IBPS RRB Recruitment 2021 Notification: प्रादेशिक ग्रामीण बँकामध्ये 10368 जागांवर भरती, पदवीधरांसाठी मोठी संधी

IBPS RRB Recruitment 2021 Notification: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन बोर्ड म्हणजेच आयबीपीएसनं प्रादेशिक ग्रामीण बँक (RRB)मधील विविध जागांसाठी अर्ज मागवले आहेत.

IBPS RRB Recruitment 2021 Notification: प्रादेशिक ग्रामीण बँकामध्ये 10368 जागांवर भरती, पदवीधरांसाठी मोठी संधी
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 9:21 PM

IBPS RRB Recruitment 2021 Notification नवी दिल्ली: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन बोर्ड म्हणजेच आयबीपीएसनं प्रादेशिक ग्रामीण बँक (RRB)मधील विविध जागांसाठी अर्ज मागवले आहेत. ऑफिसर स्केल- I(PO) प्रोबेशनरी ऑफिसर, ऑफिस असिस्टंट- मल्टिपर्पज क्लार्क आणि ऑफिसर स्केल II आणि ऑफिसर स्केल IIIच्या पदासांठी अर्ज सादर करायचे आहेत. नोटिफिकेशननुसार 10368 पदांवर भरती प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे. यापदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 28 जून आहे. (IBPS RRB Recruitment 2021 Notification for various post check here all details )

संपूर्ण देशभरातील प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये 10368 जागांवर भरती होणार आहे. यापदासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. उमेदवार आयबीपीएसच्या वेबसाईटवर ipbs.in भेट देऊन अर्ज दाखल करु शकतात. या भरतीबाबचं नोटिफिकेशन 7 जूनला जारी करण्यात आलं आहे. आयबीपीएस 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान पूर्व परिक्षेचे आयोजन करेल.

पूर्व परीक्षा कशी होणार?

आयबीपीएस पूर्व परीक्षा ऑनलाईन मोड द्वारे घेणार आहे. 1, 7 ,8,14, 21 ऑगस्टला पूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. पूर्व परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेला बोलावलं जाईल. प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी मुख्य परीक्षा 25 सप्टेंबर तर क्लार्क पदासाठी परीक्षा 3 ऑक्टोबरला आयोजित केली जाईल.

शैक्षणिक पात्रता

ऑफिस असिस्टंट पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराकडे स्थानिक भाषेचे ज्ञान आणि संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. ऑफिसर स्केल-I असिस्टंट मॅनेजर पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील शेती, फळबागतंत्रज्ञानस, पशुवैद्यकीय आणि इतर अभ्यासक्रमातील पदवी असणं आवश्यक आहे. जनरल बँकिंग ऑफिसर पदासाठी कोणत्याही विषयातील पदवी मात्र 50 टक्केहून अधिक गुण आवश्यक आहेत. स्पेशालिस्ट ऑफिसर माहिती तंत्रज्ञानसाठी संगणक क्षेत्रातील अभ्यासक्रमांची पदवी, पदविका असणं आवश्यक आहे. याशिवाय पदानुसार 5 वर्षांपर्यंतचा अनुभव आवश्यक आहे.

परीक्षा फी

एससी आणि एसटी, दिव्यांग उमेदवारांना 175 आणि इतर उमेदवारांना 850 रुपये फी ऑनलाईन पद्धतीनं भरावी लागेल. दुसरीकड तार्किक क्षमता, गणितीय क्षमता यावर परीक्षा घेतली जाईल.

जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

संबंधित बातम्या:

पंढरपूरच्या मजूर दाम्पत्याच्या मुलाची उंच भरारी, इस्रोमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञपदी निवड

Job News: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये 1388 पदांसाठी पदभरती, आयटीआय उत्तीर्ण असणाऱ्यांना मोठी संधी

(IBPS RRB Recruitment 2021 Notification for various post check here all details )

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.