जेणेकरुन दरवर्षी तरुणांना वर्क फोर्समध्ये समाविष्ट केले जावे. (स्किल इंडिया मिशन बेनिफिट्स) या योजनेंतर्गत बेरोजगार तरुणांना बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर, फर्निचर व फिटिंग्ज, हस्तकला तसंच चामड्याचा उद्योग अशा सुमारे 40 तांत्रिक क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाते.

या योजनेला राष्ट्रीय कौशल्य विकास अभियान असंही म्हणतात. या योजनेचा उद्देश तरुणांना रोजगार मिळवून देणे तसंच ते स्वत: इतरांनाही रोजगार देऊ शकतात, एवढं त्यांना सक्षम करणं हा आहे. कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून दर पाच वर्षांत कौशल्य प्रशिक्षण देऊन एक कोटीहून अधिक लोकांना स्वावलंबी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

अर्ज कसा करायचा?

-अर्ज करण्यासाठी प्रथम आपल्याला स्किल इंडिया मिशनच्या अधिकृत संकेतस्थळावर pmkvyofficial.org भेट द्यावी लागेल. -यानंतर, फाइंड ट्रेनिंग सेंटरचा पर्याय येईल, त्यावर क्लिक करा. -त्यानंतर दुसर्‍या पेजवर आपल्याला कोणत्या क्षेत्रात प्रशिक्षण घ्यायचे आहे ते निवडावे लागेल. -त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

(Skill india mission Government job policy)

हे ही वाचा :

AIIMS Recruitment 2021: सीनियर रेजिडेंटच्या 106 पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी मोजकेच दिवस, असा करा अर्ज…

IBPS RRB Recruitment 2021 Notification: प्रादेशिक ग्रामीण बँकामध्ये 10368 जागांवर भरती, पदवीधरांसाठी मोठी संधी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.